नितीन आगेची हत्या ज्या क्रूर पद्धतीने झाली त्या वेळी या माणसाचे काळीज थरथरले नाही का ?
यांच्याच शाळेतून त्याला ओढून नेले तरी त्या शाळेतल्या सर्व शिक्षकांनी आपल्या साक्षी फिरवल्या. त्याची हत्या झाली हेच खोटं आहे हेच सिद्ध व्हायचं शिल्लक राहीलं. नितीन आगेच्या हत्येमधे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक पदाधिकारीच होते.
त्याच्या मारेकर्याच्या समर्थनार्थ मोर्चे निघाले आणि हे म्हणतात कि मारेकरर्याची बाजू घेण्याची पद्धत आमच्यात नाही.
गेल्या काही वर्षात दलित मुलांच्या हत्या झाल्या कि मोर्चे निघतात. मरणाराच कसा मरण्यासाठी योग्य होता हे सांगणार्या कहाण्या प्रसूत होऊ लागतात. नितीन आगेच्या वेळीही दुसर्यांच्या मुलीवर डोळा ठेवला कि हेच होणार इथपर्यंत मजल गेली होती.
आज जे कळवळत आहेत त्यांची बाजू चुकीची अजिबात नाही. पण हत्या झाल्यानंतर समाजाला कसं वाटतं, असहाय्यतेतून भावनिक उद्रेक कसा होतो याचा अनुभव घेत असाल तर ज्या ज्या वेळी अशा प्रकारे आंदोलन करणार्या समाजाला तुम्ही आरोपीच्या पिंजर्यात उभे केलेत ते आठवा. नांदेडला तुमच्याच मर्जीतले पोलीस अधिकारी होते. परभणीला तुमच्याच पोलीस अधिकारी होता. तेव्हां अंजली दमानियांनी रोस्टरबद्दल आकांडतांडव केलेले आठवत नाही.
त्या गेली काही वर्षे प्रसिद्धीच्या झोतात आहेत. तर मग खर्डा आणि अहमदनगर जिल्हा कुणाच्या ताब्यात आहे याबद्दल चकार शब्द त्यांनी उच्चारलाय का ? नितीन आगेचे मारेकरी सुटले. कुणीही हळहळ सुद्धा व्यक्त केली नाही. ना विधानसभा, ना संसद कुठेच चर्चा नाही. त्या आरोपींनी नंतर जल्लोष केला. त्यांची मिरवणूक निघाली. ज्यांनी महाराष्ट्रापासून दूर बिल्किस बानो प्रकरणात आरोपींना सोडल्यावर मिरवणूक निघाली म्हणून इथे लेख पाडले त्यांना महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात हे घडताना दिसत नव्हते का ?
आगेच्या मारेकर्यांनी नंतर त्याच खर्ड्यात एका पारधी युवकाची ठेचून हत्या केली. ना हाक ना बोंब. ना हाके ना दमानिया ना धस !
खैरलांजीच्या केस मधे कुणालाच फाशी झाली नाही. कालच्या कोर्टातली केस वरच्या कोर्टात पातळ केली गेली आणि जन्मठेप झाली. पुढे त्यातूनही आरोपी सुटले. न्यायासाठी वणवण करत भोतमांगे गेले.
अरविंद बनसोडची हत्या झाली तेव्हां अनिल देशमुखांचा राजीनामा कुणी मागितला का ? उलट हत्येचा साक्षीदार असलेल्या त्याच्या भावालाच आरोपी केले गेले. तो केस पातळ केली जातेय हे सांगत असताना यातले एकही पुढे आले नाहीत. अनिल देशमुखांचा नातेवाईकच आरोपी होता. अजितदादा पवार यांचे सासरे पवनराजे हे खूनाच्या आरोपात अडकले होते. तेव्हांच फक्त भाजप विरोधी पक्षात असताना जंग जंग पछाडले होते. आता सगळे बाहेर आहेत.
नितीन आगेच्या मारेकर्यांना वाचवण्यासाठी मोर्चे काढणारे, ८० वकीलांची फौज उभे करणारे, वर्गणी काढणारे कोण होते ?
अक्षय भालेरावच्या केस मधे तिथे जाऊन मारेकर्यांना काळजीकरू नका म्हणून धीर देणारे, मारेकर्यांच्या बाजूने आंदोलन करणारे कोण होते ? पोलीस स्टेशन मॅनेज करू म्हणणारे कोण होते ?
रमाबाई आंबेडकरनगर केस मधल्या आरोपीला प्रमोशन देणारे कोण होते ? हाच आरोपी नंतर सनातनच्या साधकांना शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देताना कसा काय सापडला ? याच अधिकार्याला रमाबाई आंबेडकरनगर मधे आणून ठेवणारे कोण होते ?
या लोकांनी दहशत, न्यायव्यवस्था यावर बोलावं ?
आक्षेप या ढोंगाला आहे. जात पाहून न्याय व्हावा म्हणून आक्रोश करणार्यांना आहे.
मराठा मोर्च्याच्या काळात नाशिक मधे ज्या दंगली झाल्या, त्या केसमधे दंगलखोरांसाठी ज्यांनी पुन्हा ८० वकीलांची फौज उभी केली ते आज सोशल मीडीयात गुन्हेगाराच्या बाजूने उभे राहू नका, आमचा समाज कधीही असे करत नाही म्हणून धादांत खोटं बोलत आहे.
देशमुखांच्या हत्येच्या आरोपींना शिक्षा झाली पाहीजे त्याच वेळी इतर जे बळी आहेत ती माणसं नसून जनावरं होती का ?
कुणाचं ऐकून आमचे लोक मानवतावादी भूमिका घेताहेत ? या भूमिकेत सातत्य असलं पाहीजे. सत्तेत असताना जात न पाहता न्याय झाला पाहीजे.
आमचीच मतं घेऊन आमच्याच हत्येच्या केस मधे हत्यार्यांना मोकळे सोडणार्यांना निवडून द्या म्हणणारेच आज यांच्या अरण्यरूदनात सामील होत आहेत.
रणजीतसिंग यांचा एक आंख कि न्याय प्रसिद्ध होता. तो न्याय महाराष्ट्रात स्थापित झाला पाहीजे. अजूनही खर्ड्याची केस उघडा. अक्षय भालेरावच्या मारेकर्यांना शिक्षा होईल हे वचन द्या.
जिल्ह्याजिल्ह्यात किती मराठा अधिकारी आणून बसवलेत त्याचा हिशेब काढा. मोक्याच्या जागी दलितांना आणा असे दमानिया बाईंचे रोस्टर सांगत नाही का ?
आरोपीला सगळ्याच केस मधे शिक्षा झाली पाहीजे आणि सगळीकडेच मीडीयाने प्रकरण बीडप्रमाणे लावून धरले पाहीजे.
सिलेक्टिव्ह प्रकरणात जर यांना न्यायाची आठवण होत असेल तर जनता दूधखुळी नाही.
( #Mandar mane यांच्या वॉलवरुन साभार…!!)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत