देशदेश-विदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

बुद्धाने काय स्वीकारले?

१. बुद्धाच्या शिकवणीचे पहिले वैशिष्ट्य असे की, सर्व गोष्टींचा मध्यबिंदू मन आहे, हे त्याने मानले.
The recognition of the mind as the centre of everything.

२. मन सर्व वस्तूंच्या अग्रभागी असते. (सर्व वस्तूंत श्रेष्ठ आहे), ते सर्व वस्तूवर अंमल चालविले, त्यांची निर्मिती करते, मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूंचे आकलन होते.
If mind is comprehended all things are comprehended.

३. मन सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते. मन सर्व मानसिक शक्तीचे प्रमुख आहे. मन हे त्या शक्तीचेच बनलेले असते.
Mind is the leader of all its faculties mind is the chief of all its faculties.

४. ज्या बाबीकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे अशी पहिली बाब म्हणजे मनाचे संस्कार.
The first thing to attend to is the culture of the mind.

५. बुद्धाच्या शिकवणीचे दुसरे वैशिष्ट्य असे की, आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या आणि आपल्यावर बाहेरून ज्यांचा परिणाम होतो (उदा. सढायतन) अशा सर्व बऱ्यावाईट गोष्टींचे मन हे उगमस्थान आहे.
Mind is the fount of all the good and evil that arises within and befalls us from without.

६. जे जे वाईट आहे, वाईटाशी संबंधित आहे आणि त्याच्या आधीन आहे ते ते मनातूनच उत्पन्न होते. जे जे चांगले आहे, चांगल्याशी संबंधित आहे आणि त्याच्या आधीन आहे ते ते सर्व मनातूनच उत्पन्न होते.
Whatsoever there is of evil, connected with evil, belonging to evil-that issues from the mind. Whatsoever there is of good, connected with good, belonging to good-all issues from mind.

७. ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलांच्या पावलांमागोमाग गाडीची चाके जातात त्याप्रमाणे अशुद्ध चित्ताने जो बोलतो किंवा कृती करतो त्याच्या मागोमाग दुःख येते. म्हणून चित्तशुद्धी हे धर्माचे सार होय.
The cleaning of the mind is, therefore, the essence of religion.

८. बुद्धांच्या शिकवणीचे तिसरे वैशिष्ट्य पापकृत्ये टाळणे हे होय.
The avoidance of all sinful acts.

९. त्यांच्या शिकवणीचे चवथे वैशिष्ट्य असे की, खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून धर्मतत्त्वाचे पालन करण्यात आहे.
Real religion lies not in the books of religion but in the observance of the tenets of the religion.

१०. बुद्धाचा धर्म ही त्याची स्वतःची निर्मिती नव्हती असे कोणी म्हणू शकेल काय ?

संदर्भ: बुद्ध आणि त्याचा धम्म, खंड 1, भाग 7, साम्य आणि भेद, पान क्र. 119 (विनिमय पब्लिकेशन्स, आवृत्ती मे 2013)
TBAHD VOL.11, pg 104
धम्मपद, यमक-वग्ग-१.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!