नामदेव जाधवांच्या तोंडाला काळं फासलं.

पुण्यात पत्रकार भवनजवळ पत्रकारांशी संवाद साधताना नामदेवराव जाधव यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली. मराठा आरक्षणावरुन शरद पवारांवर टीका करणाऱ्या नामदेवराव जाधव यांना काळं फासण्याचा प्रकार घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं आहे. पवारांवर वारंवार टीका केल्यामुळेच हे कृत्य केल्याचं या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. भांडारकर इन्स्टिट्यूट इथं कार्यक्रमासाठी परवानगी नाकारल्यानंतर त्यांच्यावर हा प्रसंग ओढवला आहे. कार्यकर्त्यांनी थेट जवळ येऊन जाधव यांच्या तोंडाला शाई फासली. त्यानंतर त्यांच्या सुरक्षा रक्षकानं जाधवांभोवतीकडं केलं. पण तरीही कार्यकर्ते जाधव यांच्यावर धाऊन जात होते. यावेळी हे कृत्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी शरद पवार जिंदाबाद अशा घोषणाही दिल्या
नामदेव जाधव यांच्यावर झालेल्या शाईफेकीची जबाबदारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतली आहे. शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या घटनेची जबाबदारी घेतली आहे. आम्ही त्यांना इशारा दिला होता आणि आम्ही त्याच्या तोंडाला काळ फासले असे प्रशांत जगताप म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत