रमजान सणानिमित्त संभव फाऊडेशन तर्फे रेशन किट वाटप

सोलापूर : पवित्र रमजान ईदच्या सणानिमित्त गरजू बांधवांना सण साजरा करता यावा या उद्देशाने संभव फाउंडेशनच्या वतीने धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. सम्राट चौक परिसरातील जवळकर वस्ती येथील मुस्लिम बांधवांना रेशन किटचे वाटप करण्यात आले. यावेळी फौजदार चावडी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.अरविंद माने
यांच्या हस्ते तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने, अशोक वाघमारे यांच्या हस्ते
किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये शेवाळ्या, गहू, मसूर दाळ, तूरदाळ, तेल, चहापती, साखर, रवा, तांदूळ असे साहित्य देण्यात आले. रमजान ईद निमित्त गोर-गरीब परिवारामध्ये संभव फाउंडेशन तर्फे एक सामाजिक उपक्रम करून रमजान ईदच्या उपस्थित असणाऱ्या भगिनींना
गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाची प्रस्तावना संभव फाउंडेशनचे अध्यक्ष आतिश सिरसट यांनी केली तर सुत्रसंचलन रामेश्वर इराबत्ती यांनी केली. तर आभार प्रदर्शन यासीन पटेल यांनी मानले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी सैनिक शिवपुत्र घटकांबळे,आतिश लोंढे
महेश शिवशरण,आदी मान्यवर उपस्थित होते
प्रतिक्रिया
सामाजिक बांधिलकी जोपासत रमजान महिन्याच्या या पवित्र महिन्यात समाजातील गरजू बांधवांना एक ईदी भेट म्हणून आमचा छोटासा प्रयत्न आहे गेल्या पाच वर्षांपासून या उपक्रमातून गरजू कुटुंबात पर्यंत मदत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे
आतिश सिरसट
अध्यक्ष संभव फाऊंडेशन, सोलापूर
आपला
आतिश कविता लक्ष्मण सिरसट
संभव फाऊंडेशन, सोलापूर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत