मा. माजी सरन्याधीश सर्वोच्च न्यायालय धनंजय चंद्रचूड साहेब
आपण निवृत्त होण्याच्या पूर्वसंध्येला भारतीयांकडून अपेक्षा केली होती की, ‘ देश मला इतिहासात काय म्हणून लक्षात ठेवेल…..?*”
*खरेच तुम्ही आमच्या देशासाठी कायम स्मरणात राहाल असेच ऐतिहासिक काम केले आहे…..!*
*” एक म्हणजे तत्कालीन राष्ट्रपतीकडून ” मी संविधानाशी निष्ठा बाळगीन “अशी शपथ घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झालात. परंतू , त्याच संविधानाने धर्मनिरपेक्षता ( Secularism ) स्वीकारलेली असतांना, तुम्ही मात्र असे म्हणता अयोध्या प्रकरणाचा निकाल देताना ( न्याय नव्हे ) तुम्ही देवाची प्रार्थना करुन, देवाला विनंती केली की, मला हा निकाल देण्यासाठी शक्ती दे, देवाने शक्ती दिली आणि हा निकाल देवाने दिला. असे वक्तव्य आपण करुन संविधानिक निष्ठेला तडा दिला…….!*
*जेंव्हा तुमच्या घरी ( बिन बुलाए मेहेमान किंवा आमंत्रण ) प्रधानमंत्री मोदी हे गणपतीच्या आरतीला आले. तेंव्हाच तुम्ही संविधाननिष्ठतेला तडा दिल्याचा भारतीयांच्या मनात शिक्कामोर्तब झाला…….!*
*जेंव्हा उद्धव गट बरोबर की शिंदे गट बरोबर हे सांगण्यासाठी दीड वर्षे तुम्ही घेतले, शेवटी विधानसभेचा कार्यकाळ संपत येण्याच्या तोंडावर निकाल दिला की, विधानसभाध्यक्षानाच तो अधिकार असल्याचे सांगून तुम्ही मोकळे झाले, परंतू , त्याचबरोबर तुम्ही हेही सांगून मोकळे झाले होते की, तत्कालीन महाराष्ट्र सरकार असंविधानिक आणि नपूंसक आहे…..!*
*असे असतांना तुमच्या सरन्यायाधीश पदाचा देशाला व संविधान रक्षणाचा उपयोग तो कोणता झाला……?*
*🌹डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🌹*
*यांनी या सर्वच कनिष्ठ स्तर न्यायाधीशापासून ते सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशापर्यंत तसेच तहसीलदारापासून ते मुख्यसचिवाच्या सामान्य प्रशासन अर्थात प्रशासकीय न्यायाधीकरणाच्या शेवटच्या पदांची निर्मिती यासाठी केली होती, की जेंव्हा एक फिर्यादी आणि एक आरोपी तुमच्या न्यायालयासमोर आला असता. जेंव्हा ते दोघेही त्यांची त्यांची बाजू परखडपणे मांडत असतात. परंतू तुम्ही तुमच्या हृदयातील सदसदविवेक बुद्धीला जागृत करुन, संविधानाचा डोळ्यासमोर आदर्श ठेऊनच सत्यापर्यंत पोहचुन …….*
*🌹न्याय 🌹*
देण्याचे तुमचे कर्तव्य असते…..!
असे असतांना तुम्ही वेळीच न्याय का दिला नाही?
*तुम्ही ही संविधाननिष्ठता बाळगली नाही. म्हणून मोदी - शहा यांनी निर्माण केलेल्या अलीबाबा आणि चाळीस चोरांचे अर्थात नपुसक मिंधे गटाचे फावले. त्यांना अभय मिळाले. पुन्हा त्यानी गरज नसतानाही अलिबाबाने अजित पवार गट फोडून महाराष्टाचा बिहार केला ......*
*त्यानंतर याच मोदी -शहाच्या गुजरात लॉबीने EVM ला हाताशी धरून आमच्या मताचा अधिकार हिरावून घेतला. तेंव्हा सुद्धा तुम्ही EVM च्या हजारो तक्रारी निवडणूक आयोगाकडे देऊन सुद्धा त्याचबरोबर तुमच्याकडे शेकडो याचिका करुन सुद्धा बघ्याची भूमिका घेतली.........*
*आज ज्या संविधान आणि लोकशाहीच्या चिंधड्या उडालेल्या आहेत ना त्याला केवळ आणि केवळ तुम्हीच जबाबदार आहात.*
*आणि वरून आमच्याकडून ही अपेक्षा करता की, देश मला काय म्हणून स्मरणात ठेवेल......!!!*
*देश तुम्हाला लोकशाही आणि संविधान संपविणारा.........*
*🦂मनुवादी सरण्यायाधीश 🦂*
*म्हणूनच ध्यानात ठेवील......!!!!!!*
जागृतीचा कृतिशील लेखक :- अनंत केरबाजी भवरे ( संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689 )
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत