डॉ. आंबेडकरांबद्दल प्रसिद्ध व्यक्तींची मते

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त…
भाग १
👉 आम्ही डॉ. आंबेडकरांच्या जीवन आणि कार्यापासून प्रेरणा घेऊन आमचा संघर्ष सुद्धा त्याच आधारांवर चालवणार, ज्या आधारांवर डॉ. आंबेडकरांनी समाज परीवर्तनाचा प्रयत्न केला आणि यश मिळवलं.
- नेल्सन मंडेला, भारतीय संसद, १९९०
👉 डॉ. आंबेडकरांचे संविधान आणि जातीनिर्मुलनवादी लेखन ही आमची ऊर्जा आहे
- नेल्सन मंडेला
👉 डॉ. आंबेडकर अर्थशास्त्रामध्ये माझे ‘पिता’ आहेत.
- डॉ. अमर्त्य सेन, अर्थशास्त्रज्ञ
👉 भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरीकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहे.
- प्रो. एडवीन सेलिग्मन
👉 तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महापुरूष भारताला लाभले, त्यामुळे आम्हाला भारताबद्दल विशेष आदर आहे. आम्हाला बाबासाहेबांसारखी व्यक्ती लाभली नाही ही खंत आहे. बाबासाहेबांबद्दल अधिकाधिक माहिती मिळाली तेव्हा आम्हाला धक्काच बसला! जो धर्म या देशातून हद्दपार झाला होता, तो त्यांनी पुनर्जीवीत केला. डॉ. आंबेडकरांवर आम्ही एक डॉक्युमेंट्री तयार केली आहे. त्यांचे विचार हे केवळ भारतासाठीच नव्हे तर समस्त जगाच्या कल्याणासाठी आहे. त्यामुळे आता बाबासाहेबांचे विचार मी थायलंडच्या घराघरांत पोहोचवणार.
- डॉ. रूंगथिप चोटनापलाई (थाई पत्रकार व न्यूज अँकर)
👉 बाबासाहेबांबद्दल काहिही बोलणं मला असं वाटतं, जसं सूर्याला प्रकाश दाखवणं. आपण आपल्या घरांमध्ये नियम आणि कायदे नाही बनू शकत, त्यांनी एवढ्या मोठ्या देशाचे संविधान लिहून टाकले. स्वातंत्र्य मिळवणे एक गोष्ट आहे परंतु स्वातंत्र्य सांभाळणे वा टिकवणे खूप अवघड आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच आपण सारे सुरक्षित आहोत.
- जितेंद्र (अभिनेता)
👉 बाबासाहेबांचे विचार केवळ भारतासाठी नाही तर संपूर्ण जगाकरीता प्रेरक आहेत. त्यांचे राजकिय धोरण, आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनावर आधारित होते. त्यामुळे त्यांचे तत्त्वज्ञान हे विज्ञानवादी आणि मानवतावादी होते आणि म्हणूनच त्यांनी बौद्ध धम्माचा स्विकार केला.
- थनसक पुमपेच (थायलंडचे मेजर जनरल)
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ दलितांचे नेते नव्हते, केवळे भारत देशाचे नेते नव्हते तर बाबासाहेब हे संपूर्ण जगाचे नेते होते.
- अरविंद केजरीवाल
👉 भारताने स्वातंत्र्यासाठी लढा दिला तर डॉ. आंबेडकरांनी सामाजिक न्यायासाठी लढा दिला. त्यांनी लिहिलेली राज्यघटना जगात आदर्श आहे. त्यांनी लिहिलेली पुस्तके जगभर वाचली जातात.
- विजयादा राजपक्षे (श्रीलंकेचे मंत्री)
👉 तुम्ही कोण आहात, कुठून आलात हे तितकं महत्त्वाचं नाही, प्रत्येक मनुष्य त्याची क्षमता वापरू शकतो, जसे डॉ. आंबेडकरांनी स्वत:च्या आयुष्याची उंची गाठली आणि भारत देशाचे संविधान लिहून सर्वसामान्यांना त्यांचा हक्क मिळवून दिला.
- बराक ओबामा, भारतीय संसद, २०१०
👉 जर बाबासाहेब आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यांना सूर्य म्हटले असते.
- बराक ओबामा, अमेरिका
👉 डॉ. आंबेडकरांची राष्ट्राला खरी गरज आता आहे – तीही शीघ्रतेने.
- अरुंधती रॉय
👉 महिलांच्या अधिकारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तसेच गरोदर महिलांना हक्काची रजा मिळवून देणारे बाबासाहेब हे जगातील पहिलेच व्यक्ती आहेत. त्यानंतर अनेक देशांनी आपापल्या देशामध्ये गरोदर महिलांसाठी सुट्टी लागू केली.
- जब्बार पटेल
👉 राज्यघटनेला ५० वर्ष पूर्ण झाली होती; तेव्हा इंग्लंडमध्ये संविधानावर चर्चा ठेवण्यात आली होती. त्यात जगभरातील संविधानाचे तज्ज्ञ अभ्यासक उपस्थित होते. अध्यक्षस्थानी इंग्लडचे सर्वोच्च न्यायाधिश होते. चर्चेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली राज्यघटना ही सर्वश्रेष्ठ असून त्यात एक अक्षर सुद्धा बदलण्याची गरज नाही, असे मत व्यक्त करण्यात आले होते. यावरून भारतीय राज्यघटनेची सर्वश्रेष्ठता सिद्ध होते.
- जब्बार पटेल
👉 डॉ. आंबेडकर हा युवक भारतीय इतिहासाची नवीन पाने लिहीत आहे.
- एक युरोपीयन प्रवासी, ७ नोव्हेंबर १९३१
👉 डॉ. आंबेडकर बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा मूळ झरा आहे.
- गव्हर्नर रिचर्ड कॅसे
👉 डॉ. आंबेडकर म्हणजे शतकाशतकातून कधीतरी काळाला पडणारे मानवतेचे भव्य दिव्य स्वप्न होते. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते असे म्हणतात. मी डॉ. आंबेडकरांची झाले आणि माझ्या जीवनाचं सोनं झालं. डॉ. आंबेडकरांसारख्या महामानवाच्या जीवनातील उत्तरार्धात अखेपर्यंत मी त्यांना सावलीसारखी साथ दिली. काया वाचा मने करून त्यांची सेवा केली, पूजा केली. जगाला भूषण वाटावे अशा युगप्रवर्तक महापुरूषाच्या जीवनाशी माझे जीवन निगडित झाले. यापेक्षा अधिक जीवनसाफल्य ते कोणते ?
- माईसाहेब डॉ. सविता आंबेडकर
👉 डॉ. आंबेडकर हे एकटेच ५०० ग्रज्युएटांच्या बरोबरीचे आहे. स्वत:च्या मेहनतीने प्राप्त केलेली त्यांची विद्वत्ता एवढी मोठी आहे की ते ह्या विद्वत्तेच्या बळावर शासनाच्या कुठल्याही पदावर बसू शकतात.
- जनरल गव्हर्नर लॉर्ड लिनलिथगो
क्रमशः
संकलन – आर.के.जुमळे
दि.१२.४.२०२५
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत