दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

धक्कादायक! भाजपाच्या शुद्र खासदाराला राममंदिरात प्रवेशबंदी…

वर्ध्याच्या भाजपच्या माजी खासदारास आज राम मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे गावकरी मोठ्या प्रमाणात संतप्त आणि नाराज झाले. मूर्तिच्या पूजेसाठी तडस हे गर्भ गृहात शिरत असताना पुजाऱ्याने त्यांना रोखले व मूर्तिची पूजा करता येणार नाही, तुम्ही जरा लांबच रहा, असे बजावले.

देश महासत्ता होण्याची व मंगळावर अंतरिक्षस्थानक स्थापन करण्याची भाषा बोलतोय. मात्र, दुसरीकडे अद्याप डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधी काळी अनुभवलेले अस्पृश्यपण आजही दिसून येण्याची धक्कादायी घटना घडत आहे. ते सुद्धा आज राम नवमीला आणि भाजप नेत्याच्या बाबतीत. वर्धा जिल्ह्यातील देवळीतील राम मंदिरातील ही घटना अत्यंत वाईट अनुभव देणारी आहे. भाजपचे माजी खासदार आहेत रामदास तडस.

हे राम मंदीर खूप जुने आहे. आज गावात राम नवमीची धामधूम सूरू असताना रामदास तडस व त्यांच्या पत्नी शोभा तडस तसेच काही भाजप पदाधिकारी हे राम दर्शनास या मंदिरात पोहचले. त्यावेळी पूजा सूरू होती. मूर्तिच्या पूजेसाठी तडस हे गर्भ गृहात शिरत असताना पुजाऱ्याने त्यांना रोखले. मूर्तिची पूजा करता येणार नाही, तुम्ही जरा लांबच रहा, असे बजावले. हे ऐकून तडस चांगलेच स्तब्ध झाले. काय गुन्हा त्यांना कळलेच नाही. म्हणून त्यांनी पुजाऱ्यास विचारणा केली कां बरं मी आत जाऊ शकत नाही.

तेव्हा त्या पुजाऱ्याने दटावले की की, “तुम्ही सोवळे घातलेले नाही, जानवे नाही, नेहमीच्या वस्त्रात दर्शन शक्य नाही, बाहेर निघा.” असे पुजाऱ्याचे काळजावर घाव घालणारे बोल ऐकताच बोल ऐकताच तडस यांना काहिच सुचेनासे झाले. वाद नको म्हणून ते माघारी फिरले. तडस यांनी मग सपत्नीक गाभारा सोडला. मूर्ती भोवती असलेल्या कठड्या बाहेर उभे राहून दर्शन घेतले. पूजेचे ताट हातीच राहले. मूर्तिवर त्यांना फुलं वाहता आली नाहीच…

ब्राह्मणेतर स्त्रीशुद्रातिशुद्रांना हा एकप्रकारे इशाराच आहे. भटपुरोहितांच्या सोवळेओवळे आणि बाटविटाळाच्या हिंदुराष्ट्रात तुमची हिच लायकी आहे. मानवतेच्या पातळीवरुन घसरुन उकिरड्यात लोळायचे नसेल तर माणसामाणसात भेद निर्माण करणाऱ्या विषमतावादी वर्णश्रेष्ठत्ववादी हिंदुराष्ट्राचा म्हणजेच वैदिकराष्ट्राचा नाद सोडा…

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!