पाणी तेरा रंग कैसा?
प्रा.मुकुंद दखणे.
निर्वाण असलेले पाणी, स्वच्छ, निर्मळ असते. अशा पाण्याच वाण मिसळताच, ते त्या त्या वाणी स्वभावाचे बनते. पाणी निर्वाण असो की वाणयुक्त ते उताराच्या दिशेनेच प्रवाहित होते. आणि पाण्यावर कितीही काठी लाठेणे, दगडांनी झोडपे मारले तरी ते क्षणिक जरी फाकत असले तरी, दुसर्या क्षणिक पुर्ववत होते.पाण्या प्रमाणेच सत्य असते.त्यावर खोट्याचा कितीही ले
लावला तरी ते सत्य च राहत असते.
पाणी तापविले तर वाफ होते पण त्याचे सांद्रिभवन होताच, त्याचे जलथेंबात रूपांतर होऊन, असे असंख्य जलथेंबापासून जलप्रवाह, नदी बनते आणि समुद्र रूपी, महासागर रूपी संग्रहित होते. त्याचे अंतर्मन दरी प्रमाणे खोल गर्तेत रूतून राहते. पण अंतिमतः ते H2Oम्हणजे हॅड्रोजन चे दोन कण आणि ऑक्सीजनचा एक कण असतो जो मनुष्य प्राणी मात्राची तहाण भागविते जेव्हा ते शुध्द रूप धारण करून असते.
पण, तेच शुद्ध रूपी, स्वच्छ, निर्मळ असले तरी पाणी जर बर्फरूपी घट्ट, जमलेले असेल तर मात्र तहाण भागवू शकत नाही. उलट ते बर्फरुपाचे पाणी रूप धारण होताच, तहाण संपते. हे नैसर्गिक सत्य आजपर्यंत कोणीही बदलवू शकले नाही.
सत्य हे पाण्याप्रमाणे असते. ते मिटवता येत नाही कोणाला?संपवता येत नाही कोणाला? आज पर्यंत या पृथ्वीतलावावर कितीतरी राजे महाराजे होऊन गेले पण पाण्याला संपविता आले नाही. ना संपविता येणार आहे.कारण सजिवसृष्टी साठी ते जीवनमुल्य आहे आणि जीवनमुल्य बाब
जीवन देत राहते. म्हणूनच पाण्याप्रमाणे निर्मळ, स्वच्छ, दुसर्याची तहाण भागविणारे
बनले पाहिजे.
म्हणूनच भगवान बुद्ध म्हणतात, पाण्या प्रमाणेच सत्य असते. ते ना कोणाला संपविता येत नाही. ना कोणाला मिटविता येत नाही. शेवटी सत्य हे अंतिमतः सत्य असते. फक्त पाण्याला काही काळापुरते जसे घाण करता येते तसे सत्याला काही काळापुरते खोटे जरूर करता येते. पण अंतिमतः जे खोटे ते खोटेच असते .आणि जे घाण असते ते घाण च असते, जे निर्मळ
असते ते निर्मळ च आणि जे निर्वाण असते ते निर्वाण च असते. पाणी निर्वाण असले तरी वाण क्षमविण्याची क्षमता बाळगून असते,म्हणूनच पाणी म्हणजे जीवन असे म्हणतात. आणि ते सूर्य प्रकाशात रंगमय बनते.पाणी तेरा रंग कैसा, जिसमे मिलाया, उसिका जैसे.!
🌹
प्रा.मुकुंद दखणे.
यवतमाळ 9373011954
जयभीम 🙏🏾जयभारत
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत