
देशातून इंग्रज गेल्यानंतर येथील रहिवासीना स्वातंत्र्य मिळून प्रत्येकाची गरज. पूर्ण होऊन समाधानाने जीवन जगेल ही आशा होती.
सर्वांना शिक्षण आरोग्याच्या सोयी उपलब्ध होतील.
आज चित्र काय दिसते मूठभर लोक संपत्तीचे मालक असून तेच चैनीचेजीवन जगून सर्व सुखसोयीचा उपभोग घेत आहे.
बहुतांश लोकांना दोन वेळेचे जेवण सुद्धा मिळणे कठीण झाले आहे. शिक्षणाची मक्तेदारी झाली असून काहीच लोक शिक्षणाचा कायदा घेऊन शासन प्रशासनावर कब्जा केला आहे.
भारतीय राज्य घटना समाजाच्या हितासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.परतु समाज कल्याणाचा योजना दुसरीकडे वळवून त्याचा लाभ दुसर्यांनाच दिला जातो. ज्या वर्गासाठी निधी राखून ठेवला आहे . त्याला जाणिवच नाही. म्हणून त्यापासून अलिप्त राहतो.् त्यांच्या वतीने आवाज उठवून सरकारवर दबाव निर्माण करून लाभार्थी पर्यंत पोहचवण्याची यंत्रणा नसल्यामुळे त्या योजनांचा लाभ दुसर्यांना होत असतो.समाजात गरीबी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.भूकमरी बेकारी प्रचंड प्रमाणात वाढत आहे. शिक्षण काहीच्या घरीच पाणी भरत आहे. विषमता सारखी वाढत आहे.सामाजिक प्रश्न जटील होत आहे.
येथील प्रस्थापित राजकिय पक्ष सत्तेच्या संघर्षात व्यस्त आहेत. निवडणूक आली तर गरीबांच्या घरी जाऊन पाया पडायच्या काही पैसे देऊन मत विकत घ्यायचे व सत्ता भोगायची ही सत्ताधारी व विरोधीपक्षाची निती आहे. त्यामुळे समाजात विषमतेची दरी सारखी वाढत आहे.
स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होत आहे.परतु मोठ्या प्रमाणात लोकसंख्या ही गरीबीत अज्ञानात अंध श्रद्धात जगत आहे.
ह्या विषमतावादी व्यवस्था विरूद्ध लढणारी संघर्ष करणारी विचारधारावर आधारित संघटना कमजोर असून प्रभावहीन आहेत. आज गरज आहे सामाजिक राजकिय विषमतावादी व्यवस्था विरूद्ध लढणारी संघटना मजबुत होऊन सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करेल.येथील भांडवलवादी शोषणवादी सामाजिक विषमतावादी व्यवस्था विरूद्ध जन लढे उभारणे आवश्यक आहे.तरच येथील प्रस्थापित व्यवस्थेला धक्का बसून सर्वांना समान न्याय समान संधी मिळून मुख्य प्रवाहात सामील होण्याची संधी मिळेल.
विनायकराव जयवंतराव जामगडे
9372456389
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत