आमदार प्रकाश सोळंके यांच आंदोलकांनी घर पेटवलं, वाहनं जाळली.

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सरू आहे. राज्यभरातील मराठा समाजही आक्रमक झाला असून अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वातावरण तापलं आहे.आमदार प्रकाश सोळंके हे मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणावर काहीच बोलले नाहीत, हा राग मनात धरून ३००-४०० मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली आहे. एवढंच नव्हे तर आंदोलकांनी आमदार सोळंके यांच्या वाहनांना आगही लावली आहे. याबाबतचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आंदोलकांनी सोळंके यांच्या घरावर प्रचंड दगडफेक केली आहे. तसेच पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडून सर्व वाहनं जाळली आहेत. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव काहीही ऐकून घ्यायला तयार नसल्याचं दिसलं.
याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बीड येथील निवासस्थानावर मराठा आरक्षण आंदोलकांनी हल्ला केल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी ते म्हणाले, “हा हल्ला जेव्हा झाला तेव्हा मी माझ्या घरात होतो. सुदैवाने माझ्या कुटुंबातील कोणीही सदस्य किंवा कर्मचारी जखमी झाले नाहीत. आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत. आगीमुळे मालमत्तेचे मोठं नुकसान झालं आहे.”
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत