देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

मनुमानसिकतेच्या निषेधाचे प्रतिक म्हणजेच आरक्षण होय.!


🪷
भारतातील ब्राह्मणवादी मानसिकता, ही मनुस्मृती प्रमाणे गुणांबाबत अनादर आणि जन्मा बाबत म्हणजेच जाती बाबत आदर व्यक्त करतात. हिंदुधर्म ग्रंथ हे त्याचे प्रमाण आहे.
आणि त्याच कारणास्तव, जातीव्यवस्था पारंपरिक टिकुन आहे.
जो पर्यंत ब्राह्मणवादी मानसिकतेतून जन्म पावलेली जातीव्यवस्था आणि जातीभेदाचे समुळ उच्चाटन होत नाही, तोपर्यंत भारत देश एक सक्षम आणि विकसित राष्ट्र निर्माण होण्याची संभवना, अशक्य कोटीतील बाब आहे. हे धुर्त महान व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ओळखले आणि म्हणूनच ब्राह्मणवादी जातीव्यवस्थेचा समुळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने, भारतीय संविधानात एससी, एसटी आणि आणि ओबीसी शुद्र जाती मुळे ज्यांच्या गुणांचा हजारो वर्ष अनादर करण्यात आला आणि अवगुण असणार्या भ्रष्ट मानसिकतेच्या जातीब्राह्मणांना श्रेष्ठत्व किंवा उच्च सन्मान केवळ जन्मावरून आरक्षण देऊन हजारो वर्ष सन्मान
देण्यात आला, ते अधम कृत्य थांबविण्यासाठी जाती प्रमाणे विशेषतः आज पर्यंत अनारक्षित असलेल्यांना आरक्षण देऊन सन्मानित करण्याचे महान कार्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.
हे निर्विवाद सत्य आहे.
एससी,एसटी, ओबीसी आरक्षितातील गुणवंतांचा तसेच स्त्रीयांचा एक प्रकारे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांचा विरोध पत्करून, पिडितांचा संविधानात्म सन्मान केला.
भारतीय संविधानातील आरक्षणाला
पिढांपिढा
धार्मिक जातीवादी मानसिकता बाळगणार्यांचा विरोध समजण्यासारखे आहे कारण त्यांना जन्माच्या आधारावर भारतीय संविधान निर्माण होत पर्यंत आणि आजही
मेरिट गुणसंपन्नांचा अपमान करण्याची सवय जडलेली असल्यानेच, अवगुणी जाती ब्राह्मण सुद्धा मेरिट गुणसंपन्न घोषित करण्यात जे येत होते ते कायदेशीर बंद करण्यात आले. भ्रष्टाचार मार्गाचा अवलंब करून ते मेरिट येतात ही वेगळी बाब असली तरी,
भारतीय संविधानाने अनुच्छेद 340,341,आणि 342 व 342 (क)
मधील हुशार, तज्ज्ञ तेवढेच मुर्ख जेव्हा भारतीय संविधानाच्या आरक्षणाला विरोध करतात आणि मंदीरातील भारतीय संविधान बाह्य धार्मिक कर्मकांडीय आरक्षणाला विरोध न करता तेथे रांगेत दर्शनासाठी आरक्षीत राहतात, तेव्हा
अशा भारतीयांच्या राष्ट्रीयत्व व सुशिक्षित भावनेची किवं करण्या पलिकडे काहीच दुसरा उपाय राहत नाही.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, जातीव्यवस्थेने हिंदुंची प्रवृत्ती अत्यंत विकृत
बनवण्यात आली. (अर्थात ब्राह्मणवादी मानसिकतेने ती बनवली. ) आणि त्यामुळेच हिंदुमानसिकतेत गुणांबाबत अनादर आणि जन्म जाती बाबत [जाती ब्राह्मणां बाबत]
आदर निर्माण झाला. तो मिटता मिटेना, शिक्षणाचा काहीही उपयोग होतांना न दिसणारा परिणाम, परिपाक झाला.
आणि राष्ट्रा पेक्षा धर्म महान झाला.
👌🏽
प्रा.मुकुंद दखणे.
यवतमाळ 9373011954
जयभीम🙏🏾 जयभारत

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!