छत्तीसगडमध्ये पाच महिलांसह २० नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण.

छत्तीसगडच्या सर्वाधिक नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात शनिवारी पाच महिलांसह २० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
माओवादी विचारसरणीतील फोलपणा जाणवल्यामुळे निराश झाल्याने त्यांनी येथील पोलीस अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केल्याचे सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी सांगितले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांपैकी एक उईका लखमा नक्षलवाद्यांचा ‘डेप्युटी कमांडर’ आहे. अन्य सर्व नक्षलवादी दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटना (डीएकेएमएल), क्रांतिकारी महिला आदिवासी संघटना (केएएमएस), चेतना नाट्य मंडळीचे (सीएनएम) सदस्य म्हणून सक्रिय होते, असे त्यांनी सांगितले.
नक्षलवाद्यांकडून ग्रामस्थाची हत्या
छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात शनिवारी नक्षलवाद्यांनी एका ग्रामस्थाची हत्या केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोमल मांझी असे गावकऱ्याचे नाव आहे. त्यांनी सांगितले की, मांझी छोटेडोंगर गावातील देवी मंदिरात पूजा करून परतत असताना अज्ञात नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. कोमल मांझी हा छोटेडोंगर येथील लोकप्रिय वैद्याचा (पारंपरिक वैद्याकीय व्यावसायिक) पुतण्या होता. दोघांनाही यापूर्वी नक्षलवाद्यांकडून ठाकर मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी काही जणांना सुरक्षा देण्यात आली होती. त्यात मांझीचाही समावेश होता.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत