दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

भीमाकोरेगावच्या शूरवीर महार नागवंशी सैनिकांचा इतिहास-

भटूकडे सांगतात की पेशवाई हीच मराठेशाही होती,पण तस नसून पेशवाई हीच ब्राम्हणशाही होती आणि म्हणूनच १८१८ ला मूळचे नागवंशी असणारे,महार मराठा व इतर अश्पृश्य सोबत मुसलमान यांनी मिळून पेशवाई गाडून,मराठेशाही चा बदला घेतला.

पुढील पुराव्यावरून पेशवाई ही मराठेशाही नव्हती लक्ष्यात येते.
1) छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी पेशव्यांना दोन सनदापत्र लिहून दिले,पुढे त्यांचा दत्तक मुलगा छत्रपती रामराजा यांच्याकडून पेशव्यांनी सांगोला तहात एक सनद लिहून घेतली या तिन सनदापत्रानुसार संपूर्ण मराठेशाहीची सत्ता छत्रपतींच्या हातातून जावून पेशव्यांच्या हाती गेली.
*संदर्भ_ मराठा कालखंड
Page_ 493, 494, 495,
संदर्भ_ मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ६
लेखक_ वि. का. राजवाडे

2) छत्रपती शिवाजी राजांनी सुरू केलेला शिवशक पेशव्यांनी बंद पाडला आणि मुघली फसली शक सुरु केला.

3) पहिल्या बाजीराव पेशव्याने, जोरावरखानाचा पराभव करून गुजरात जिंकणाऱ्या मराठा सरसेनापती उमाबाई दाभाडे यांना तह करण्यासाठी आळंदीजवळ बोलावून कैदेत टाकले आणि त्यांना कैदेत मारले.त्यांच्या मुलाला द्वेषापोटी दगाबाजीने मारले.

4) छत्रपती शिवाजी महाराजांचे सातारा गादीचे वंशज पहिले छत्रपती प्रतापसिंह महाराज हे लहान वयात गादीवरती आले, तेव्हा दुसऱ्या बाजीराव पेशव्याने त्यांच्या शिक्षणावर बंदी घातली, कारण हा बाल छत्रपती शिकला तर शहाणा होईल आणि शहाणा झाला तर तो आपल्या अंकित राहणार नाही, म्हणून त्यांच्या शिक्षणावर बंदी घातली. छत्रपती घराणे त्यांना चोरून शिकवेल म्हणून पेशव्यांनी सातारच्या राजवाड्या भोवती गुप्तहेर नेमले, तेव्हा छत्रपती प्रतापसिंह महाराजांची आई रात्री अडीच वाजता चोरून शिकवायची. छत्रपतींची ही अवस्था तर सामान्य रयतेचे पेशव्यांनी काय हाल केले असतील? याची कल्पना करा.

5) पेशव्यांना धडा शिकवण्यासाठी सातारा येथून पुण्याकडे सैन्य घेऊन निघालेल्या छत्रपती चतुरसिंग भोसले यांना दगाबाजीने पकडून दुसऱ्या बाजीरावाने कोकणातील कांगोरी किल्ल्यात डांबून छत्रपती चतुरसिंगांना हालहाल करून ठार मारले.

6) अमृतराव पेशवेव्याने खंडणी न देणाऱ्या शेतकऱ्यांना तापलेल्या तव्यावर उभे करून छळले, तर शेतकऱ्यांच्या लहान मुलांच्या बेंबीत आणि कानात तोफेची दारू भरून त्याला अग्नी द्यायचा, त्यामुळे मुलांचे डोके आणि पोट फुटायचे, इसिस, तालिबानी, नक्षली, सनातनी लोकांना निर्दयपाने मारतात, तसेच पेशवेदेखील निरपराध प्रजेला निर्दयपणे मारत असत.

7) इंदूरच्या विठोजी होळकर यांना पुण्यात हत्तीच्या पायाला बांधून दुसऱ्या बाजीराव पेशवाने हालहाल करून ठार मारले.मराठासाम्राज्याला” अस्ताकडे ढकलनारा इतिहासातील सर्वात दुर्दैवी दिनविशेष…१६ एप्रिल १८०१ #विठोजीराजेहोळकर क्रूर हत्या शनिवारवाडा, पुणे..!!

8) पेशव्यांनी 1802 साली इंग्रजाबरोबर वसईचा तह केला होता व इंग्रजांची तैनाती फौज पदरी बाळगली होती. छत्रपती प्रतापसिंह महाराजांना कैद करण्यासाठी इंग्रजांना मदत करणाऱ्या व शनिवारवाड्यावरचा जरीपटका खाली उतरवून इंग्रजांचा युनियन जॅक फडकवला,

9) मराठा साम्राज्य व पेशवाई एकच असती तर 1857 च्या बंडात नानासाहेब पेशव्याने ग्वाल्हेर लुटून खाल्लं नसतं..

10) पेशवाई १८१८ साली रावबाजीची पेशवाई संपुष्टात आल्यावर स्त्रियांनी उद्गार काढले, “बाजीरावाचे आता पुण्यात राज्य नाही, बरे झाले! चांगले मेल्याचे तळपट झाले. मोठा चांडाळ होता तो.”
(संदर्भ: लोकहितवादींची शतपत्रे, संपादक श्री. रा. टिकेकर, पृष्ट १०)

11) तिसऱ्या पानिपताच्या वेळेस अब्दाली युद्धाचे नियोजन करत होता तर पेशवे यज्ञ,याग,होम हवं,भेदाभेद, व्रतवैकल्ये करण्यात दंग होते.म्हणजे सदाशिव पेशव्याने एक लाख मराठयांना अब्दालीच्या समोर नेवून बळी दिले,
तेंव्हा महाराणी ताराराणी म्हणाल्या बरं झालं पेशवाई बुडाली.

12) जळो तोंड मेल्या पेशवा चे, मी बाई म्हणून राज्य बाळकावू पाहतो, हे राज्य आम्ही तलवारीच्या जोरावर कमावले असून भट भिक्षुकी करून मिळवले नाही.

  • अहिल्यादेवी होळकर

13) हे तेच पेशवे होते ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर विष प्रयोग करून मारण्याचे प्रयत्न केले होते,

*भेटूकडे प्रचार करातात की,महार देशद्रोही होते त्यांनी ब्रिटिशांना मदत करून पेशवाई नष्ट केली.-

500 महार मावळ्यांनी 300 ब्रिटीशांची मदत घेतली किंबहुना ब्रिटिश आणि पाचशे मावळे एकत्र येऊन पेशव्याविरुद्ध लढले, म्हणून त्यांना देशद्रोही ठरवता येणार नाही,कारण 1818 साली देश,राष्ट्र ही संकल्पना नव्हती,त्या काळात विविध संस्थाने होती. देश,राष्ट्र ही संकल्पना 1947- 1950 नंतर आली.

1) डॉ.बाबासाहेब महार सैनिका वर लिहतात
इंग्रजांच्या फौजेत महार फलटणी' होत्या, यावरूनअस्पृश्य देशाविरुध्द लढले, त्यांनी देश गुलाम करण्यास मदत केली’ असे आरोप करणाऱ्यांना माझे उत्तर आहे की, “जर अस्पृश्यांच्याकडून देशद्रोह घडला असेल तर त्याचे पाप ज्यांनी अस्पृश्यता निर्माण करून दलितांना गुलाम केले त्यांच्यावर आहे.सवर्ण समाजाने अस्पृश्यतेच्या रूपाने मानवद्रोह' केला. यामानवद्रोहीं’वर अस्पृश्यांच्या हातून घडलेल्या `देशद्रोहा’ची जबाबदारी आहे!
[अस्पृश्यांचा द्रोह मानवद्रोहींविरुध्द होता ]
-विश्वरत्न.डॉ.बाबासाहेब आंबेडकर…
【Ref:बहिष्कृत भारत- अग्रलेख, २१/१२/१९२८)

2) १७८४ ला मैसूर पेशवा युद्धात पेशवे टिपू सुलतान विरोधात ईस्ट इंडिया कंपनी सोबत गेले.मग पेशवे देशभक्त कसे?

3) शृंगेरीच्या शंकराचार्यांचा मठ पेशव्यांनी लुटला व उद्वस्त केला. सदर मठ टिपू सुलतानाने पुन्हा उभारला..कोण देशभक्त आहे.पेशवे की टिपू ?

4) १८०२ ला पेशवा दुसरा बाजीराव वसईच्या तहानुसार ईस्ट इंडिया कंपनीला शरण गेला होता व इंग्रजांची तैनाती फौज पदरी बाळगली होती. छत्रपती प्रतापसिंह महाराजांना कैद करण्यासाठी इंग्रजांना मदत करणाऱ्यासाठी व शनिवार वाड्यावरचा जरीपटका खाली उतरवून इंग्रजांचा युनियन जॅक फडकवला,मग सांगा पेशवे राष्ट्र भक्त कसे?

5) १८१८ नंतरही पेशवा ईस्ट इंडिया कंपनीची पेंशन खात होता.मग दुसरा बाजीराव देशद्रोही नाही काय?

6) १८५१ ला दुसरा बाजीराव मेल्यावर त्याच्या दत्तक मुलाची म्हणजे नानासाहेब पेशव्याची कंपनीने पेन्शन बंद केली
म्हणून नानासाहेब १८५७ च्या बंडात शामिल झाला.
शेवटी नेपाळला पळून गेला.जर ईस्ट इंडिया कंपनी पेशव्यांना पेन्शन देत होती असे असेल तर मग पेशवे राष्ट्रभक्त कसे ?

9) इंडिया गेट लुटियन ने बनवला ,लार्ड इरविन ने त्याचे उदघाटन केले होते त्यावर पहिल्या महायुद्धत शहीद झालेल्या 70 हजार सैनिकांचे का नाव आहे.दरवर्षी पंतप्रधान इंडिया गेट वर श्रद्धांजली वाहता मग ते शहीद देशभक्त की देशद्रोही?

10) ब्राम्हण मंगलपांडे ब्रिटिश सैन्यात कामाला होते,मग ते तेव्हा कोण होते ?

**महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारे स्त्रीलंपट पेशवा आणि त्यांची दुष्कर्मे –

1) बाजीराव याचा मुलगा नानासाहेब हा मात्र मोठा रंगेलबाज होता त्याला उत्तरेकडच्या कवळ्या मुली लागत तस पत्रच त्याने १७४४ रोजी आपला कारभारी दामोदरपंत हिंगणे याला लिहीले आहे,त्यात त्याने १०-१२ वर्षाच्या मुली खरेदी करून पुण्याला पाठवून द्यावे असं सांगितलं आहे.दुसरा बाजीराव रंगेलबाजांचा बापच म्हणावे लागेल याने महिन्याला पगार देऊन बऱ्याच बायका पदरी ठेवल्या होत्या.

बाजीरावपेक्षा याचा भाऊ एक काकण चढच होता रघुनाथराव दादा स्वतःला साक्षात कृष्णच समजत असे त्याच्याभोवती सतत बायकांचा घोळका असे रघुनाथराव दादाला बायकांपासून झालेल्या मुली आहेत याच मुलींसोबत पुढे रघुनाथराव दादाचा मुलगा दुसरा बाजीराव याने शरीरसंबंध ठेवले या मुली दुसऱ्या बाजीरावाच्या प्रेयसी होत्या या अगोदर महाराष्ट्रात असा व्यभिचार कधीही झाला नव्हता.

आतापुढच उदाहरण तर इतिहासात कुठेही सापडणारच नाही दुसर्‍या बाजीराव पेशव्याने आपल्या सरदारांच्या बायकांना ही फुस लावून, वेळप्रसंगी धमकावून त्यांच्याशी मैत्री केली होती त्यामुळे सरदार लोकांना तोंड दाखवायला जागा राहीली नाही शिवाय त्याने सरळसरळ सरदार लोकांना व कारभाऱ्यांना आपल्या बायका मुली पाठवून देण्याची भाषा केली ज्यांनी नाकारले त्यांची घरेदारे जप्त करून त्यांना राज्यातून बेदखल केले त्यामुळे सरदार व कारभारी हतबल झाले होते.
-संदर्भ_ पेशव्यांचे विलासी जीवन
लेखक_ डॉ. वर्षां शिरगावकर

2) वाड्यात दोनशे-तीनशे बायका नित्य न्हावयास (आंघोळीस) येत. त्यांनी सकाळी न्हावयास प्रारंभ करावा, तो प्रहर दिवसपर्यंत चाले.पंक्ती-भोजनाचे समई सर्वकाळ बायका जवळ बसलेल्या असावयाच्या.आश्रित लोकांनी चार-चार पाच-पाच लग्ने करून घरी एक बायको ठेवावी आणी सरकारवाड्यात बाकीच्या बायका पाठवाव्यात.आणी याजकरिता अन्याबा राहतेकर वगैरे यांनी जास्त लग्ने केली होती.जो गृहस्थ वाड्यात बायको पाठविणार नाही त्याजवर दुसऱ्या बाजीराव भटाची (पेशवा) इतराजी व्हावयाची.यामुळे अब्रुदार गृहस्थांनी वाड्यात जाण्याचे सोडिले…
*ऐतिहासिक गोष्टीत ( भाग पहिला १८३२ )
गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादींनी

3) मंडळींत जो बिभित्सपणा आणी व्यभिचाराचा अत्यंत निंद्य प्रकार चालतो तो उच्चारू सुद्धा नये इतका घाणेरडा असतो.
हे राजश्री (म्हणजे बाजीराव) ते पाहून आनंदात निमग्न होत असतात.ह्या मंडळींत येणाऱ्या बायका पुष्कळ आणि बहुदा थोर-थोरांच्या असतात. जे सरदार आपल्या बायका वाड्यात पाठवीत नाहीत त्यांवर श्रीमंतांची ( म्हणजे बाजीरावाची) अवकृपा होते.”
-गोडबोलेकृत एल्फिन्स्टन चरित्र (सण १९११ पूर्वार्ध)

4) माहुलीच्या वाड्यात एका आवडत्या स्त्रीस पुरुषाचा पोशाख घालून गादीवर बसवून आणी स्वतः खिजमतगार होऊन चवरी वारण्याचा आंबट-शौकी खेळ श्रीमंत (बाजीराव) खेळले.”ह्या वरील वर्णनावरून श्रीमंत बाजीराव भट (पेशवा) कुठल्या थराला गेला होता हे दिसून येते.
-तात्यासाहेब केळकर( ‘मराठे व इंग्रज’ या ग्रंथ)

5) बाजीरावाला कश्याची चाढ नाही.
खाजगी संबंधात तर त्याच्याकडून लोकांचा भयंकर छळ होतो.
(खाजगी संबंध शब्दाचा अर्थ वेगळा आहे. हुशारांच्या लगेच लक्षात येईल. )
-ड्यूक ऑफ वेलिंग्टन नावाने प्रसिद्ध असलेला ऑर्थर वेलस्लीने (Arthur Wellesley ) ग्रन्थ,

*भिमाकोरेगावच्या युद्धाची शौर्य गाथा –
‘छत्रपती शिवाजी,छत्रपती संभाजी यांनी निर्माण केलेले स्वराज्य,पायपोस किंमतचे नोकर पेशवा यांनी बळकावून, रंडीबाजी करून, मराठे व अस्पृश्य लोकांचा छळ अत्याचार करून लयास नेली, पुढे नागवंशी महार मराठा व इतर अस्पृश्य लोकांनी एकत्र लढून पेशवाई गाडून मराठेशाही चा बदला घेतला.

संपूर्ण शिवकाळात महारांनी खांद्याला खांदा लावून मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध लढले आहे. वडू बुद्रुक महाराष्ट्रातील महार मराठा जातीभेद नसल्याचे महाराष्ट्रातील स्फूर्ती केंद्र होते.

भीमा कोरेगाव युद्धा मध्ये शहिद झालेल्या सैनिका मध्ये
“‘बॉम्बे नेटिव्ह इन्फट्री सेकन्ड बटालीयन फर्स्ट रेजिंमेन्ट’ चे 500पायदल सैनिका मध्ये 22 महार, 16 मराठा आणि अन्य अस्पृश्य ,8 राजपुत, 2 मुस्लिम, 2 ख्रिश्चन होते ।
पुना हॉर्स चे 250 सैनिक मधील 47 सैनिक, मद्रास तोपखाना चे 25 सैनिका मधील 12 सैनिक युद्ध भुमी वर शहिद झाले। यांचे नाव विजय स्तंभ वर आहेत,

1) कॅप्टन स्टॉटन व महार बटालियनने मोठा पराक्रम गाजवला १ जानेवारी १८१८ रोजी रात्री ९ वाजता पेशव्यांच्या सैन्याने पळ काढला त्यांच्या पाठीमागे कॅप्टन स्टॉटन व महार बटालियन लागली होती,
या लढाईत ब्रिटिश सैन्यातील ८३४ पैकी २७५ लोक मारले गेले तर पेशव्यांचे ६०० लोक मारले गेले
-संदर्भ_ अस्पृश्यांचा लष्करी पेशा
Page 17, 18, 19, 20

2) 500 सैनिकांपैकी खंडोजी माळवदकर हे एक शूर मराठा वीर होते. त्यांना ब्रिटिशांनी बक्षीस म्हणून जमीन इनाम दिली, त्यांच्या शेतात हा विजयस्तंभ आहे.

3) कोरेगाव भीमा शौर्य स्तंभाबाबत ची ऐतिहासिक हकीकत आदरणीय गोपाळबाबा वलंगकर यांनी इसवी सन १८९४ ला मुंबई प्रांताच्या कमांडर इन चीफ ला सादर केलेल्या निवेदनात ( Petition) सुस्पष्ट स्वरूपात उद्धृत केली आहे.ते लिहितात,
“In fighting against the high caste Hindus at the time of #Koregaon battle they dedicated their lives for the country, and our ancestors names are inscribed on the #pillar there.” (Page 58)

“कोरेगाव युद्धाच्या वेळी उच्च जातीच्या हिंदूंविरूद्ध लढताना त्यांनी आपले जीवन देशासाठी समर्पित केले आणि आमच्या पूर्वजांची नावे खांबावर कोरली गेली आहेत”(पान58)

गोपाळबाबा वलंगकर यांच्या बाबत बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय कृतज्ञता व्यक्त केलेली आहे.
सदर १८९४ चे निवेदन श्रीमती Gail Omvedt यांनी लिहिलेली पुस्तिका ‘ Building The Ambedkar Revolution….’ , भाष्य प्रकाशन पृष्ठ क्रमांक ५७ वर उपलब्ध आहे.

अशाप्रकारे मूळचे नागवंशी मराठा महार व इतर अस्पृश्यानी मिळून पेशवाई गाडून टाकली आणि इतिहास घडवला.

जय जिजाऊ
जय छत्रपती फुले शाहू आंबेडकर
जय मूलनिवासी

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!