षडयंत्र समजून घेतं पुढे जाऊ या….!!

हजारो वर्षाच्या क्रांती प्रति क्रांतीच्या संघर्षाच्या लढाई मधील विद्यमान काळातील संघर्ष हा संविधान × मनुस्मृति असा आहे….!!
प्रतिक्रांतीवादी संवैधानिक व्यवस्थेमध्ये मोक्याच्या जागेवर जाऊन बसले म्हणून मुजोर झाले आहेत. त्यांना संविधान संपवून मनुप्रणित व्यवस्था निर्माण करायची आहे….!!
प्रतिक्रांतीवादी मुठभर आहेत याचे त्यांना चांगले भान आहे. म्हणून ते समोरासमोर ची लढाई लढतं नाहीत.कधीच ते आक्रमक रुप धारण करीत नाहीत. ते लपून छपून वार करणे आणि विरोधकांना भयभीत करणे असा खेळ खेळतं असतात. पाहुण्याच्या काठीने साप मारण्याची वृत्ती अंगिकारत ते स्वतः नामनिराळे राहतात….!!
जिथं हिम्मत आणि धैर्य लागतेय, बळाचा वापर करावा लागतो तिथं ते संभ्रमित मांडणी करुन द्वेष पेरणी करतात आणि मानसिक विकृत माणसे तयार करतात आणि त्यांचा वापर करून दंगली भडकवतात. प्रसंगी खुनही करतात.समाजात दुहीची अवस्था कायम राहिली पाहिजे यासाठी ते कायमच द्वेष पेरणी करीत असतात. द्वेषाची पेरणी करतांना ते धर्माचा, देवाचा, धर्म ग्रंथातील श्लोकांचा बेमालूमपणे वापर करीत असतात म्हणून देवभोळे, दैववादी, भाबळे तरुण त्यांच्या विषमतावादी षढयंत्रात सहज गुरफटतात आणि दुष्टचक्रात अडकतात. वैदिक राष्ट्र निर्माण करण्यासाठी जेवढे खुन केले त्यामध्ये खुनी बहूजन समुहातील आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. धार्मिक दंगलीत हातात शस्त्र आणि दगड घेतलेली तरुणाई बहूजन समुहातील आहे हेही लक्षात घेतले पाहिजे…!!
मनुवाद्यांना वैदिक राष्ट्र निर्माण करायचे आहे. परंतु ते तसे कधीच बोलणार नाहीत. दक्षता घेत आपलं षडयंत्र ऊघडं होऊ देतं नाहीत.आपलं उदिष्ट पुर्ण करण्यासाठी ते ढोंग रचतात त्याचाच भाग म्हणून ते हिंदू राष्ट्र असे संबोधून.सभ्रमीत मांडणी करीत देशातील सर्वात मोठ्या ओबीसी वर्गाला हाताशी धरून वैदिक राष्ट्र निर्माण करण्यासाठी कार्यरत झाले आहेत….!!
लढाई संविधान × मनुस्मृति अशी असल्याने वार हे संविधान शिल्प आणि संविधानाच्या शिल्पकारावर करायचे असे मनुवाद्यांनी ठरविले आहे….!!
संविधान शिल्प, संवैधानिक कायदे आणि संविधानाच्या शिल्पकारावर हातोडे चालवून संवैधानिक व्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न मनुवादी करीत आहेत….!!
देशातील संविधान वादी समुह किती आणि कसा जागरुक आहे हे तपासण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांना आणि संविधान शिल्पांवर हातोडे चालवून मनुवादी चाचपणी करीत आहेत….!!
षढयंत्रपुर्वक कपटी मनुवादी संविधान वादी समुहाला ऊकसवून पुतळा विटंबना, संविधान शिल्प विटंबना या दुष्टचक्रात अडकवून गारद करु पहात आहेत….!!
परभणी येथील संविधान शिल्प विटंबनेचा अनुभव ताजा आहे. संविधान वादी आक्रमक झाले परभणी बंद मध्ये मोक्याच्या जागेवर बसलेल्या मनुवाद्यांनी पोलिस प्रशासनाला हाताशी धरून असहाय समुहाला बेदम मारहाण करुन कोम्बिंग अॉपरेशनच्या नावाखाली समाज मनात दहशत निर्माण केली. संविधानवादी समाज भयभीत केला. आणि सोमनाथ सुर्यवंशी यांच्या रुपात सुशिक्षित तरुण गमावला परंतु अद्याप मारेकरी शोधून कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आपणं फांद्यावर घाव घालतोय, मुळावर घाव घातला पाहिजे असे वाटते तरच यशस्वी वाटचाल करता येईल….!!
पंजाब मधील अमृतसर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना हा त्याच कळीचा एक भाग आहे.
म्हणून यापुढे पुतळा विटंबना संविधान शिल्प विटंबना अशा अनेक घटना घडतील. तेव्हा मनुवाद्यांना काय अपेक्षित आहे याचा अदमास घेऊन त्यांच्या दुष्टचक्रात न अडकता. आक्रमक पवित्रा घेण्याऐवजी संवैधानिक कायदेशीर मार्ग अवलंबित फांद्या तोडल्या पेक्षा मुळावर घाव घातला पाहिजे…!!
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची, संविधान शिल्पाची विटंबना करण्यासाठी बहूजन समुहातील तरुणांना ऊकवणारा मास्टर मांईड शोधला पाहिजे. बहुजन समाजातील भ्रमीत तरुणांना शिक्षा झाली पाहिजे असा पवित्रा घेणे सुद्धा चुकीचे वा अर्धवट प्रयत्न ठरु शकतात.आणि म्हणून मुळावर घाव घालून मनुवाद्यांना ऊघडं पाडण्यासाठी संविधानवादी समुहाने प्रयत्न केले पाहिजे हा आपल्या यशस्वी लढाईचा रोख असला पाहिजे….!!
आपणं आक्रमकता दाखवू नये असा मुळीच अर्थ घेऊ नये. आपली आक्रमकता ही आपली सर्वात मोठी शक्ती आहे याची मला पुर्ण जाणिव आहे. परंतु शक्ती क्षय करुन देखील यशस्वी होता येतं नसेल तर यशस्वी मार्गक्रमण करण्यासाठी डावपेचा मध्ये बदल करणे इष्ट असे मला वाटते…..!!
जयभीम.
@.. भास्कर भोजने
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत