नळदुर्ग येथील लाईनमन दिनानिमित्त शहरातील लाईनमन कर्मचाऱ्यांचा सत्कार.

डोळ्यात तेल ओतून व तारेवरची कसरत करत करावी लागतात कामे
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग नळदुर्ग येथील माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते विनायक अहंकारी यांनी आज लाईनमन दिनाच्या निमित्ताने नळदुर्ग महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र करून सत्कार गुण गौरव करण्यात आला
दि. ४ मार्च रोजी सर्वत्र लाईनमन दिवस साजरा करण्यात आला नळदुर्ग येथेही विनायक अहंकारी यांच्या संकल्पनेतुन लाईनमन दिनानिमित्त पहिल्यांदा वीज वितरण कंपनी कार्यालयातील लाईनमनचा सत्कार करण्यात आला.
यावेळी वीजवितरण कंपनीच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार विलास येडगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन पत्रकार उत्तम बनजगोळे. सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव,विकास सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे. पत्रकार दादासाहेब बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे हे उपस्थित होते.
महावितरणचे कर्मचारी आहोरात्र डोण्यात तेल घालुन नागरीकांना सेवा देतात . कर्मचाऱ्याना त्यांच्या कामात जिव धोक्यात घालून तारेवची कसरत करून जीव मुठीत घेऊन कामे करावी लागतात म्हणून या कर्मचाऱ्यांचा गौरव झाला पाहिजे या हेतुने विनायक अहंकारी यांनी या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी
आर. एम. सोळंके, किशोर शिंदे ,प्रसन्ना कदम, अजितकुमार कानडे, आंबादास काळे, सागर कौरव, विनोद चौधरी,सतीश घोडके, अमोल डोंगरे,महेश जाधव,रवी चव्हाण, आकाश डुकरे, तुषार गायकवाड, श्रीराम जाधव, योगेश सुरवसे, प्रशिक बनसोडे, कुणाल पवार,रीतेश सोनकांबळे,मल्हारी कोकरे,नागेश पांचाळ,अविनाश राठोड,शुभम गायकवाड, समर्थ बिराजदार ,सोनु बनसोडे,संदीप बेळबे , गणेश सोनटक्के, बालाजी जाधव, अंकुश कारले,उदभाळे मारुती,प्रदीप बेळंबे,गोरख चव्हाण या कर्मचाऱ्यांचा लाईनमन दिनानिमित्त विनायक अहंकारी व सर्व मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नळदुर्ग शहरात पहिल्यांदाच लाईनमन दिनानिमित्त आपला सत्कार झाल्याने सर्व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडुन दिसत होते .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत