
बाप तो बापच असतो,
कुटुंबाच्या गरजांसाठी,
सकाळी घराबाहेर पडतो,
रात्री थकून भागून, मरगळलेला येतो,
कसेबसे अन्न पोटात ढकलून,
निद्रेच्या स्वाधीन होतो.!
बाप तो बापच असतो,
कुटुंबाच्या सुखासाठी,
आवडी निवडीला फाटा देतो,
स्वतः भोकाची बनियन अन
फाटकी विजार घालतो,
त्याची ऐपत नसतांना,
मुलांसाठी पांढरा शुभ्र ड्रेस अन चकाकणारे बूट आणतो.!
बाप तो बापच असतो,
वादळ, वारा, पाऊस पाण्याची, त्याला पर्वा नसते,
कमरेभर पाण्यातून रस्ता काढीत,
खाडा न करता, कामावर हजर होतो,
हा सर्वस्वी कुटुंबासाठी
कर्तव्यप्रचुर त्याग असतो.!
बाप हा बापच असतो,
कधीतरी जवळ जाऊन विचारले का,
बाबा, तुझं काही दुखतंय का?
तुला काही हवय का?
तुझ्या आवडीचे काही आणू का?
तुमच्या प्रश्नातच त्याचे पोट तुडुंब भरते ,
मन प्रसन्न होऊन, पंख मिळाल्यागत
आकाशात उंच भरारी घेते,
त्याला तुमच्याकडून काहीही अपेक्षा नसते,
फक्त तो दोन आपुलकीच्या शब्दांचा भुकेला असतो.!
फक्त तो दोन आपुलकीच्या शब्दाचा भुकेला असतो.!!
फक्त तो दोन आपुलकीच्या शब्दांचा
भुकेला असतो.!!!
अरुण निकम,
9323249487.
मुंबई.
दिनांक…15/06/2025.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत