
🌻रणजित मेश्राम लेखक जेष्ठ विचारवंत अभ्यासक साहित्यिक समीक्षक आहेत
जगातील हे पहिले प्रधानमंत्री असावेत. जे शब्दलयीला वेळ देतात. नादसौंदर्य जपतात. बाब कितीही गंभीर असूदे. नादस्वर महत्वाचा ! अर्थ .. संदर्भ .. परिणाम पूढे पाहू ! सभा जिंकणे महत्वाचे. जाहीर भाषणाला सुध्दा त्यांचा गृहपाठ असतो.
परवा बिहारात बोलताना अनुप्रास सांभळलाच. शब्दलय कायम ठेवली. किती हा गृहपाठ !
मान्यवर बिहार दौऱ्यावर होते. तोंडावर तिथे निवडणुका आहेत. एका जनसभेत ते बोलत होते. ठरवून लयीत आलेच. पश्चिम भारत , पूर्व भारत अशी उगाच तुलना करीत गेले. ती करीत असतानाच, 'मेरा सपना है .. माझे स्वप्न आहे .. असे असे व्हावे. ते तसे नक्की होईल.'
काय ? कसे ? 'मुंबई सारखे माझ्या मोतीहारी चे नाव व्हावे. (म ला म सांभाळले) , गुरुग्रामप्रमाणे माझी गया हे संधीचे शहर व्हावे (ग ला ग जपले) , पुणे सारखाच पटना चा औद्योगिक विकास व्हावा , सुरत च्या धर्तीवर संथाल परगणा विकसित व्हावे , (सांभाळणे सुरु राहीले) जयपूर प्रमाणे जलपाय गुडी , जोधपूर इथे पर्यटनाचे नवे उच्चांक व्हावे, बंगलुरू सारखे बीरभूमी ने नाव काढावे.
‘ये होंगा. हे होईल. हे माझे स्वप्न आहे. ती पूर्ती होईल. बिहार हे विकसित राज्य होणार आहे.’
आपण एकदाचे थकून जाऊ. पण हे सद्गृहस्थ थकत नाहीत. उद्या इटावाचे इटली करायचे सांगतील. मागे काशी चे क्युटा करायचे सांगितलेच होते. नवीन काढले की मागचे विस्मरणात जाते. आपल्याला क ला क, इ ला इ तेव्हढे सांभाळायचे. हेच सुरू आहे.
याला किती वेळ देत असतील ? पण हे कलाकुसर जमणेही कौशल्य आहे.सूचनेही नाविन्य आहे. धन्य प्रमं ! आपण यात महान आहात !
गोळाफेक , भालाफेक पाहीली. पण ही फेकमफेक नवी आहे !
० रणजित मेश्राम
👤
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत