अनुसुचित जाती जमाती आयोग हा केवळ भाजपचा मागासवर्गीय सेल म्हणून कार्यरत, त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आवमन प्रकरणी केवळ नोटीस बजावली – राजेंद्र पातोडे.

मनुवादी राहुल सोलापूरकर ह्याने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबत केलेले वक्तव्य राष्ट्रद्रोही असून राष्ट्रपुरुषांची अवमनाना करणारा आहे.अनुसुचित जाती जमाती आयोग आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम ह्यांना मात्र दलितांच्या शोषितांच्या भावना दुखावल्या असल्याचा जावई शोध लावला आहे.मेश्राम हे अद्यापही भाजपच्या मागासवर्गीय सेल चे भूमिकेतून बाहेर पडलेले दिसत नाही म्हणून संघाचे पदाधिकारी असलेल्या सोलापूरकर ह्याला कव्हर केले जाते आहे.
सोलापूरकर ह्याने केलेले वक्तव्य ह्यासाठी कुठल्याही नोटीस देण्याची गरज नाही.तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्या ऐवजी आयोगाचे उपाध्यक्ष अकलेचे तारे तोडण्यात व्यस्त आहेत.त्यांना देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत ह्याची माहिती नसावी इतक्या बालिशपणे आयोगाचे स्टेटमेंट आले आहे.मुख्यत: नागरिकांनी तक्रार करे पर्यंत आयोगाला जाग आलेली नाही.सुमोटो आयोगाने कार्यवाही केलेली नाही.त्यामुळे आयोगाची नोटीस ही निव्वळ नौटंकी आहे.हाच प्रकार त्यांनी परभणी मध्ये जावून केला होता.पोलीस अधिकारी ह्यांना गुन्हे दाखल करून अटक करण्या ऐवजी निलंबित करण्याची मागणी ही त्यांची होती.उलट आजही परभणीच नव्हे देशभरातील आंबेडकरी अनुयायी पोलिसावर खून आणि दंगलीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करीत आहे.त्याबाबत मेश्राम मुग गिळून बसले आहेत.सुरेश धस ह्याचे आरोपीचे समर्थन करणारे वक्तव्य आलेले असताना आयोगाने कार्यवाही केली नाही.किंवा नोटीस बजावली नाही.त्यामुळे अनुसुचित जाती जमाती आयोग आणि अनुसुचित जाती जमाती मोर्चा ह्यात काहीही फरक मेश्राम ह्यांचे कृती वरून दिसून येत नाही.
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश
9422160101.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत