नळदुर्ग येथे डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लिश स्कूल मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

डॉ प्रितमकुमार चिमणे यांनी केली आरोग्य बरोबर गुणवत्ता तपासणी
विद्यार्थी व शिक्षकांचे केले कौतुक
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग येथे डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये विद्यार्थांची आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबीरा बरोबर विद्यार्थांची गुणवत्ता ही तपासणी करण्यात आली . यावेळी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे तसेच डॉ आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्य प्रवर्तक संस्थापक मारुती खारवे यांचे तोंड भरून कौतुक केले .
गेली चार वर्ष डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलच्या दहावी चे विद्यार्थ्यांना नळदुर्ग केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे हे अभिमानास्पद आहे आणि गौरवास्पद आहे यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणावर भर देण्याची आजच्या काळाची गरज आहे आणि गुणवत्ता प्राप्तीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे आसे प्रभावी अंमलबजावणी केल्यास नक्कीच विद्यार्थी गुणवत्ता यादीत समावेश होईल केवळ केंद्रात नव्हे तर महाराष्ट्रा मध्ये आपल्या शाळेचे नाव आग्रेसर आसायला हवे आसे प्रतिपादन डॉ प्रितमकमार चिमणे यांनी केले .
यावेळी सोलापूर येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ प्रितमकुमार चिमणे डॉ पुनम चिमणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या शिबीरात १०० पेक्षा जास्त विद्यार्थांनी शिबीरात सहभाग नोंदवला यामध्ये मोठ्या बालकाची वाढ व समस्या तपासणे , लसीकरण व त्यावरील सल्ला ,बालदमा फुफसाचे आजर सर्दी ताप खोकला पोटाचे विकार ह्रदयाचे विकार मुत्र तपासणी आशा अनेक आजारावर तपासणी झाली आहे
यावेळी डॉ आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्य प्रवर्तक तथा संस्थापक मारुती खारवे यांनी डॉ प्रितमकुमार चिमणे डॉ पुनम चिमणे यांचा शाल हार बुके देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत