देशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

मराठ्यांच्या उकिरड्यावर उगवलेले तरोटे.

छावा सिनेमा पाहून जो तो उठतो,म्हणे चंद्रराव मोरे आणि गणोजी शिर्के हे फंदफितुर झाले.म्हणून औरंगजेब ने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा छळ केला.हा इतिहास असेलही.खरा असला तरीही तुम्ही आता काय करू शकतात?
पराक्रम छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी केला.आणि आता ऐरेगैरे,नथ्थू खैरे मराठा म्हणून पोळी शेकत आहेत.हे खरोखरच मराठे आहेत का?राजाची आणि बाप दादांची जात एक असली म्हणून स्वतःला मराठा घेणे कितपत खरे ठरते?ते पहा निरखून.
इतिहास पुन्हा पुन्हा घडतो.त्यातील इव्हेंट विभिन्न असतात पण थीम एकच असते.तसाच इतिहास पुन्हा घडला आहे.फडणणवीस ,शिंदे , पवार यांच्या हाती सत्ता असतांनाच बीड मधे एक सरपंचाचे हाल सेम टू सेम छत्रपती संभाजी महाराजांसारखे केले.शिंदे आणि पवार सत्तेत असतांनाच हा प्रकार घडला.कुठे गेले होते हे शिंदे आणि पवार?गुत्त्यावर कि कोठीवर?
तरीही म्हणे एकनाथ शिंदे मराठा आहेत.छे! हे मराठ्यांना लांछन आहे.या माणसाने शिवसेनेशी गद्दारी केली आणि दिल्लीचा बादशहा मोदींना जाऊन मिळाले.हा माणूस कसला मराठा?मला नाही वाटत.
हेच एकनाथ शिंदे फडणवीस यांच्या सोबत मुख्यमंत्री बनलेत.तर आम्ही स्वतः यांचे मुंबईतील बंगल्यावर जाऊन भेट घेतली.सांगितले , गुलाबरावला मंत्री बनवू नका.खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे.तर शिंदे म्हणाले, “भ्रष्टाचार न केलेला एकही आमदार माझ्या सोबत नाही. तर मग मी कोणाला मंत्री बनवू?” असे निर्लज्ज उत्तर ऐकून मी कोणत्या तोंडाने यांना मराठा म्हणायचे?म्हटले तर मान्य करावे लागेल कि ,मराठा चोर आहेत.मराठ्यांना चोर आवडतात.असे मान्य करावे लागेल.कोणी मान्य करो अथवा न करो पण शिंदेंनी ते सिद्ध करून दाखवले आहे.
आता शिंदेंच्या गॅंगमधील गुलाबराव पाटील यांच्या माणसांनी पाळधी गावात दंगल घडवली.२२ दुकाने जाळलीत.गुलाबराव पाटील यांचा राजीनामा घेऊन चौकशी केली पाहिजे.शिंदे आणि पवार यांनी एकदाही पाहाणी केली नाही.कुठे रमले आहेत?गुत्त्यावर कि कोठीवर?वाटत नाही,हे मराठे आहेत.
दुसरा जातीवंत,कुलवंत माणूस म्हणजे अजित पवार.या माणसाला काकांनी बोट धरून राजकारण शिकवले.इतरांना डावलून मंत्री बनवले.उपमुख्यमंत्री बनवले.जलसंपदा मंत्री, बांधकाम मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री बनवले.शेवटी अजितदादाने लायकी दाखवलीच.या माणसाने काकांशी गद्दारी केली.शिंदेंनी आकाशी गद्दारी केली.मराठा म्हणवून घेणाऱ्यांनो, साक्षात चंद्रराव आणि गणोजी तर तुमच्या समोर आहेत.काय केले तुम्ही?
संतोष देशमुख एक सरपंच.त्या माणसाचा याच अजित पवारांच्या माणसांनी अमानुष खून केला.औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजांचे जे हाल केले त्यापेक्षा जास्त राक्षसी कृत्य आज घडले आहे.ते ही एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मंत्री पदाच्या काळात.काय करून घेतले यांनी?काहीच नाही.हे मंत्री मेल्यानंतर यांचे पोस्ट मार्टेम केले पाहिजे.यांच्या देहात हृदय आणि काळीज आढळणार नाही.आढळले तर ते राक्षसाचे असेल.
आमदार धस, आमदार क्षिरसागर, आमदार आव्हाड, अंजली दमानिया यांनी हे प्रकरण चव्हाट्यावर आणले‌.तरीही शिंदे आणि अजित पवार चूप कसे?कुठे गेले होते ?गुत्त्यावर कि कोठीवर?
मोदी आणि फडणवीस यांना संपूर्ण महाराष्ट्र दोष देतो.आहेतच दोषी.पण मराठा म्हणवून घेणारे शिंदे आणि अजित पवार याला जबाबदार आहेतच.हेच ते चंद्रराव आणि गणोजी.
छत्रपती संभाजी राजांना एकटे गाठून औरंगजेबाने हाल हाल करून मारले.जितका दोष औरंगजेबाला देतात तितकाच दोष फडणवीस यांना दिला पाहिजे.फडणवीस गृहमंत्री असताना हा अमानुष प्रकार घडला. फडणवीस यांची मोहिम “मिशन मराठा” तपासून पाहिली पाहिजे.त्यांना दोन बकरे गळी लागलेले आहेत.एकनाथ शिंदे आणि अजित पवार.कोण म्हणेल हे मराठे आहेत? कोणत्या व्याखेत हे मराठे वाटतात? मराठ्यांच्या उकिरड्यावर उगवलेले तरोटे.
मराठ्यांनो, पुस्तकात जगू नका.वास्तवात जगा.इतिहास बदलता येत नाही. वर्तमान घडवता येते.

…. शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव
५/३/२०२५

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!