आधुनिक राजपुत्र

सुरेश खोपडे
‘ राजपुत्रांनो, तुम्हाला सत्ता हवी असेल तर तुम्ही सर्व गुण संपन्न असले पाहिजे. पण हो जगात कोणताच माणूस सर्वगुणसंपन्न नसतो.तरीपण तुम्ही सोंग (pretend)करा की तुम्ही सर्व गुण संपन्न आहात! हो पण निव्वळ माणसाचे गुण सत्ता मिळवण्यासाठी पुरेसे नाहीत त्यासाठी काही प्राण्यांचे गुण घ्यावे लागतील. विरोधकांचा काटा काढण्यासाठी तुम्हाला सिंहासारखे क्रूर बनावे लागेल.तरीही निव्वळ सिंहाचे गुण असून पुरेसे नाहीत. शिकार्याने लावलेले सापळे ओळखण्याचे कौशल्य सिंहामध्ये नसते त्यासाठी तुम्ही कोल्ह्यासारखे धूर्त बना !सुरेश खोपडे
निकोला मॅक्कीव्हॅली (सोळावे शतक)
हे आठवण्याचे कारण भारतीय जनता पक्षाचे अधिवेशन पुण्यात संपन्न झाले त्यातील फडणवीसांच्या भाषणाचा पाहिलेला vdo.
“छत्रपती शिवाजी महाराज की जय” असा त्यांनी नारा दिला. शिवरायांना मुजरा करतो असे म्हणत भाषणाला सुरवात केली आणि भाषणाचा शेवट देखील “जय शिवराय” म्हणत केला.
देवेंद्र नावाच्या या आर्य ब्राह्मणाचे शिवरायांबद्दल किती प्रेम आहे? ज्याने शिवरायांच्या बायोलॉजिकल म्हणजे खऱ्या बापाबद्दल शंका व्यक्त केली, आपल्या लिखाणात शहाजी राजें पेक्षा दादोजी कोंडदेव श्रेष्ठ दाखविला त्याच बाबा पुरंदरेला याच देवेंद्रने महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला होता. आम्ही त्याला जाहीर विरोध केला. तरी या पठ्याने खऱ्या शिव प्रेमींच्या नाकावर टिच्चून तो कार्यक्रम पूर्ण केला.
ज्ञानेश्वर तुकाराम यापेक्षा मनुश्रेष्ठ होता यासारखे व इतर अनेक हानिकारक विधान करणाऱ्या भिडे गुरुजी नावाच्या कट्टर वर्णवादी ब्राह्मणाच्या पाठीशी हा हिमालयासारखा उभा आहे!
याच भाषणात अखंड भारत हवा आहे असे भाजपचे ध्येय मांडले. अखंड भारत म्हणजे पाकिस्तान ,अफगाणिस्तान,….,यांना जिंकून जोडून घेणे. ज्या भाजपच्या काळात 80 कोटी लोकांना मोफत धान्य द्यावे लागते ते पाक , अफगणिस्तान या भुके कंगाल देशाला अन्न कुठून देणार? आणि हे देश जिंकण्यासाठी आमची बेकारीने ग्रासलेली बहुजनांची चार वर्षासाठी अग्निविर या नावाने कंत्राटी नेमलेली पोरं सैनिक म्हणून लढायला पाठवणार. ब्रह्मवृंदांची पोरे परदेशात शिकून तिथेच राहणार. अखंड भारत हे आर्य ब्राह्मणांनी स्थापन केलेल्या आरएसएसचे स्वप्न आहे. यांना चीनला थांबवता येत नाही. त्यावर बोलत नाहीत पण यांना अफगाणिस्ताना पर्यंतचा प्रदेश हवा आहे.
फडणवीसने भाषणात पुढे असेही सांगितले की भाजप हा गुरू आहे. या गुरूला दक्षिणा देणे म्हणजे त्या पक्षाला निवडून देणे. शेलार, दरेकर,राणे, तावडे, लाड,…., या नावाचे आमचे (अती दूरचे का होईना पण) नातेवाईक त्या पक्षात आहेत. त्यांच्यात आम्हाला काहीच गुरुपण दिसत नाही. मग या पक्षातील नक्की गुरु कोण? फडणवीसने आपल्या भाषणामध्ये तिरंगी ध्वजाचा उल्लेख केला नाही. फक्त भगव्या ध्वजाचा उल्लेख केला. जो त्यांच्या ब्राह्मण श्रेष्ठत्व सांगणाऱ्या आरएसएस या संघटनेचा आहे. आमचा वारकरी /भागवत धर्म व शिवरायांचा भगवा यांच्यापेक्षा तो वेगळा आहे.
समाजामध्ये कधी नव्हे ती दुफळी निर्माण झालेली आहे अशी चिंता फडणवीसने केली. खरे तर दुफळी करण्याचे काम जे अर्धी चड्डी घालून ज्या संघटनेत जातात त्यांचे तर ते ध्येयच आहे. तेच विषमतेवर आधारित समाज व्यवस्था राहावी यासाठी प्रयत्नशील आहेत.
स्वतःला आर्य ब्राह्मण म्हणवुन घेत अर्धी चड्डी घालून शिबिरात जाणारा हा आर्यब्राह्मण जाहीरपणे म्हणतो हिंदू म्हणजे सर्व समान.हे तर महा प्रचंड फेक न्यारेटिव आहे.
विरोधी पक्षा प्रमाणे खोटे न्यारेटीव घेऊन आलेल्या रावणाचा निप्पात कसा करायचा असा प्रश्न रामाला पडला होता अशी कथा सांगितली. बिबीशन ने सांगितले की रावणाच्या बेंबीत बाण मारा. देवेंद्र तुम्ही ब्राह्मण श्रेष्ठ आहेत व त्यांना शोषणाचा अधिकार आहे हे नॅरेटिव्ह घेऊन भाजप पक्ष चालवत आहात. त्याचा नीप्पात करायचा असेल तर आमच्यासारख्या मूळनिवासी शूद्रांनी कोठे बांण मारावा? हे तुम्ही सांगा. तुम्ही नाही सांगितले तरी आम्हाला माहित आहे की तो बाण लोकशाही पद्धतीने मतदान पेटी द्वारे मारला पाहिजे. तुम्हाला महाराष्ट्राची सेवा करायची म्हणजे नक्की काय करायचे आहे? भाजपला सत्तेवर आणून तुम्हाला पुन्हा ब्राह्मण श्रेष्ठत्व निर्माण करायचे आहे.
यासाठी ‘ ठोकून काढा ‘ अशी क्रूर सिंहाला शोभणारी देव वाणी तुमच्या मुखातून बाहेर पडली आहे.
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला त्याला विरोधकांचे फेक न्यारेटिव जबाबदार आहे अशी धूर्त कोल्हे कुई तुम्ही सुरू केलेली आहे. पण आम्ही ओळखलेले आहे. याला देवेंद्र फडणविस यांचे क्रूर, कावेबाज,घाणेरडे राजकारण जबाबदार आहे . हे त्यालाही माहित आहे पण त्याच्यातला ‘ राजपुत्र ‘ पेटून उठलाय.त्याला सत्ता हवी. ब्राह्मण श्रेष्ठत्व कायम राखणे साठी सोयीची व्यवस्था आणण्यासाठी !
देवेंद्रच्या दृष्टीने गुलाम/शूद्र ठरविलेले आपण काय करू शकतो?
युरोपमध्ये रेनेसांस, चीनमध्ये मावो क्रांती, जपान मध्ये मीजी क्रांती अशा घटनांनी अशा राजपुत्रांचा बंदोबस्त केलेला आहे. आपल्यालाही तो लोकशाही मार्गाने करता येऊ शकतो!
तो कसा करता येईल हे मी माझ्या अल्प बुद्धीने ‘तिसरी क्रांती’ या पुस्तिकेत मांडलेला आहे.
सुरेश खोपडे
(‘ तिसरी क्रांती’ उपलब्ध
पुस्तक वाला भाई +919503031699)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत