जगात सनातन नावाचा धर्माच अस्तित्वात नाही.

समाज माध्यमातून साभार
जर भारतामध्ये सनातन धर्म असता तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना सन 1875 का केली ? त्यांना सनातन धर्म अस्तित्वात आहे हे माहीत नव्हते काय ? यांना तर हिंदू हे नाव सुद्धा मान्य नव्हते, कारण त्यांच्या मते हिंदू हे नाव मुस्लिमांच्या मनामध्ये भारतीयांबद्दल इर्षा असल्यामुळे त्यांनी भारतीयांना हिंदू म्हटले. पुढे त्यांनी हिंदू या शब्दाचा अर्थ सुद्धा सांगितलेला आहे-
“नीच ,छली, कपटी, गुलाम, काला”असा हिंदू या शब्दाचा अर्थ स्वामी दयानंद सरस्वती उर्फ मूळ शंकर त्रिवेदी यांनी सांगितलेला आहे.
तर सनातन हा जर भारतातील लोकांचा धर्म राहिला असता तर भारताच्या संविधानामध्ये या धर्माचा उल्लेख नक्कीच झाला असता. भारताच्या संविधान सभेमध्ये हिंदू धर्माचे अनेक विद्वान उपस्थित होते
त्यांनाही भारतामध्ये सनातन नावाचा धर्म दिसला नाही.
याचे कारण असे आहे की संविधान सभे मधील हिंदू धर्माच्या दिग्गज विद्वानांना व्याकरणाचा जबरदस्त अभ्यास होता.
व्याकरणाच्या भाषेत सनातन हे एक ऍडजेक्टिव्ह (विशेषण )आहे, विशेषण हे केवळ विशेषता दर्शवित असते ते कोणाचेही नाव होऊ शकत नाही. नाव होण्यासाठी ते नाऊन (सज्ञा) असायला पाहिजे होते. सनातन हे एक विशेषन आहे.
उदाहरणार्थ तुम्हाला गोड खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही म्हणाल माझ्यासाठी मिठाई आणा कारण मिठाईची विशेषता ही गोड आहे. मिठाई नाव नाही ते विशेषण आहे. म्हणून तुम्ही जर कोणाला मिठाई मागितली तर तो तुम्हाला त्या मिठाईचे नाव विचारेल. मग तुम्ही त्याला सांगा पेढा, जिलेबी, बर्फी असे काहीतरी सांगाल कारण ही मिठाईची नावे झाली म्हणजे पेढा ,जिलेबी बर्फी हे सर्व नाऊन म्हणजे सज्ञा आहे.
जर सनातन हे कोणत्या धर्माचे नाव असते तर ब्राह्मणांनी लिहिलेल्या रामायण, महाभारत, गीता, चार वेद,18 पुराण यामध्ये सनातन धर्म हा शब्दाला असता. आणि जो कोणी सनातन हा शब्द वापरतो तर तो विशेषता दाखविण्यासाठीच वापरतो. हा झाला व्याकरणाचा भाग.
आता सनातन या शब्दाचा अर्थ तुम्ही कुठेही सर्च करून शोधू शकता. सनातन म्हणजे जसा आहे तसा. कधीही परिवर्तन न होणारा. थोडक्यात म्हणजे अपरिवर्तनीय हा सनातन शब्दाचा अर्थ आहे. मग तुम्ही मला आता सांगा जग हे अपरिवर्तनीय आहे का ? नाही म्हणजे जग सनातन नाही कारण ते सतत बदलत आहे.
ब्राह्मणी धर्म हा सनातन धर्म आहे का? अजिबात नाही कारण तो सतत बदलत आलेला आहे. या ब्राह्मणी धर्मामध्ये सुरुवातीला वेदाला फार महत्त्व होते. वेदांमध्ये मंदिराचे अस्तित्व दिसत नाही,मूर्ती पूजा नाही. केवळ यज्ञ आहे आणि वेदाची प्रमुख देवता ही इंद्रा आहे.
आज ब्राह्मणी धर्मामध्ये मंदिर आहे, मूर्ती पूजा आहे. आणि इंद्राच्या ऐवजी आता ब्राह्मण लोक रामाची पूजा करत आहे. कृष्णाची पूजा करत आहे. कुठे शिवाची पूजा करत आहे. हा ब्राह्मणी धर्म सुद्धा हा आपल्या सोयीसाठी आणि फायद्यासाठी सतत बदलत आलेला आहे. ज्यामध्ये बदल होतो तो सनातन असू शकत नाही.
म्हणून ब्राह्मणी धर्म हा सनातन धर्म होत नाही. परंतु बुद्ध धम्म हाच या पृथ्वीच्या पाठीवरील एकमेव सनातन धम्म आहे. कारण बुद्धाने धम्मपदामध्ये सांगितले आहे की,” वैराणे वैर कधीच नष्ट होत नाही अवैराने वैर नष्ट होते हाच सनातन धम्म होय.” हे बुद्धाचे वचन त्रिकाला बाधित सत्य आहे. हीच या विधानाचीच नव्हे तर बुद्ध धम्माची विशेषता आहे.
धर्म हा शब्द सुद्धा गुणवाचक आहे. म्हणजे उदाहरणार्थ शिक्षकाचा धर्म काय तर शिकविणे. म्हणून धर्म हे नाव होऊ शकत नाही कारण ते विशेषण आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत