
(1) बुद्ध हा विष्णूचा अवतार नसून विष्णू हा बुद्धाचा अवतार आहे.
मत्स्यपुराण या मध्ये बुद्धाचा उल्लेख आलेला आहे. याचा अर्थ सरळ आहे बुद्ध कालखंडानंतर मत्स्य पुराण लिहिल्या गेलेले आहे. हे पुराण जर बुद्धाच्या अगोदर लिहिल्या गेले असते तर त्यामध्ये बुद्धाचा उल्लेख आलाच नसता.
या मत्स्यपुराणा तील अध्याय 47 मध्ये म्हटले आहे की कमळासारखे सुंदर डोळे असणाऱ्या, नवा अवतार बुद्ध खूप अगोदर झालेला आहे.- बुद्धो नवमको यज्ञे तपसा पुष्करेक्षण:(मत्स्य पुराण 47/247)
परंतु अध्याय 271 मध्ये याच पुराणांमध्ये असे लिहिलेले आहे की शुद्ध धनाचा पुत्र सिद्धार्थ भविष्यामध्ये जन्म घेणार-शुद्धोदनस्य भविता सिद्धार्थ: पुष्कल: सुत:(मत्स्यपुराण,271/12)
(2) ही भ्रम वाद्यांची सैतानी भाषा आहे.
हे भाषेचे सैतानी षडयंत्र आहे. जेव्हा एकदा सांगितले आहे की बुद्ध अगोदर होऊन चुकलेले आहे, मग अध्याय 271 मध्ये भविष्यकाळाचा वापर पुन्हा कशासाठी आहे ?
हे भाषेचे षडयंत्र आहे, बघा कसे-अगोदर याच पुराणांमध्ये हे म्हटलेले आहे की बुद्ध अगोदरच होऊन गेलेले आहे, म्हणजे भूतकाळात बुद्ध होऊन गेलेले आहे. लगेचच हे आपल्या सैतानी भाषेचा वापर करून म्हणतात की शुद्धोधनाचा पुत्र भविष्यामध्ये जन्म घेणार आहे. तर ही यांची सैतानी भाषेतील षडयंत्र आहे.
अरे मूर्खांनो अगोदरच सांगता बुद्ध भूतकाळामध्ये होऊन गेले आणि लगेचच म्हणतात की बुद्ध भविष्य काळात होणार आहे.
खरे पाहता हे पुराण लिहिणारा लेखक हे दर्शवू इच्छिते की आमचे पुराण भविष्यकाळातील होणाऱ्या घटनांना अगोदरच या घटना होणार आहे असे सांगत असते.
हे भ्रमवादी लोक आपल्या ग्रंथातील कथा सांगत असताना या गोष्टीवर जोर देतात की पहा पुराणांमध्ये ही गोष्ट अगोदरच लिहून ठेवली होती की असे होणार होते, की बुद्ध जन्म घेणार आणि झालेही तसेच.
म्हणून आमचे पुराण प्रामाणिक, भविष्यदर्शी आणि भविष्याचा वेध घेणारे आमची ऋषी मुलींची निर्मिती म्हणजे हे पुराण आहे. म्हणून पुराना मध्ये जे लिहिले आहे ते शिरसावंद्य आहे. जे पुरानामध्ये लिहिले आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये मान्य केलेच पाहिजे. हे सर्व ग्रंथ कारण की आमच्या ब्राह्मणांनी व पंडित पुरोहितांनी लिहलेले आहे. म्हणजे आम्ही ब्राह्मण सुद्धा या पुराणाप्रमाणेच प्रामाणिक आहोत. आम्ही जैसे सांगतो तसेच करा, तुमचे कल्याण होईल. हा आपले दुकान चालविण्याचा एक उपयुक्त प्रकार होता.
(3) भूतकाळाला भविष्यकाळात सांगणे हा भ्रमवादी लोकांचा खोटारडेपणा आहे.
जेव्हा ब्राह्मणवादाने बुद्धाला स्वीकारण्याचा विचार केला तेव्हा त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये बुद्धाचा उल्लेख करणे सुरू केले. नवीन नवीन श्लोक निर्माण करून त्याचा समावेश त्यांच्या ग्रंथांमध्ये त्यांनी केला.
आता बुद्ध हे तर पूर्वी होऊन चुकले होते. म्हणून त्यांचा उल्लेख भूतकाळातच करणे ही क्रिया स्वाभाविक होती. परंतु हे पुराण लिहिणाऱ्यांना आपला गुप्त षडयंत्रकारी अजेंडा लागू करायचा होता. म्हणून त्यांनी भविष्यकाळाचा वापर केला की, जेणेकरून लोकांना प्रभावित करता येईल आणि सांगता येईल की आमच्या ग्रंथांमध्ये हे तर अगोदरच लिहून ठेवले होते की बुद्ध 9 वे अवतार घेईल, इत्यादी.
सर्वसामान्य लोकांना तर संस्कृतचे ज्ञानच नव्हते ना त्यांच्याजवळ पुस्तक उपलब्ध होते, ती त्यांना पुरोहित आणि पंडे यांच्या कथा ऐकून त्यांनाच सत्य मानत होता.
सामान्य माणूस कुठल्याही प्रकारचे विश्लेषण करीत नव्हता, त्यावर कोणतीही शंका व्यक्त करीत नव्हता. परंतु जर का पुराण मधील त्याचे मूळचे श्लोक काळजीपूर्वक वाचले तर, पुराण घेणाऱ्या पंडे पूर्वहितांचे तळ उघडे पडण्यास उशीर लागणार नाही.
हे पंडित जेथे तेथे सर्वत्र भविष्यकाळातील क्रियांचा वापर करतात, परंतु सर्वच ठिकाणी ते असे करू शकले नाही. भूतकाळात होऊन गेलेल्या घटनांचा जाणून बुजून भविष्य काळामध्ये लिहीत असताना ते प्रत्येक ठिकाणी सर्वत्र सावध न राहता भूतकाळातील क्रियेचा वापर करीत आहे. यामुळेच खोटारडेपणा उघडा पडतो; त्यांच्या बेमानीचा भंडा फोड होते. जसे की प्रस्तुत मत्स्यपुराण मध्ये आम्ही पाहिलेले आहे.
गंगाधर नाखले
24/01/2025
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत