आता देशाला लुटण्याच नव कायदेशीर मॉडेल आलेल आहे.

मनमोहनसिंग नोटाबंदीच्या वेळेला हि ‘ संघटीत लुट ‘ आहे अस म्हणालेले होते.
कायदेशीर लुट
एखाद्या कंपनीला, उद्योगाला अनेक बँका वेगवेगळ किंवा एकत्रितपणे कर्ज देतात.
कर्जाला काहीतरी मालमत्ता तारण दिलेली असते.
कर्ज थकल कि बँका कोर्टात जातात.
कर्जदार दिवाळखोरी जाहीर करतो.
मग राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद नावाचा कायदेशीर प्रकार आहे त्याला एनसीएलटी म्हणतात.
तिथ या कर्जाच्या गाळात रुतलेल्या कंपनीचा लिलाव होतो.
लिलावात बोली लावून जो कुणी कंपनी विकत घेईल तेवढे पैसे लवादाच्या नियमानुसार बँकांना मिळतात.
सोबत असलेल्या फोटोत दहा कंपन्यांचे तपशील आहेत.
या कंपन्यांचे एकत्रित थकीत कर्ज होते ६१८३२ कोटी.
या कंपन्या विकल्या गेल्यात १५९९७ कोटीला.
एकूण तोटा ४५८३५ कोटी किंवा ७४ टक्के.
गंमत म्हणजे या दहाही कंपन्या बोली लावून घेणारा उद्योगसमूह एकच आहे ज्याच्या नावाने राहुल गांधी संसदेत रोज आवाज उठवत आहेत.
आता या बुडालेल्या कर्जाच काय होणार ?
सरकारी बँकाना सरकार आर्थिक मदत करणार ती कुठून करणार ? सरकारचे पैसे म्हणजेच करदात्यांचे पैसे ना ?
म्हणजे करदात्यांचे ४५८३५ कोटी पाण्यात कुणी घातले आणि कुणाच्या खिशात गेले ?
वरवर पाहता हा सगळा कायदेशीर व्यवहार आहे.
पण जेवढी लवादाला यापेक्षा जास्त किंमत देणारी बोली लावणारी कंपनी मिळाली नसेल का ?
समजा एखाद्या कंपनीने अशी बोली लावायची ठरली तर दुसऱ्या क्षणाला ईडी , सीबीआय, आयकर विभाग सगळे त्या कंपनीच्या मालकांच्या घरी सदिच्छा भेटीला जातील.
म्हणजे ज्याला कुणाला कंपनी विकत घ्यायची आहे त्यालाच मिळण्याची तरतूद लवादाकडे आधीच झालेली आहे.
अगदी याच पद्धतीने याच लवादाच्या मदतीने दुसऱ्या मित्राने ४०००० कोटी कर्जाची आपल्याच भावाची कंपनी फक्त ४०० कोटीला घेतली आणि बँकांना ९५ टक्के कर्जावर पाणी सोडावे लागलेले आहे.
हि आहे कायदेशीर लुट.
देशाची आणि करदात्यांच्या पैशाची कायदेशीर लुट.
अर्थात आपल्याला काय करायचं आहे ना ?
बुडाले पैसे तर करदात्यांचे बुडणार आहेत ना ? आपण तर अब्दुलची ठासली आणि भोंगे निघाले एवढ्याच गोष्टीत आनंद मानायचा.
हो ना ?
आनंद शितोळे
#आपल्याधडावरआपलेच_डोके cc
#सबबिकजायेगा
#बुडत्या_बँका
संदेश प्रसारक
अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.
संविधान प्रचारक/प्रसारक व व्याख्याते.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत