भारतीय मिडिया जगात १८० पैकी १५१क्रमांकावर

भारतीय मिडिया जगात १८० पैकी १५१क्रमांकावर का आहे ह्याचे उत्तर म्हणजे गुजरात मध्ये अपघातात २४१ जण मृत्यू झाल्यानंतर देखील धर्म ग्रंथ महत्वाचा वाटणारे वार्तांकन ! भारतीय हवाई वाहतूक विनिमय करणाऱ्या डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन च्या ४८% जागा रिक्त आहेत.म्हणजे ५२% क्षमतेवर काम सुरू आहे.भाजप सरकार हवाई क्षेत्र , बंदरे, रेल्वे सर्व अदानी अंबानी ला विकत सुटले आहे.गुजरात पोर्ट वर सातत्याने ड्रग मोठ्या प्रमाणावर सापडत आहे.ते पोर्ट अदानी कडे दिले आहे.त्याबद्दल सरकारचे पितळ उघडे पडू नये म्हणून एवढा मोठा अपघात झाल्यावर एकाच वेळी ‘भगवत गीता’ सुरक्षित ही बातमी नॅशनल ब्रेकिंग न्युज म्हणून घेण्यात आली आहे.माणसा पेक्षा धर्म ग्रंथ महत्वाचा आहे ह्या देशात.
जगात भारतीय मिडिया निर्देशांकात १५१ व्या क्रमांकावर आहे. हा निर्देशांक रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स (RSF) द्वारे प्रसारित केला जातो.जगातील १८० देशांमधील प्रेस स्वातंत्र्याच्या स्थितीचे मूल्यांकन करीत हे रँकिंग होते.लोकशाहीचा एक महत्वाचं स्थान असलेल्या भारताचे रँकिंग गेल्या काही वर्षांत सातत्याने घसरले आहे. २०२३ मध्ये १६१ वरून २०२४ मध्ये १५९ आणि आता २०२५ मध्ये १५१ वर आले आहे.
या निर्देशांकात, भारताचा स्कोअर ३२.९६ आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत किरकोळ सुधारणा दर्शवितो, परंतु प्रेस स्वातंत्र्याच्या क्षेत्रात अजूनही अनेक चिंता आहेत.
हि रँकिंग सार्थ ठरविण्याचे काम भारतातील उद्योगपतींनी विकत घेतलेले इलेक्ट्रॉनिक मिडिया हाऊस आणि त्यांचे चॅनेल दररोज करीत असतात.त्यात प्रिंट मिडिया देखील मागे राहिलेला नाही.सोशल मीडिया तर केव्हाच भाजपने हायजॅक केला आहे.धर्म ग्रंथ ज्याचे कडे होता ते प्रवासी अपघातात गेले आहेत मात्र मिडियाला ग्रंथ शाबुत असल्याचे अप्रूप वाटते कारण ही सरकारी स्क्रिप्ट आहे.काहीही घडो त्याला धार्मिक रंग द्यायचा. अपघात झाला त्याला जबाबदार कोण ह्याचे उत्तर मात्र कधीच मिळत नाही…
अजून किती खाली उतरायचे बाकी ठेवले आहे मीडियाने ?
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश
9422160101
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत