सरकार आणि प्रशासनाचा जाहीर निषेध

मंगेश अडसुळे…..
9833613374
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी लाखो जनसमुदाय आपल्या मुक्ती दात्याला वंदन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून चैत्यभूमी वर दाखल होतो.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणाऱ्या जनसमुदायाला पुस्तके, प्रबोधनात्मक साहित्य उपलब्ध व्हावे तसेच भोजनाची व्यवस्था व्हावी या साठी स्टाॅल लावले जातात सदर स्टाॅल वर सरकार आणि प्रशासनाने *जी एस टी कर* लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय निषेधार्थ असून आंबेडकरी अनुयायावर अन्याय करणारा आहे. सरकारने घेतलेला निर्णय ताबडतोब मागे घ्यावा असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे. अन्यथा सरकारला या निर्णयाचे परिणाम भोगावे लागतील.
सरकार कुंभ मेळ्यावर करोडो रुपये खर्च करते. तेव्हा सरकारला शहाणपण सुचत नाही परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी होणाऱ्या धार्मिक कार्यात जाणूनबुजून जी एस टी चे नियम लावून महापरिनिर्वाण दिनाचे महत्त्व कमी करण्याचा डाव आखला जात आहे. सरकारचा हा डाव आंबेडकरी समुदाय हानुन पाडल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही.
⚫ सरकार आणि प्रशासनाचा जाहीर निषेध ⚫
आपला – मंगेश अडसुळे…
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत