चित्रपटदेशमहाराष्ट्रमुख्यपान

‘एम्पुरान’ खूप चर्चेत !

🌻रणजित मेश्राम लेखक ज्येष्ठ विचारवंत अभ्यासक साहित्यिक आणि समीक्षक आहेत

‘एम्पुरान’ सिनेमाची दक्षिण भारतात खूप चर्चा आहे. जगभरात धूम दिसते. तशी चर्चा उर्वरित भारतात नाही. सद्यस्थितीत एम्पुरान निघणे ‘धार्ष्ट्य’ म्हणावे.

हा मल्याळम सिनेमा आहे. २०१९ च्या ‘लुसिफेर’ चा ‘सिक्वेल’ ! मल्याळम सोबत कन्नड , तेलगु , हिंदी भाषेतही आहे. २७ मार्चला प्रदर्शित झाला. रितसर सेन्सॉरची परवानगी घेऊन. तरीही घेऱ्यात आला. कडव्या हिंदू संघटनांनी आक्षेप घेतले. हिंदूंना कट्टर, आतंकी , दंगेखोर चित्रित केले. हिंदुत्व नेत्याला खलनायक दाखविले. हिंदूविरोधी राजनैतिक अजेंडा दिसतो. असे आरोप झाले. प्रकरण पुन्हा सेन्सॉर बोर्डात गेले. बोर्डाने आज्ञा पाळली.

एकूण २४ दृश्य व संवादावर कात्री लागली. खलनायक बजरंगी ऐवजी बलदेव झाले. हिंदूंनी यौन शोषण केल्याचे दृश्य हटविले. राष्ट्रध्वजाच्या रंगावरील संवाद काढला. महिलेचे डोके भींतीवर आपटल्याचे पुसले. असे ते २४ आहेत.

सिनेमाच्या कथेला २००२ च्या गोध्रा हत्याकांडाची पार्श्वभूमी असल्याने प्रकरण संवेदनशील झाले आहे.

दाक्षिणात्य चित्रसृष्टीतील सुपरस्टार मोहनलाल या सिनेमाचे नायक आहेत. त्याने स्टीफन नेदुमपल्ली या नायकाची कसदार भूमिका केलीय.‌ त्याचा सहकारी झायेद मसूदच्या भूमिकेत स्वतः दिग्दर्शक सुकुमारन आहेत.
भव्य चित्रण हे या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणावे. थरार , एक्शन सारं आहे.
सिनेमाने २०० कोटीच्या वर तिकीट खिडकीवर गोळा केल्याचे वृत्त आहे. याचकाळात सिनेमा निर्मात्यावर आयकर विभागाची धाड पडल्याचे सांगण्यात येते.

     'राजापेक्षा जास्त व देवापेक्षा कमी' असा एम्पुरान चा अर्थ होतो. दरम्यान चित्रपट वादात आता राजकीय पक्षांनी उडी घेतली आहे. संघपूरक अक्षरमाध्यमांनी एम्पुरानवर टीकेची झोड उठवली आहे. मल्याळम सिनेमाला केरळ राज्याचा संदर्भ येत असल्याने प्रकरण अधिक गडद झालेले दिसते.

० रणजित मेश्राम

👤

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!