महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

छत्रपती संभाजीराजे आणि मराठा समाजाचे शिष्टमंडळ केंद्रीय मागासवर्ग आयोगाची आज घेणार भेट.

समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले होते. मराठा जरांगे पाटील यांनी राज्य शासनाला त्यासाठी काही मुदत दिली असून त्यांच्या आंदोलनाला यश मिळविण्यासाठी विविध घटक, नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे आणि मराठा समाजाचे शिष्टमंडळ केंद्रीय मागासवर्ग आयोगाची आज भेट घेणार आहेत. मराठा जरांगे पाटील यांनी राज्य शासनाला त्यासाठी काही मुदत दिली असून त्यांच्या आंदोलनाला यश मिळविण्यासाठी विविध घटक, नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यासंदर्भात छत्रपती संभाजीराजे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची नुकतीच भेट घेतली होती.

मराठा समाजाला न्याय मिळावा, यासाठी सर्व स्थरावर संभाजीराजे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असून कायदेशीर प्रक्रिया माहिती असल्याने संभाजीराजे त्यासाठी पाठपुरावा करत आहेत. त्यासाठी छत्रपती संभाजीराजे आज दुपारी ३ वाजता दिल्ली येथील केंद्रीय मागासवर्ग आयोगात आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची भेट घेणार आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!