दिन विशेषदेशमराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी सर्वोतोपरी मदत देणार :- पालकमंत्री

नळदुर्ग शहरासाठी बस डेपो जागा दया बस डेपो घ्या

पालकमंत्र्याचे नळदुर्ग करांना अश्वासन

लाडकी बहीण व लाडक्या भावानी इतिहास घडविला या मुळेच मी पालकामंत्री झालो

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

नळदुर्ग शहर एक ऐतिहासिक शहर म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला चांगलीच ओळख आहे ,नळदुर्ग किल्ला हा धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते,दरवर्षी लाखो पर्यटक व भाविक नळदुर्ग शहरात किल्ला पाहण्यासाठी,व देवदर्शनाला पर्यटक येतात शहराला दोन राष्ट्रीय महामार्ग लाभले असून,परिसरातील ६० गावांतील नागरीकांचा नळदुर्ग शहरात दळणवळण यंत्रणा उभी केली जाते अशा या ऐतिहासिक नळदुर्ग शहरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळा उभारावा हा पुतळा उभारण्यासाठी कुठलीच मदत कमी पडु देणार नाही शिवाय नळदुर्ग शहरासाठी नळदुर्गकरांनी बस डेपोची मागणी केली बस डेपोसाठी जागा दया बस डेपो घ्या आशी भावना धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली . याच बरोबर महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणीनी व लाडक्या भावानी इतिहास घडविला भरभरून महायुतीला पाठिंबा दिला त्यामुळेच मी आज धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री झालो जिल्हयाचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी बहीण भावाचे तोंडभरून कौतुक केले . यावेळी उमरगा लोहाऱ्याचे आमदार प्रविण स्वामी , माजी आमदार ज्ञानराज चौगुले , माजी खासदार रविंद्र गायकवाड , संताजी चालुक्य , सुधिर पाटील , नितीन काळे , अनिल खोचरे , नितीन लांडगे , मोहन पणुरे , धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश हरदास , डॉ अर्चना भोसले उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडल लातूर , धनंजय चाकुरकर जिल्हा शल्य चिकित्सक , डॉ इस्माईल मुल्ला डॉ सुरेंद्र मडके , शेषेराव चव्हाण कार्यकारी अभियंता सा बा धाराशिव , बाबासाहेब थोरात अधिक्षक अभियंता सा बा मंडळ धाराशिव सह परिचारीका उपस्थित होत्या
५० खाटाचे उपजिल्हा रुग्णालय नळदुर्ग व इतर आरोग्य संस्थाचे लोकार्पण सोहळा संपन्न करण्यात आला .
अनेक वर्षांपासून आहे नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय असे नामकरण करण्यात यावे हि भावना सुद्धा शिवभक्त नागरीकानी व्यक्त केली .
त्याच अनुषंगाने समस्त नळदुर्ग शहर वासियांच्या वतीने सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन,उपजिल्हा रुग्णालयाच्या उदघाटन प्रसंगी राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे आले असता त्यांना ह्या मागण्याचे निवेदन देण्यात आले,यावेळी शिवसेना उबाठाचे कमलाकर चव्हाण,काँग्रेसचे नेते माजी नगराध्यक्ष शहबाज काजी,रा.कॉ.पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष शफी शेख,माजी नगराध्यक्ष उदय भाऊ जगदाळे भाजपाचे सुशांत भूमकर,माजी उपगराध्यक्ष इमाम शेख रिपा ईचे मराठवाडा उपाध्यक्ष दुर्वास बनसोडे , जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे , शहर कार्याध्यक्ष महादेव कांबळे , शिवसेना उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर घोडके,मनसेचे शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शिवसेना उबाठाचे शहर प्रमुख संतोष पुदाले,माजी नगरसेवक बसवराज धरणे,मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,माजी नगरसेवक विनायक अहंकारी,शिवसेना उबाठाचे सरदारसिंग ठाकूर,दत्तात्रय कोरे,माजी नगरसेवक सुधीर हजारे,शशिकांत पुदाले,उमेश नाईक,संजय जाधव,पत्रकार संघांचे अध्यक्ष सुहास येडगे,जेष्ठ पत्रकार विलास येडगे,लतीफ शेख,काँग्रेस कमिटीच्या सुभद्राताई मुळे,सामाजिक कार्यकर्त्यां कल्पना गायकवाड,विनायक पुदाले,पप्पू पाटील,शिवाजी सुरवसे,मनोज मिश्रा,गौस कुरेशी,आदिजन उपस्थित होते.शहराचे महत्व वाढविण्यासाठी या ठिकाणी बसडेपोची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी पूर्ण करावी याबाबत हि निवेदन देण्यात आले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!