बाबासाहेबांच्या जयंतीला आरक्षण वर्गीकरण लागू करणाऱ्या काँग्रेसला वंचित बहुजन युवा आघाडीने वाहिली श्रद्धांजली.

आरक्षण वर्गीकरण १४ एप्रिल २०२५ पासून लागू करणारा
तेलंगणा देशातलं पहिलं काँग्रेस शासित राज्य ठरले असून अनुसूचित जाती जमातीचे संविधानिक अधिकाराचा खून करणाऱ्या तेलंगणा काँग्रेस सरकार आणि राष्ट्रीय काँग्रेसला वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्याचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी स्पष्ट केले आहे.
देशभरात जात निहाय जनगणना झाली पाहिजे, आरक्षण मर्यादा वाढवून ५०% च्या पुढे घेऊन जाऊ असे निळे कपडे घालून संविधान दाखवत काँग्रेसी नौटंकीबाज काँग्रेसने त्यांचा आरक्षण विरोधी चेहरा दाखवून दिला आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या दिवशीच तेलंगणात आरक्षण वर्गीकरण आणि क्रीमीलेअर लागू करण्याचा धोकादायक निर्णय घेण्यात आला आहे.जसे बाबरी मशीद पडण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाची निवड संघ, भाजप आणि शिवसेनेने केली होती.तेच कृत्य तेलंगणा काँग्रेस सरकारने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी केले आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी महत्प्रयासाने आपला जीव धोक्यात घालून निर्माण केलेली आरक्षण व्यवस्था संपवण्याचे काम काँग्रेसने केले आहे.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या घटना बाह्य निर्णयावर काँग्रेस कडे असलेली वकिलांची टीम आणि सत्ता ह्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणे गरजेचे होते.मात्र तेच काँग्रेस आरक्षण संपविण्याचा इतिहास घडवण्याचा अभिमान असल्याचे म्हणते आहे.अनुसुचित जाती जमाती ह्यांचे संविधानिक अधिकारी कमकुवत करणारा निर्णय घेऊन त्याचा अभिमान व्यक्त करण्यासाठी काँग्रेसने 14 एप्रिल हाच दिवस निवडून त्यांचे आरक्षण विरोधी पूर्वजांचा बदला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयाया कडून घेतला आहे.विशेष म्हणजे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे हे अनुसूचित जातीचे असून देखील काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.
दिल्लीत आपचे सरकार पडणारे, तेलंगणात आरक्षण संपविणारे कॉंग्रेस आणि भाजप ह्यात फक्त नावाचा फरक आहे. प्रवृती मात्र लोकशाही, घटना आणि आरक्षण विरोधी आहे.
वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे वतीने तेलंगणा काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसचा निषेध करीत त्यांना जाहीर श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश
9422160101
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत