देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

पुरीच्या भूमीत घेणार शोध, दंत विहाराचाच होईल बोध

संजय सावंत.

कालच्या दि.२२ सप्टेंबर २०२४ रोजीच्या लोकमत दैनिकात ‘जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध’ अशी बातमी पहिल्या पानावर प्रसिद्ध झाली आहे. यासाठी तेथील पुरातत्व विभाग आणि राष्ट्रीय भूभौतिक संशोधन संस्था खजिना शोधण्यासाठी लेझर स्कॅनिंगचा वापर करणार आहेत. त्याचा अहवाल सर्वेक्षण झाल्यावर याच महिन्यात सादर होईल. त्या अनुषंगाने असे वाटते की हे सर्वेक्षण फक्त खजिन्यासाठी न करता जगन्नाथ मंदिराच्या भूमीत दडलेल्या बुद्धांच्या प्रतिमा, शिल्पे व बौद्ध संस्कृतीचे अवशेष शोधण्यासाठी देखील केले पाहिजे. कारण आजपर्यंतचा इतिहास हेच सत्य सांगत आहे की जगन्नाथ मंदिर हे मूळ बुद्धांच्या दंत धातूंचे प्राचीन विहार आहे.

अनेक हस्तलिखितात, सापडलेल्या ताम्रपटात, शिलालेखात बुद्धांच्या दंत अस्थिंचा उल्लेख आढळून येतो. दीड-दोन हजार वर्षापूर्वीपासून निघत असलेली बुद्धांची दंत धातूची मिरवणूक चिनी भिक्षू हुएन त्संग आणि इत्सिंग यांनी ६-७ व्या शतकात पाहिलेली आहे. तिचा वृत्तांत लिहून ठेवला आहे. हीच यात्रा आता जगन्नाथ पुरी यात्रा म्हणून ओळखली जात आहे. दंत धातू श्रीलंकेला गेल्यानंतर त्रिरत्नाचे रूपांतर जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा या त्रयीत करण्यात आले हा सत्य इतिहास आहे. तरी सर्वेक्षण करताना बुद्धशिल्पे, अथवा बौद्ध संस्कृतीचे पुरावे आढळून आल्यास दडवून न ठेवता अहवालात उघड झाले पाहिजे. पुरावे सापडले म्हणून बौद्ध जनता काही जगन्नाथ मंदिरावर हक्क असल्याचा दावा करणार नाही. परंतु ते निदान मूळ बौद्ध संस्कृतीचे स्थळ होते हे तरी आता मान्य झाले पाहिजे.

भारतातील तिरुपती बालाजी मंदिर, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, केरळचे अय्यप्पा मंदिर, श्रीशैलम व तशीच इतर अन्य मंदिरे देखील पूर्वी बौद्ध विहारे होती. आर.डी.भंडारकर, आर.सी.ढेरे इत्यादी विद्वानांनी पूर्वीच हे सिद्ध केले आहे. येथील बौद्ध प्रार्थना, पूजाविधी आणि रितीरिवाज यांना बुद्धिझमचा अस्त होताना पुरोहित वर्गाने सोयीप्रमाणे बदलून टाकले आहे. तरी जगन्नाथ पुरीचा खरा इतिहास सरकारने आढेवेढे न घेता उघड करावा. बनवाबनवी करू नये. कारण सत्य अनेक दिवस लपून रहात नाही. ते केव्हा ना केव्हा उघडकीस येतेच. हे बुद्ध वचन लक्षात ठेवावे.

— संजय सावंत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!