उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाचे बंड?
हजारो कार्यकर्ते रिपब्लिकन पक्ष सोडण्याच्या तयारीत?.
महादू पवार
पत्रकार ,मुंबई
9867906135
मुंबई, विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून तिकिटे मिळविण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. महायुतीचा घटक पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे पक्षामध्ये नाराजी सुरू असतानाच उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या मनमानी कारभारला वैतागून हजारो रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्ष सदस्याचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये एकच खळबळ माजलेली आहे.
उत्तर मुंबई जिल्हा हा रिपब्लिकन पक्षाचा महत्त्वाचा वोट बँक म्हणून गड ओळखला जातो. रिपब्लिकन पक्षाच्या मतांच्या ताकदीवर उत्तर मध्य मुंबईतून ह्या आधी काँग्रेस पक्ष आणि आता भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिके घेऊन निवडून येत आहेत. रिपब्लिकन पक्षाने केलेल्या कामांमुळे जनतेमध्ये मोठा जनाधार मिळालेला आहे. परंतु उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष म्हणून रमेश गायकवाड यांची निवड झाल्यानंतर त्यांनी रिपब्लिकन पक्षांमध्ये मनमानी कारभार सुरू केल्याच्या शेकडो तक्रारी वृत्तपत्रांकडे आलेल्या आहेत. रमेश गायकवाड यांनी जिल्हा अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी खोटे रिपोर्ट वरिष्ठ नेत्यांकडे पाठवून नेत्यांचीही दिशाभूल केलेली आहे. उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये कांदिवली या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे निवासस्थान होते. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष अधिक जोमाने वाढण्यास मदत झाली होती. उत्तर मध्य मुंबईमध्ये रिपब्लिकन पक्षाचे मोठे जाळे असताना नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांनी मनमानी कारभार सुरू केल्याने शेकडो कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करीत राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. या संदर्भामध्ये रिपब्लिकन पक्षाचे माजी मुंबई अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे सरचिटणीस गौतम सोनवणे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यानी यावर प्रतिक्रिया देताना सावध भूमिका घेत आमच्यापर्यंत रिपब्लिकन पक्षांची कार्यकर्ते यांची नाराजी त्यांच्या तक्रारी आलेल्या नाहीत. कार्यकर्त्यामध्ये वाद विवाद होत राहतात. त्यामुळे आम्ही बैठक घेऊन कार्यकर्त्यांची समजूत काढून योग्य तो निर्णय घेतला जाईल. महायुतीचा घटक पक्ष म्हणून चेंबूर विधानसभा रिपब्लिकन पक्षाला सोडणे गरजेचे होते. परंतु महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्ही मित्रपक्ष म्हणून काम करीत आहोत. या संदर्भामध्ये रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुरेश बारसिंगे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असतात. कार्यकर्त्यांच्या रितसर तक्रारी आल्यानंतर संबंधित जिल्हाध्यक्ष यांना नोटीसा पाठवून विचारणा केली जाईल. चर्चेतून हा प्रश्न सोडविला जाईल. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी सर्व कार्यकर्त्यांचा मान, सन्मान ठेवून काम केले पाहिजे, रिपब्लिकन पक्षाची भूमिका सर्व कार्यकर्त्यांना सांभाळून घेण्याची असून त्यामुळे चर्चेतून हा विषय सोडविला जाईल, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुरेश बारशिंगे यांनी व्यक्त केले आहे. कार्यकर्त्यांनी प्रसार माध्यमाकडे जाण्यापूर्वी पक्षश्रेष्ठ यांच्याशी चर्चा केली पाहिजे, असाही टोला सुरेश बारशिंगे यांनी लगावला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत