Symbol of knowledge ज्ञानाचे प्रतीक

अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाच्या कुलगुरूंनी एक समिती निर्माण केली. आपल्या कोलंबिया विश्व विद्यालय हे जगाच्या इतिहासातील एक महत्त्वाचे विद्यापीठ आहे. या विद्यापीठाला तीनशे वर्षांचा इतिहास आहे. या तीनशे वर्षाच्या इतिहासातील सर्वात महान आणि विद्वान अशा 100 लोकांची यादी मला निवडून द्या.
समितीला खूप मोठा विचार पडला. तीनशे वर्षाच्या इतिहासातील जगातील शंभर अशा महान लोकांची यादी तयार कशी करायची. त्यांनी तीनशे वर्षाच्या त्यानी इतिहास चाळून पाहिला. त्याची महान अशी शंभर लोकांची विद्वानांची यादी तयार केली आणि ती कुलगुरूंना सादर केली.
कुलगुरूंनी ती शंभर लोकांची यादी पाहिली. त्यांना खूप आनंद झाला. कारण ती 100 लोक कोलंबिया विश्वविद्यालय या विद्यापीठातील होती.
कुलगुरूंनी त्या समितीला सांगितले आता शंभर लोकांपैकी फक्त दहा विद्वानांची यादी मला शोधून द्या.
समितीने पुन्हा शंभर पैकी दहा महान विद्वान लोकांची नावे शोधण्याचा प्रयत्न केला. आणि समितीने जगातील दहा विद्वानांची नावे शोधली आणि परत कुलगुरूंना सादर केली. ते पाहून कुलगुरूंना पुन्हा आनंद झाला कारण ते दहा विद्वान देखील याच विद्यापीठात शिकून गेलेले होते.
कुलगुरूंनी पुन्हा त्या समितीला म्हटले आता या दहा जणांपैकी सर्वात विद्वान कोण त्याचे नाव मला शोधून द्या. समिती पुढे मोठा प्रश्न उभा राहिला. समितीने त्या दहा जणांमध्ये अभ्यास केला. कारण त्यांना तीनशे वर्षांच्या इतिहासातील एक नंबर विद्वान कोण हे शोधायचं होतं.
समितीने खूप अभ्यास केला. भरपूर दिवस गेले. शेवटी समितीला 300 वर्षाच्या इतिहासातील एक नंबर विद्वान कोण हे नाव निश्चित केले. आणि तो अहवाल पुन्हा कुलगुरूंना सादर केला. आणि जगातल्या कोलंबिया विद्यापीठातल्या तीनशे वर्षाच्या इतिहासातील एक नंबरचा विद्वान म्हणून जे नाव होतं ते होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अशा या महान विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा अमेरिकेतल्या बराक ओबामा यांनी घेऊन ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. आणि ज्यावेळी बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले त्यांनी कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारा जवळ बाबासाहेबांचा पुतळा उभा केला आणि त्या खाली इंग्रजीमध्ये शब्द लिहिले आहेत. The symbol of knowledge म्हणजेच ज्ञानाचे प्रतीक
संजय सखाराम पवार
खांडोत्री
तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी
मो. न. 9137440340
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत