दातखिळ बसली आहे काय तुमची ? (काही ) लेखकांनो,विचारवंतानो आणि कवी व गायकांनो.
यश भालेराव
(9067047333 )
बाबासाहेबांच्या नंतर महाराष्ट्र आंबेडकरी चळवळी मध्ये जी एकता दिसुन येत नाही ती आजपर्यत, सर्वाचे ध्येय उद्दिष्ट सारखेच पण प्रत्येकाला संस्थापक अध्यक्ष किंवा आँफ …इंडिया अध्यक्ष असे लेबल त्यांच्या नावाच्या नंतर लावायचे असते. त्याला सपोर्ट सर्वात जास्त आंबेडकरी समाज्यातील सुशिक्षित लोक,लेखक,विचारवंत गायकांनी केला आहे, कारण विरोध करणे यांचे काम होते? जर आपण याच समाज्यातील सुशिक्षित घटक आहोत तर कोणी पण उठतो आणि पक्ष किंवा संघटना स्थापन करतो
आज डाँ.बाबासाहेब आंबेडकराना अग्रस्थानी मानणारे महाराष्ट्रातच किमान 100 च्या पुढे राजकीय पक्ष अस्तित्वात आले.
आणि वेळीच राजकीय भुमिका जर सुशिक्षितानी मांडली,विचारवंतानी,लेखकानी मांडली असती तर आंबेडकरी राजकीय 100 पक्ष झालेच नसते.
यांना वाटते कशाला विरोध करायचा.त्यांना विरोध झाला तर आपल्या सुपारया कमी होतील. भाषणातुन मिळणारे मानधन कमी होईल, कि आपली पुस्तके कमी विकले जातील यानी स्वार्थीपणाची ही भूमिका मनात ठेवल्यामुळे आपल्यात राजकीय पक्षानी शतक फार केले आहे.
बाबासाहेबांच्या नंतर आणि आताच्या या परिस्थितीपर्यत आणि या नंतर भविष्यकाळात ही आंबेडकरी राजकीय चळवळीचा वारस महाराष्ट्रात कोणाकडे पाहावे. कोणाकडे जास्त जनमत आहे .कोणता राजकीय पक्ष आंबेडकरी चळवळीची जास्त चांगली भुमिका मांडतो याविषयाचा विचार चर्चा आंबेडकरी साहित्य समेलनातुन,विद्रोही साहित्यसंमेलनातुन किंवा इतर महत्वाच्या वेळी ही घडुन आणली पाहिजेच.
पण पुढाकार कोण घेणार.
आणि आंबेडकरी चळवळीचे राजकारण यशस्वीपणे उभे राहिले पाहिजे का?
कि आंबेडकरी चळवळीने इतर प्रस्थापित राजकीय पक्षाला सपोर्ट करायचा.
कि आंबेडकरी राजकीय चळवळ उभी राहिली त्यांने स्वतंत्र अस्तित्व उभे केले कि त्यांना बी.टिम म्हणायचे. ?
कि या विषयी बोलुन आपले मत सांगितले तर आंबेडकरी राजकीय पक्षाकडुन किंवा प्रस्थापित राजकीय पक्षाकडुन आपल्याला काही मिळेल कि आपले नुकसान होईल.
आणि
जर आपण प्रस्थापित राजकीय पक्षांना जर आपण सपोर्ट केला आणि आंबेडकरी राजकीय पक्षाना सांगितले तुम्ही प्रस्थापितानाच सपोर्ट करा..
तर मग प्रस्थापित हे प्रस्थापितच आहेत. त्यांच्याकडुन चांगले मोठे पाकिट पण मिळु शकेल कि किंवा महामंडळ,किंवा पुरस्कार किंवा ते जे देतील चिरिमिरी ती पण जास्त मिळेलच कि.
त्यामुळे आपले कोणतेच व्यावसायिक नुकसान होणार नाही.
पण …पण…
आंबेडकरी विचारवंत म्हणुन नक्कीच तुम्ही कलंकित असणार.. आंबेडकरी विचाराचे कवि ,लेखक ,गायक ,किंवा सुशिक्षित म्हणुन घेण्यास तुम्ही नक्कीच पात्र नसणार…
अर्थात
स्वाभिमानी आंबेडकरी विचारांचा….
लेखक/कवि /गायक/पत्रकार/विचारवंत/ हे तुम्हाला लागु होणार नाही…अर्थातच बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी केले त्याला तुम्ही आणि तुमच्या स्वार्थीपणामुळे बाबासाहेबांवरच तुम्ही आघात केलाय… वार केलाय बाबासाहेबांच्या विचारांचाच तुम्ही खुन केलाय..
एकीकडे हे सर्वच विचारवंत लेखक, कवी, गायक, भाषण करणारे ..त्यांच्या भाषणातुन गाण्यातुन,पुस्तकातुन स्वाभिमान सांगणार,आंबेडकरी चळवळ आणि राजकारण यशस्वी झाले पाहिजे ते सांगणार आणि हेच लोक वेळ आल्यावर उंदिरासारखे बोळात लपणारे. किंवा प्रस्थापिताच्या उकीरड्यावर तुकडे चघळत बसणार,,,
मागे बरयाच लेखकांनी आणि विचारवंतानी एक यादीच केली होती सहीसह कि या आंबेडकरी विचारांच्या राजकीय पक्षानी संविधानाच्या रक्षणासाठी …. या पक्षाला साथ दिली पाहिजे..
पण ज्यांना साथ दिली पाहिजे त्यां राजकीय पक्षानी
जेव्हा आरक्षणात वर्गीकरणाचा मुद्दा आल्यावर आरक्षणात नाँनक्रिमिलेअर चा मुद्दा आल्यावर त्या प्रस्थापित राजकीय पक्षाची भुमिका काय होती.. त्याच प्रस्थापित राजकीय पक्षाची काही राज्यात सत्ता होती त्या ठिकाणी त्यांनी त्या निर्णयावर काय भुमिका घेतली. आणि आरक्षणाच्या वर्गीकरणावर व नाँनक्रिमिलेअर करणे हे आंबेडकरी चळवळीसाठी योग्य आहे का ? याविषयी ही हे विचारवंत मुग गिळुन गप्प बसलेच,.
आणि ज्या प्रस्थापित राजकीय पक्षांना संविधानासाठी साथ द्या असे बोलले त्या राजकीय पक्षाच्या प्रमुखांची या आरक्षणासंदर्भात काय भुमिका होती. हे या लेखकांनी सामुहिक पणे किंवा वैयक्तिक पणे विचारले आहे का ? कि हे विचारवंतानी तोंडात मोठा बोळा घालुन गप्प बसले आहे.
काही विद्रोही कवि, लेखक विचारवंत, बाबासाहेबांच्या जयंतीच्या वेळी किंवा जेथे संधी मिळते तेथे खुप जोरात स्वाभिमानाच्या आणि आंबेडकरी राजकारणाच्या गप्पा करतात..
पण प्रत्यक्ष निवडणुकीची वेळ येते तेव्हा हेच विद्रोही कवि गायक ,विचारवंत,लेखक उंदिरासारखे बोळात लपुन बसतात…
किंवा पाकिट घेऊन गप्प बसतात,
अरे
अशाना एकाच शब्दात सांगतो …
तो लेखक कवी गायक विचारवंत वयाने लहान असो किंवा मोठा असो कितीही विचारवंत असो किती पुस्तके लिहणारा लेखक असो.किंवा कितीही भाषण करणारा नेता असो..
तुम्ही जर आंबेडकरी राजकीय चळवळ यशस्वी करण्यासाठी तुम्ही योगदान देऊ शकत नसेल तर तुमच्यासारखे नालायक,बेशरम तुम्हीच..
सुशिक्षितानो अजुन किती दिवस प्रस्थापिताच्या उकिरड्यावरील उष्टे अन्न खाणार,, आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरी राजकीय चळवळ यशस्वी झाली पाहिजे कि नाही हे ठरवा, कि पुढील पिढी ही फक्त प्रस्थापितांच्या उकिरड्यावरील उष्टे अन्न खाण्यासाठी तयार करायची आहे..
आणि सध्या किमान महाराष्ट्रात तरी विचार करा. जे 100 राजकीय पक्ष असेल त्यातील कोणाकडे जास्त जनमत आहे त्याचा विचार करा,क्रमवारी करा1,2,3,
कोणता आंबेडकरी राजकीय पक्ष हा बाबासाहेबांचे विचार आणि संविधान रक्षणासाठी जास्त कायदेशीर असो किंवा राजकीय दृष्ट्या जास्त जागृत आहे याचा विचार करा ,
100% कोणताच राजकीय पक्ष बरोबर नसेल पण जास्तीत जास्त कोण चांगली भुमिका मांडतो.संविधानाविषयी जागरुक आहे याचा विचार करा,,
विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्यासाठी झालेल्या संघर्षात आपल्या शेकडो महिलावंर त्या प्रस्थापितानी बलात्कार केला.शेकडो घरे जाळली आयुष्यभर त्या प्रस्थापितांना आपण साथ देणार आणि ते प्रस्थापित म्हणणार
त्या विद्यापीठाला काही बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले ही माझी चुकच होती..
मग कशाला अशाच्या उकीरड्यावर जायाचे ..
आंबेडकरी विचारांच्या युवकांनो आपण आपली झोपडीच बांधायची नाही का ?
कि प्रस्थापिताच्या झोपडीच्या वळचणीलाच बसायचे का ते ठरवाच.
शेवटी 80 वर्षाचे वामनदादा असताना ही महाराष्ट्राच्या गावोगावी फिरुन बाबासाहेबांचे विचार .आपल्या गायनातुन सांगत होते:आपल्या लोकांना पेटवत होते चेतवत होते..
त्यांचे एक गाणे एकदा नक्की ऐकाच तुटतात तारा तोडु किती मी….
म्हणुन आंबेडकरी विचारांच्या माझ्या युवकाना एकच विनंती आहे.
जर हे लेखक,विचारवंत ,कवि गायक आपल्या भाषणातुन,पुस्तकातुन,गायणातुन बाबासाहेब सांगत असतात..
पण जेव्हा
राजकीय अस्तित्व दाखवण्याची वेळ येते तेव्हा जे कोणी विचारवंत,लेखक ,गायक आपली झोपडी सोडून प्रस्थापिताना मिळुन आपल्यावर टिका करणार असेल तर त्यांना चांगल्या पध्दतीने जाब विचाराच.. पण अशा संधिसाधुंना आपल्या जयंतीला किंवा कोणत्या कार्यक्रमाला भाषणाला ,गायनाला बोलवु नकाच. पण यांची पुस्तके विकत घेऊ नका कि कविता ही घेऊ नका.. त्यापेक्षा बाबासाहेबांचे मुळ लेखन वाचा…
किमान 10 हजार तरी लेखक विचारवंत झालेत .बाबासाहेब सांगतात त्यांच्या पुस्तकातुन पण प्रत्यक्ष मात्र प्रस्थापिताच्या उकीरड्यावरच उष्टे चघळत बसतात किंवा मुख्य वेळ आली कि उंदिरासारखे बोळात लपुन बसतात.
अशाना वेळीच ओळखा..
हीच अपेक्षा
आपलाच
यश भालेराव
टिपः शासकीय कर्मचारी,व अधिकारयांनो तुम्ही चांगले कमवत आहे. तुम्ही शासकीय नोकरी करत आहेत म्हणुन तुमच्यावर नक्कीच शासनाची बंधने असतात,
पण यातुन पण आपले राजकीय अस्तित्व टिकवुन ठेवायचे असेल तर काम करता करता ही बरयाच पध्दतीने आपण यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पणे सहभाग घेऊ शकतो.तुम्ही नोकरदार वर्ग असल्यामुळे तुमच्याकडुन आपली लोक अधिक चांगल्या प्रकारे ऐकु शकतात., तुम्ही तुमची नोकरी यातच अडकु नका..
1925 ला स्थापन झालेली RSS सध्या देशात त्यांचे सरकार आहे. त्यामध्ये ही बरेच सरकारी अधिकारी कर्मचारी आहेत ते पण काम करताना ही त्यांच्या भुमिका ते सांगत असतातच,, म्हणुन ते 3% असो किंवा 13 % असो तरी ही सध्या राजकीय सत्ता त्यांच्याकडे आहे..आपण इतक्या मोठ्या संख्येने असुन आपण मागे का.. याची कारणे आपण नक्कीच शोधली पाहिजेच
अति हुशार काही धार्मिक नेत्यानो आणि काही सुशिक्षितानो ज्यावेळी तुमच्यावर किंवा तुमच्या घरातील कोणावर जर अन्याय अत्याचार झाल्यावर तुमची बाजु प्रस्थापित राजकारणी घेणार नाहीत, त्यावेळी तुम्ही आंबेडकरवादी राजकीय नेत्याकडे येत असता,, आणि याच आंबेडकर वादी राजकीय नेत्यांना जेव्हा तुमची गरज आहे,त्यावेळी तुम्ही राजकीय चर्चा नको हा राजकीय ग्रुप नाही, धार्मिक असो किंवा सामाजिक किंवा समता मिळावी यासाठी आंबेडकरवादी राजकारण यशस्वी झाले तरच आपल्याला न्याय मिळु शकतो. आणि आता निवडणुकीची वेळ आली आहे,आता तरी किमान तुम्ही राजकीय जागृत व्हा हिच अपेक्षा.
प्रत्येक निवडणुकीत 55 ते 60 % ईतकेच मतदान होत असते, राहिलेले किमान 40% मतदार आपला हक्क बजावत नाही.तर यातील किमान 20 ते 30 टक्के मतदार हे मागास गरीब म्हणजेच आपलीच लोक असणार हे नक्की अशाना एक विनंती आपल्याला खुप मुश्किल ने समान मताधिकाराचा अधिकार बाबासाहेबांनी मिळवुन दिला आहे. याचा वापर करा,
तुम्ही तुमच्या मताधिकाराचा अधिकारच बजावणार नाही म्हणजे एकतर तुम्ही बाबासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली हा तर सरळ अर्थ होतोच. पण तुम्ही तुमच्या आईबापाचा आणि मुलामुलीचा अपमान तर केलाच. पण त्यांच्यावर भविष्यात होणारया अत्याचाराला ही जबाबदार तुम्हीच असणार आहे. काहीही असो तुम्ही तुमचा मताधिकाराचा अधिकाराचा वापर कराच.
आपल्या मुलांना (S,C) शिक्षणासाठी Cast validity ची 30 नोव्हेंबर 2024 ही शेवटची तारीख आहे .या तारखेपर्यत जर हे सर्टिफिकेट जमा केले नाही तर आपल्या मुलांनी घेतलेले अँडमिशनच कँन्सल होणार आहे.
तर ओबीसी. व ईतरासाठी मात्र हिच मुदत 6 महिने वाढवली आहे.
25% RTE मधुन चा मधुन लहान मुलांचे अँडमिशन प्रत्येक वर्षी आॕक्टोबर ला RTE ची लिस्ट लागली तोपर्यत कोणी अँडमिशन घेण्याचे थांबत नाही. जर RTE चे अँडमिशन वेळत झाले तर हजारो मुलांचे अँडमिशन फ्री मध्ये होऊ शकते,
हे सर्व होते आपले राजकीय प्रतिनिधीत्व नसल्यामुळे . आणि प्रस्थापित पक्षातील आपले निवडुन आलेले ही लोक हे गप्प बसत असतात
( तुमच्याकडील ग्रुप मध्ये माझा 9067047333 नं अँड कराच)
———————————-
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत