नळदुर्ग येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती कमिटीच्या प्रमुखपदी राजरत्न बनसोडे यांची निवड

विविध स्पर्धाचे करण्यात आले आयोजन
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग येथे दर वर्षा प्रमाणे या ही वर्षी बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक मध्यवर्ती जयंती कमिटीच्या प्रमुखपदी समता सैनिक दलाचे जवान राजरत्न दत्तात्रय बनसोडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे या निवडीमुळे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे . प्रथमता तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच पुजन करण्यात आले त्यानंतर बौद्धाचार्य दादासाहेब बनसोडे यांनी त्रिशरण पंचशिल दिले
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंधरवाडयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे निबंध स्पर्धा , रांगोळी स्पर्धा , वकृत्व स्पर्धा , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावरील आधारीत व्याख्यानमाला , वाद विवाद संवाद स्पर्धा , विविध गुणदर्शन , संगीत खुर्ची , ” मी रमाई बोलते” एक पात्री नाटक , भिमगितां च्या जंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आणि २७ एप्रीलला नळदुर्ग या ऐतिहासिक शहरातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे . यावेळी भिमनगर , बुद्धनगर , इंदिरानगर , डॉ आंबेडकर नगर मधील सर्व बौद्ध उपासक व उपासकानी सहकार्य करायचे आसे सर्वानूमते ठरले
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सार्वजनिक जयंती कमिटी प्रमुख राजरत्न बनसोडे विकी कांबळे, योगेश दुरुगकर , रुषीकेश कांबळे , योगेश बनसोडे , कुमार सुरवसे
सुरज कांबळे आदीची निवड एकमताने करण्यात आली या निवडीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कामगार संघटनेचे नेते खंडु गायकवाड हे होते यावेळी रिपाई चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे , सचिन बनसोडे , ओमप्रकाश बनसोडे , किशोर बनसोडे , सचिन कांबळे , महादेव कांबळे , कुणाल कांबळे , प्रकाश गायकवाड , दिलीप भांगे , फुलचंद सुरवसे , सत्यशिल नळदुर्गकर , बापू दुरुगकर , आदिसह नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दादासाहेब बनसोडे यांनी मानले .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत