कायदे विषयकदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

तू म्हणतोस ना ?संविधान तुझं आहे,

तू म्हणतोस ना ?
संविधान तुझं आहे,
बरं ठीक आहे ,
माझं तर माझं ,

पण, माझ्या संविधानात,
तूला ही मान आहे ,
पण ,तूझ्या धर्मग्रंथात ,
मला कुठे स्थान आहे , ??

मंदिर तुझं , देव तूझा ,
आणि पुजारी ही तूझाच ,
माझं फक्त पेटीत दान आहे ,

तूझ्या त्या ग्रंथात, ——–
महाराच्या घरात महार,
मांगाच्या घरात पोतराज मांग,
चांभाराच्या घरात चांभार,
भंग्याच्या घरात भंगी,
कुंभाराच्या घरात कुंभार,
न्हाव्याच्या घरात न्हावीच ,
जन्म घ्यायचा ,
बरं का मित्रा ———-,

आता ,

माझ्या संविधानात, ———–,
महार, मांग, चांभार,
कुंभार, भंगी, ब्राम्हण,
तेली, तांबोळी,
साळी, माळी, कोळी,
लोहार, सुतार,
धनगर, वंजारी, बंजारी,
भटके-विमुक्त, आदिवासी, कातकरी ,
अठरा पगड शुद्रातिशुद्रा ,
जातीच्या घरात ,
डाॅक्टर, इंजीनियर, मास्तर,
लेखापाल, रोखपाल ,
आयपीएस ,आयएएस,
वकील, न्यायाधीश,
मॅनेजर , उद्योजक ,शास्त्रज्ञ ,
आमदार, खासदार, मंत्री,
जन्म घेतात मित्रा———–,

हेच तर संविधानाचं योगदान —-

पण ,

तूझ्या त्या ग्रंथात ——————,
कुत्र्याला भाकर,
आणि मुंगीला साखर ,
सापाला दूध,
आणि माणसाला गायीचा मू…..,
कुठे आहे रे ,
माणसाची जाण , —?

तूझी ती ,
निच-संकुचित मानसिकता ,
कधीच बदलत का नाहीस रे ,
आणि मग ,
गटारातून बाहेर यावी घाण,
तसा तूझ्या मनातल्या ,
जळफळाटाचा उद्रेक होतो ,
आणि तू ,
संविधान बदलण्याची ,
भाषा बोलतो ,
संविधान बदलण्याची ,
भाषा बोलतो ,———–,

Im first INDIAN & Last INDIAN
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!