राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ९ स्वयंसेवकांना जन्मठेप

१९ वर्षांपूर्वीच्या हत्या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय…
केरळमध्ये रिजिथ शंकरन याची २००५ मध्ये हत्या करण्यात आली . त्यानंतर १९ वर्षांनी या प्रकरणातल्या आरोपींना जन्मठेप सुनावण्यात आली आहे .
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नऊ स्वयंसेवकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. केरळच्या थलासरी न्यायालयाने हा निर्णय मंगळवारी दिला . २००५ मध्ये सीपीआय (M) चा कार्यकर्ता रिजिथ शंकरन याची हत्या करण्यात आली होती. ३ ऑक्टोबर २००५ या दिवशी ही घटना घडली होती. या प्रकरणात न्यायालयाने नऊ स्वयंसेवकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे .
काय आहे हे प्रकरण ? :
रिजिथ शंकरन याची हत्या २००५ मध्ये करण्यात आली होती. रिजिथ हा डाव्या विचारांचा कार्यकर्ता होता . राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) यांच्यात वादावादी सुरु होती . ३ ऑक्टोबर २००५ या दिवशी रिजिथ हा त्याच्या घरी चालत चालला होता . त्याच्याबरोबर त्याचे मित्रही होते . त्यावेळी संघ स्वयंसेवकांचा एक जमाव त्या ठिकाणी आला . त्यांच्याकडे शस्त्रं होती . त्यांनी रिजिथ आणि त्याच्या मित्रांना मारहाण केली . रिजिथला या मारहाणीत गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणावर जखमाही झाल्या . तर त्याचे इतर मित्र जखमी झाले . या प्रकरणात आता थलासरी न्यायालयाने नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे . सुधाकरन (वय-५७), जयेश (वय-४१), रणजीत (वय-४४), अजींदरन (वय-५१), अनिलकुमार (वय-५२), राजेश (वय ४६), श्रीजीत (वय ४३) आणि भास्करन (वय-६७) या सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे .
पोलिसांनी त्यावेळी हत्यारं आणि रक्ताने माखलेले कपडे केले होते जप्त
संघाच्या या स्वयंसेवकांकडे दोन तलवारी, एक मोठा खंजीर आणि एक स्टिलचा रॉड होता . पोलिसांनी ही हत्यारं जप्त केली . तसंच पोलिसांना आरोपींचे रक्ताने माखलेले कपडेही मिळाले . या प्रकरणात १४ मार्च २००६ ला आरोपपत्र दाखल झालं होतं . आत्तापर्यंत २८ साक्षीदारांच्या साक्षी या प्रकरणात नोंदवण्यात आल्या . तसंच ५९ पुरावे आणि दस्तावेज यांची ओळख पटवण्यात आली .
कुठल्या कलमांच्या अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला ? :
आयपीसीच्या कलम ३०३, कलम ३०७, कलम १४३ या अंतर्गत या सगळ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे . तसंच कलम ३४१ आणि कलम ३२४ या कलमांच्या अंतर्गतही गुन्हा नोंद करण्यात आला आहे . या सगळ्यांना ४ जानेवारी या दिवशी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानेही दोषी ठरवलं होतं . एकूण १० स्वयंसेवक या गुन्ह्यात सहभागी होते . मात्र यातल्या एकाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला . त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या नऊ जणांना हत्या केल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे . इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत