दलितांसह सर्व वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज-डॉ. सुनीलकुमार लवटे

डॉ. सुनीलकुमार लवटे : आटपाडीत शंकरराव खरात स्मृती साहित्य संमेलन
आटपाडी: दलित आणि सर्व समाजातील वचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. वेदना सर्वांनाच असतात, पण त्यांचा अर्थ आणि परिणाम समजून घेणे साहित्यिकाचे काम असते. डोळे उपडे ठेवा, बंद करू नका, हेच साहित्याचे खरे कार्य, खरे प्रयोजन असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी शुक्रवारी येथे केले.येथे आयोजित डॉ. शंकरराव खरात स्मृती साहित्य संमेलनाचे डॉ. लवटे अध्यक्ष होते, तर स्वागताध्यक्ष राजेंद्रअण्णा देशमुख होते. यावेळी डॉ. रवींद्र खरात, डॉ. कृष्णा इंगोले, डॉ. सयाजीराजे मोकाशी, शिवाजीराव पाटील, विलास खरात, अप्पासाहेब काळेवाग आदी उपस्थित होते.
डॉ. लवटे म्हणाले, माणदेशी साहित्यिकांनी केवळ शब्दांचे जग उभे केले नाही, तर समाजबदलाची जिवंत ऊर्मीही निर्माण केली. त्यांच्या लिखाणातून समतेचा, परिवर्तनाचा आणि विवेकाचा पाझर निघत राहिला. हे संमेलन त्या पाझराला नवी दिशा देणारे ठरावे.
डॉ. शंकरराव खरात स्मृती साहित्य संमेलन उत्साहात साजरे
आटपाडी २०२५
आटपाडी येथे डॉ. शंकरराव खरात स्मृती साहित्य संमेलनात डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राजेंद्रअण्णा देशमुख, डॉ. रवीद्र खरात, डॉ. कृष्णा इंगोले, डॉ. सयाजीराजे मोकाशी उपस्थित होते.
ते म्हणाले, या संमेलनाच्या माध्यमातून माणूस घडला पाहिजे, समाजात वैचारिक कायावाल्प पडला पाहिजे, हे संमेलन नव्या युगाची सुरुवात करणारे ठरेल, याबाबत मी निश्चित आशावादी आहे.
माणदेशी साहित्यपरंपरेचा सन्मान करत आणि नच्या विचारांना चालना देत चाललेल्या या डॉ. शंकरराव खरात साहित्य संमेलनाने चार वर्षे सातत्याने वैचारिक जागर केला आहे, असे गौरवोद्वार स्वागताध्यक्ष देशमुख यांनी काढले,
देशमुख म्हणाले की, माणदेशी साहित्यिकांनी निर्माण केलेले साहित्य हा एक अनमोल ठेवा आहे. या साहित्याचा गौरव करताना त्याचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. नवोदित साहित्यिकांना दिशा आणि प्रेरणा देण्याचे मोलाचे काम हे संमेलन करत आहे आणि यापुढेही करत राहील.
संमेलनाच्या उद्घाटन सत्रात उपस्थित साहित्यिक, विद्यार्थी आणि रसिकप्रेक्षकांनी त्यांच्या भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. देशमुख यांच्या मनोगतातून माणदेशी साहित्याच्या सामाजिक भानाने भरलेल्या परंपरेची जाणीव स्पष्ट झाली.यावेळी विलास खरात यांच्या ‘माणदेशाचे माणबिंदू’ आणि ‘आकुबा ‘ या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते झाले. सूत्रसंचालन प्रा. विजय शिंदे यांनी केले. आभार सुनील इनामदार यांनी मानले. कार्यक्रमास अनेक साहित्फोमी, लेखक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
दलितांसह सर्व वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज

आज कल्लेश्वर मंदिर हॉल आटपाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या डॉशंकररावखरातस्मृती साहित्यसंमेलन – 2025 चे उदघाटन कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष
माआमदारश्रीराजेंद्रआण्णादेशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले..
यावेळी डॉ रविंद्र शंकरराव खरात , प्रा डॉ सुनीलकुमार लवटे , मा भगवान आप्पा मोरे, सुभाष कवडे, धा, ना धंडोरे प्रा सयाजीराजे मोकाशी, मा सरपंच शिवाजी तात्या पाटील, डॉ कृष्णा इंगोले, मा योगीराज वाघमारे, प्रा डॉ वामन जाधव , आप्पासाहेब काळेबाग, विलास खरात, सचिन खरात, सीताराम सावंत, राहुल खरात, दिनेश देशमुख, सागर मोटे, नंदकुमार खरात, संतोष मोटे साहीत्यक, कवी इ मान्यवर उपस्थित होते..!!
आयु विलास खरात यांच्या माणदेशाचे_माणबिंदू अकूबा या ग्रंथाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले..!!
विलास खरात यांनी मनोगत व्यक्त केले आपले पुस्तक प्रकाशित झाले त्याबद्दल आनंद व्यक्त केला
आमदार राजेंद्र अण्णा देशमुख शेवट पर्यंत उपस्थित होते
महाराष्ट्र मधून साहित्यिक आले होते, पुस्तकाचे स्टॉल लागले होते तसेच जेवणाची व्यवस्था छान होती सर्वांचा सन्मान अण्णांच्या हस्ते करण्यात आला
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत