मुख्यपानराजकीय

जाळपोळ करणाऱ्यांच्या विरोधात 307 कलम लावणार — उपमुख्यमंत्री फडणवीस

मराठा आंदोलन चिघळत असताना जिथे जाळपोळीच्या घटना घडल्या तिथे मुळीच गय करणार नाही. बीडमध्ये आमदारांची घरे गाड्या जाळणाऱ्यांची ओळख सीसीटीव्ही फूटेजमधून पटवण्यात येत असून असे प्रकार करणाऱ्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचे ३०७ कलम लावून कठोर कारवाई केली जाईल असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती मंत्रिमंडळ बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस पसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

आज दुपारी मंत्रिमंडळा बैठकीत पुढील महत्वाच्या विषयांवर निर्णय झाल्या नंतर अधिकाऱ्यांना बैठक दालना बाहेर जाण्यास सांगण्यात आले व त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांबरोबर राजकीय चर्चाही केली. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे डेंग्यूने आजारी असल्याने मंत्रिमंडळ बैठकीस उपस्थित नव्हते.

हवामान आपत्तीमध्ये आपदग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी सर्वांचा समन्वय महत्वाचा पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमदार क्षीरसागर तसेच आमदार प्रकाश सोळंकी यांच्या घरांवर जे हल्ले झाले, जी जाळपोळ झाली तो जीवे मारण्याचाच प्रयत्न होता. पोलिस अशा प्रकाराची गय करणार नाहीत. यात काही राजकीय पक्षाचे कार्यकर्तेही आढळून येत असून त्या सर्वांना ताब्यात घेईपर्यंत पोलिस कारवाई थांबणार नाही. राजकीय कार्यकर्ते कोण होते कोणत्या पक्षाचे होते याची माहिती लवकरच दिली जाईल असेही सांगितले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!