माझे सामाजिक कार्य सर्वप्रथम सोलापुर येथून सुरू झाले.– डॉ बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य सर्वप्रथम सोलापूरात.
जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना झाली. बाबासाहेब त्याचे अध्यक्ष होते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा! हे ब्रीद वाक्य बहिष्कृत हितकारणी सभेने स्वीकारले. त्याप्रमाणे समाज शिक्षित झाला पाहिजे हा प्राधान्याने विचार स्वीकारला.
1 जानेवारी 1925 रोजी सोलापुरात बहिष्कृत अनाथ विद्यार्थी परिषद, हे अस्पृश्य वर्गातील विद्यार्थीसाठी बोर्डिंग सुरू केले. सोलापुरातील पूर्वीच्या महारवाडा आत्ताचे मिलिंद नगर येथे हे बोर्डिंग सुरू केले. आरंभी 17 विद्यार्थी येथे राहत होते. त्यांचे व्यवस्थापक म्हणून श्री जीवाप्पा ऐदाळे यांची निवड बाबासाहेबांनी केली.
सोलापूर निवडण्यामागे बाबासाहेबांचे काही उद्देश होते सोलापूर शहर हे औद्योगिक शहर होते. त्यामुळे अस्पृश्य समाज हा खेडी सोडून नोकरीसाठी सोलापुरात स्थायिक झाले. सोलापूर हे सीमेवरचे शहर असल्यामुळे मराठवाडा, कर्नाटक, तेलंगणातून लोक इथेच स्थायिक झाले. अस्पृश्य समाज हा कापड गिरण्यातून नगरपालिकेतून नोकरी करीत होते. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बरी होती. समाजातील लोकांकडून वसतीगृहाला आर्थिक मदत होईल ही अपेक्षाही बाबासाहेबांना वाटत होती. पण आलेला पगार समाजातील लोक व्यसनात बुडवून टाकीत होता. त्याला शिक्षणाचे महत्त्व वाटत नव्हतं व्यवस्थापक ऐदाळे यांची ओढाताण खूप होती. विद्यार्थ्यांचे पोषण त्याला लागणारी शैक्षणिक साहित्य या सर्व परिस्थितीसाठी स्पृश्य समाजातील काही दानशूर व्यक्तीकडून धान्य व अर्थसाह्य मिळवित असत. सोलापूर नगरपालिका कडून आर्थिक सहाय्य होत असे परंतु ते खूपच अपुरे होते विद्यार्थ्यांची संख्या वाढत होती त्यात महार मांग चांभार, ढोर, मोची अशा वेगवेगळ्या जातीच्या विद्यार्थ्यांचा भरण वाढला वस्तीगृहाच्या जागा ही अपुरी होती बाबासाहेबांची वस्तीगृहाच्या बारकाईने लक्ष होते
वस्तीगृहाच्या व्यवस्थापकामध्ये बाबासाहेबांनी बदल केला हरिभाऊ तोरणे गुरुजी व उद्धव धोंडो शिवशरण यांची नव्याने व्यवस्थापक म्हणून निवड केली एक जानेवारी 1925 साली सुरू झालेल्या या वस्तीगृहास 1 जानेवारी 2025 साली 100 वर्षे पूर्ण झाली बाबासाहेब नेहमी म्हणत माझं सार्वजनिक काम प्रथम सोलापुरातून सुरू झाले
दत्ता गायकवाड, सोलापूर
7588266710
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत