डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर…..

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
गावकुसाबाहेरच्या जगाचा मूकनायक,
मनुस्मृती जाळणारा, महात्मा फुल्यांच्या स्वप्नातील महानायक,
तथागतांचा धम्म जागविणारा प्रबुद्ध नायक…
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
शोषितांच्या क्षितिजावरचा ध्रुवतारा,
समतेचा सुगंधी पहाटवारा,
उपेक्षितांवर बरसणाऱ्या करुणेच्या जलधारा..
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
आजन्म पेटलेला अस्मितेचा निखारा,
प्रवाह बदलणारा क्रांतीचा तुफानवारा,
जगाच्या कानाकोपऱ्यात विद्वत्तेचा दरारा…
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
कधीही न संपणारा ज्ञानप्रवास,
मृत्यूलाही पुरून उरलेला श्वास,
तुमच्या, माझ्या, तमाम शोषितांच्या रक्तातून सळसळणारा आत्मविश्वास….
शोषितांचे मुक्तिदाते, भाग्यविधाते, मानवमुक्तीचे आद्य प्रणेते, प्रज्ञासूर्य, पाण्यासहीत मने ही पेटविणारी क्रांती लहर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त, त्यांच्या स्मृतीस ही भावपूर्ण शब्दांजली…
नागभूषण बनसोडे
सोलापूर.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत