देशदेश-विदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

महाबोधी महाविहार आंदोलन– अशोक सवाई

(बौद्धांची ऐतिहासिक विरासत)

वैशाख पौर्णिमा ही बौद्धांसाठी अतिशय पवित्र व वंदनीय मानली जाते. याच पौर्णिमेला सिद्धार्थ म्हणजे तथागत गौतम बुद्धांचा जन्म झाला. याच वैशाखी पौर्णिमेला बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली. व याच पौर्णिमेला बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले. म्हणून बौद्धांसाठी वैशाख पौर्णिमेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेव्हाच्या गयाला पिंपळ वृक्षाखाली बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती. म्हणून पिंपळ वृक्षाला बोधीवृक्ष म्हणतात. आज बिहार मधले ते स्थळ साऱ्या जगात बौद्धगया या नावाने ओळखले जाते. जगातील बौद्ध राष्ट्रे व इतर देशात ज्या ज्या ठिकाणी बौद्ध अनुयायी/बौद्ध समाज आहे. त्या सर्वांंचे श्रद्धास्थान म्हणजेच बौद्धगया होय. जसे इतर धर्माचे त्यांचे त्यांचे धार्मिक स्थळे आहेत तसेच बौद्ध गयेतील महाबोधी महाविहार हे बौद्धांचे धार्मिक श्रद्धा स्थळ आहे. ते आजपासून साधारण अडीच हजार वर्षांपूर्वी पासून बौद्धांची ऐतिहासिक विरासत/वारसा आहे. पण तिथल्या महाबोधी महाविहारात आयते नागोबा सारखे ब्राह्मण लोक ठाण मांडून बसले आहेत. धडधडीत सारे पुरातत्त्वीय पुरावे बौद्धांच्या बाजूने असूनही

बौद्ध गया मधील ब्राह्मणांनी तेथे घुसखोरी करून त्या स्थळावर अवैध रीतीने व जबरदस्तीने कब्जा केला आहे. काय म्हणावे याला? तेथे ब्राह्मण भडमभुंजाचे काम काय आहे?त्यांच्या मंदिरात कोणीतरी गैर ब्राह्मण पुजारी बनून घुसला असता तर या लोकांनी दुनियाभऱ्याच्या बोंबा ठोकून आकाश पाताळ एक केले असते. म्हणजे माझं आहे ते मी खातोच खातो शिवाय तूझेही मीच खातो. अशी या विदेशी ब्राह्मणांची नीच वृती आहे. म्हणून ते कधीही आत्मसमाधानी नसतात. त्यामुळे त्यांना शांत झोप लागत नाही. कोणतीतरी अनाहूत भीती सारखी सतावत असते त्यांना. बिहार मध्ये महाबोधी महाविहार मुक्तीचे आंदोलन होत असले तरी भारी आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्या शिवाय ते महाविहार सोडणार नाहीत. असे त्यांच्या चिवटपणा वरून वाटते. त्याची दोन मुख्य कारणे आहेत. पहिले कारण महाविहारासाठी देश विदेशातून खूप म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणात दान किंवा अर्थ सहाय्य मिळते. खास करून बौद्ध देशांकडून त्याचा उपयोग ते धम्म कार्यासाठी किंवा बहुजनांच्या कल्याणासाठी न करता अवैध व मनमानी तऱ्हेने अर्थात फक्त त्यांच्या हितासाठी/स्वार्थासाठी उपयोग करून घेतात. दुसरे कारण असे की महाविहार त्यांच्या कब्जातून मुक्त झाले तर पुढे एक एक करून जसे जगन्नाथपुरी, सोमनाथ मंदिर, बालाजी मंदिर, महाराष्ट्रातील पंढरपुरचे विठ्ठल मंदिर, अयोध्येतील राममंदिर असे त्यांना बेसुमार धनलाभ मिळून देणारे मंदिरेही त्यांच्या हातातून निसटून जाण्याची त्यांना भयंकर भिती वाटत आहे. म्हणून महाबोधी महाविहारावरील ताबा सोडण्यास ते सहजासहजी तयार होणार नाहीत. कथेतील राजाचा जीव जसा पोपटात असतो तसाच ब्राह्मणांचा जीव मंदिरात अडकलेला आहे. जर सर्व मंदिरे (खरे बौद्ध विहारे व बौद्ध प्रतिके) त्यांच्या तावडीतून सुटले तर त्यांनीही जीव सोडला म्हणून समजा. मंदिराशिवाय हे धनलोभी ब्राह्मण जगूच शकत नाहीत.

            इतिहासकार प्रा. विलास खरात व डॉ. प्रताप चाटसे *विज्ञानाचा निकाल: ब्राह्मण विदेशी असल्याचे डि. एन. ए. संशोधनाने सिद्ध* या आपल्या संपादन केलेल्या पुस्तकात पान नं. ६० वर म्हणतात "भारताची सिंधू संस्कृती ही जगातील प्राचीन संस्कृती आहे. ती इ. स. पूर्व ६००० ते ४००० च्या दरम्यान विकास पावली होती. इ. स. पूर्व ३१०० मध्ये युरेशियन ब्राह्मणांनी खैबर खिंडीच्या मार्गाने भारतावर आक्रमण केले आणि सिंधू संस्कृती नष्ट केली. त्यांच्यामध्ये आणि मूलनिवासी भारतीयांमध्ये एक हजार वर्षांपेक्षा सुद्धा अधिक वर्षे संघर्ष चालला आणि इ. स. पूर्व १५०० च्या दरम्यान तो संघर्ष समाप्त झाला. आक्रमक ब्राह्मणांनी मूलनिवासी भारतीयांना पराभूत केले आणि त्यांना 'शुद्र वर्णा' मध्ये गुलाम बनविले." ही सिंधू संस्कृती किंवा सभ्यता सिंधू नदीच्या काठावर वसलेली होती. कारण इतिहासात जिथे पाण्याचा स्रोत असेल तिथेच लोकवस्ती वसत असे. 

            तर अशा या जगातील प्राचीन व समृद्ध संस्कृतीत युरेशियन ब्राह्मणांनी खैबर खिंडीमार्गे प्रथम घुसखोरी केली. व तेथून साऱ्या भारतभर घुसखोरी करत करत पसरत गेले. आज त्यांनी बहुजनांच्या प्रत्येक क्षेत्रात घुसखोरी केलेली आहे. त्यापैकी काही प्रमुख ठिकाणे पहा. १) बौद्ध विहारात घुसखोरी करून तेथील बुद्ध मूर्ती व बौद्ध प्रतिकांना त्यांच्या काल्पनिक देवदेवतांचे स्वरूप देऊन विद्रृप करून ठेवले. तिथे वैदिक पध्दतीने त्या मुर्त्यांची पूजाअर्चा व पिंडदानासारखे कर्मकांड केले जाते. तेथे पुजारी बनून बहुजनांना येडंपिसं करून धन लुबाडत बसले. २) बौद्ध भिक्खूं मध्ये घुसखोरी करून नकली भिक्खू बनून बौद्ध समाजाची दिशाभूल करून त्यांना कर्मकांडाकडे वळवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. ३) बहुजनांच्या संघटनांमध्ये घुसखोरी करून  संघटन प्रमुख किंवा सल्लागार (त्यांचा सल्ला कोणत्या पद्धतीचा असेल हे सांगणे न लागे) बनले. नंतर जाती जातीत आपसात भांडणे लावून त्यांच्या संघटना  देशोधडीला लावल्या. ४) देशाच्या विधायीका, कार्यपालिका, न्यायपालिका व मिडियात घुसखोरी करून घटनेविरोधी कामे केलीत. ५) देशाच्या संरक्षण विभागात घुसखोरी करून तेथील अत्यंत गोपनीय डाटा शत्रू राष्ट्राला पुरवला. आठवा त्या प्रदिप  कुरूळकरचा प्रताप. ६) प्रशासनात मुख्य पदासाठी अवैध रीतीने घुसखोरी करून तेथे घटने विरुद्ध काम करून लोककल्याणकारी योजनांचे तीन तेरा वाजवले. व लोक विरोधी कामे केलीत. ७) शिक्षण क्षेत्रात घुसखोरी करून शिक्षणाचा बोऱ्या वाजवला/सत्यानाश केला. अशा रीतीने देशातील तमाम ठिकाणी घुसखोरी करून बहुजनांना ऊल्लू बनवण्याचे काम केले व त्यातून अवैध रीतीने बेसुमार धन लुटले, अर्धाअधिक देश विकला. व आपले गाप्टं भरले. एवढे की आज जर त्यांच्याकडील देश विदेशात धनदौलतीचा शोध घेतला तर ते घबाड एवढे निघेल की, त्यातून देश संपूर्ण कर्जमुक्त होवून जगातील एक अव्वल दर्जाचा विकसित देश बनू शकतो सम्राट अशोकाच्या काळातील 'सोने की चिडिया' म्हणा वाटल्यास. एकंदरीत  त्यांनी आज देशाचा सत्यानाश करून ठेवला. देशाला शंभर वर्षे मागे नेवून ठेवले. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. २०१४ पासून त्यांच्या देशविरोधी कामाला चांगलीच गती आलेली  आहे. ज्यांना देशाविषयी, देशातील महापरुषां विषयी देशातील जनतेविषयी प्रेम नाही तरीही त्यांना कोणत्या तोंडाने देशप्रेमी म्हणता येईल? देशद्रोही आहेत ते देशद्रोही. त्यांचा डीएनए मूळातच घुसखोरीचा व चिवट आहे असा त्यांचा इतिहास सांगतो. आणि इतिहासाला लांडीलबाडी करून त्यांच्यासारखे खोटेनाटे बोलण्याची सवय नाही. तर ही आहेत त्यांची काही वानगीदाखल उदाहरणे. या देशाचा सातबारा सम्राट अशोकाच्या नावावर आहे. आणि वारसा हक्काने इथला मूळ निवासी बहुजन या देशाचा मालक आहेत. युरेशियन किंवा विदेशी ब्राह्मण या देशात उपराईचे फकीर आहेत. आश्रित  आहेत. त्यांचे स्वतःचे असे इथे काहीच नाही. हां त्यांच्याकडे काय आहे तर बाजिंदेपणा, (खोटेपणा) बेजबाबदारपणा  चोट्टेपणा, कपटीपणा, छद्मीपणा, लुच्चेपणा, धनलोभीपणा, बेशरमपणा, अनैतिकता, अश्लीलता, नग्नता  असे सारे समाज विरोधी 'पणा'चे अवगुण त्यांच्यात ठासून भरले आहेत. अर्थात त्यांच्यातही काही याला अपवाद आहेत सरसकट नाहीत.

            महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी बिहार मधील बुद्धगया येथे दि. १२ फेब्रुवारी पासून बौद्ध भिक्खू/भिक्खूणी, बौद्ध अनुयायी, उपासक/उपासिका एकंदरीत देशातील तमाम बौद्ध समाज महाबोधी महाविहार येथे उपोषणे, आंदोलने शांततेच्या मार्गाने  करीत आहेत. या आंदोलनाला ब्राह्मण सोडून देशभरातील एससी/एसटी/ओबीसी व मायनाॅरिटीज अशा सर्व स्तरातील व सर्व जातीधर्मातील जनतेचे समर्थन मिळत आहे. क्षात्रधर्म संघटनेच्या प्रमुखाने तर बाकायदा लिखित स्वरूपात समर्थनाचे पत्र संयोजकांकडे पाठवले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व इतिहासकार प्रा. डॉ. विलास खरात करीत आहेत जे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय संयोजक आहेत. आजच्या तारखेत हे आंदोलन साऱ्या देशभर पसरले आहे. अगदी जिल्हा/तहसील पातळीवर ठिकठिकाणी उपोषणे, धरणे, आक्रोश मोर्चे, रॅली, आंदोलने होत आहे. प्रत्येक जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे निवेदने देण्यात येते आहेत. आमच्या पुण्यात तर बालगंधर्व ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर अतिशय भव्य स्वरूपात पंचशील झेंडे घेऊन पैदल (पायी) रॅली काढण्यात आली. रॅलीत बुद्धम्... शरणम्... गच्छामीचे मंगलमय सूर घुमत होते. एवढेच नाही तर हे आंदोलन आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचले आहे. बौद्ध राष्ट्रातील बौद्ध भिक्खू संघ महाबोधी महाविहारात येवून उपोषणाला बसले आहेत. त्यातून ते महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी त्या त्या बौद्ध राष्ट्राचे समर्थन असल्याचे दर्शवत आहेत. यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध राष्ट्रात बौद्ध परिषदेसाठी जात होते. बाबांची दूरदृष्टी बघा, जर भविष्यात भारतीय बौद्ध लोकांना काही अडचण निर्माण झाली  तर त्यांना बौद्ध राष्ट्रांकडून मदत मिळावी/समर्थन मिळावे यासाठीच ते बौद्ध परिषदेला जावून भारतीय बौद्धांना बौद्ध राष्ट्रांशी जोडून घेत होते. आज त्यांच्यामुळेच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला बौद्ध राष्ट्राचे भरभरून समर्थन मिळत आहे. जाता जाता सुद्धा हे अखेरचे फार मोठे उपकार त्यांनी भारतीय बौद्ध समाजावर करून ठेवले आहेत. अजून किती उपकार करावेत त्यांनी?

            बरं बौद्ध राष्ट्रेच नाही तर इतरही राष्ट्र महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. त्यात अमेरिका, कॅनडा, बांगलादेश, थायलंड, लाओस, श्रीलंका, म्यानमार, तैवान, ब्रिटन सारखे राष्ट्र आहेत. अमेरिकेच्या मिशिगन राज्यात भारतातील महाबोधी महाविहार ब्राह्मणां पासून मुक्त होण्यासाठी हल्लाबोल आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनात तिथल्या एका पत्रकाराने आंदोलन कर्त्याला प्रश्न विचारला की तुमच्या मागण्या काय आहेत? त्यावर तो म्हणाला आमच्या प्रामुख्याने तीन मागण्या आहेत १) महाविहाराचे पूर्ण नियंत्रण व प्रबंधन बौद्धांकडे द्यावे

२) बौद्धगया अधिनियम १९४९ रद्द करावे
३) बौद्ध धार्मिक मामल्यात राज्य सरकारचा हस्तक्षेप समाप्त करावा. यानंतर दुसऱ्या पत्रकाराने विचारले जर सरकारने नाही ऐकले तर? तेव्हा तो म्हणाला आम्ही सर्व बौद्ध राष्ट्रे हा विषय संयुक्त राष्ट्र संघाकडे घेऊन जावू नाही तर आंतरराष्ट्रीय न्यायालयात जावू. म्हणजे जागतिक बौद्ध लोक ही आरपारची लढाई लढून जिंकण्याच्या तयारीत आहेत. आंतरराष्ट्रीय नामुष्की ओढवून घेण्यापेक्षा प्रधानमंत्र्यांनी या विषयात तातडीने लक्ष घालून महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करून तो ताबा सुखरूप पणे व सन्मानाने बौध्दांकडे द्यावा. तसेच आपण बहुजनही नुसते जगातील राष्ट्रावर अवलंबून न राहता आंदोलन सफल करण्यासाठी आपण आपल्या परीने या आंदोलनात सहभाग नोंदवला पाहिजे. आपल्या शक्ती प्रमाणे आर्थिक मदत केली पाहिजे. जोपर्यंत आपण त्यात सफल होत नाही तोपर्यंत.

संदर्भ: विज्ञानाचा निकाल: ब्राह्मण विदेशी असल्याचे डि. एन. ए. संशोधनाने सिद्ध, संपादन प्रा. विलास खरात/डॉ. प्रताप चाटसे

अशोक सवाई.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!