शहीद नाईक बारकु कांबळे स्मृतिदिन
✹ २४ डिसेंबर ✹
स्मृती – २४ डिसेंबर १९४७
२४ डिसेंबर १९४७ रोजी सकाळी ६ वाजता हाडं गोठवणाऱ्या थंडीत महार बटालियन ची प्लाटुन क्रमांक-१ झांगड जम्मू काश्मीर मध्ये पहाऱ्यावर असताना २०० पाकिस्तानी हल्लेखोरांनी अचानक चौकीवर हल्ला चढवला, तेव्हा बटालियन चे नाईक बारकु कांबळे यांनी आपल्या दहा साथीदारा सह आपल्या पेक्षा वीस पट जास्त आणि शस्त्र सज्ज असलेल्या पाकिस्तानी हल्लेखोरांनी भारतीय भूभाग ताब्यात घेण्यासाठी जोरदार हल्ला चढवला, पण या सैनिकांनी केलेल्या पराक्रमामुळे शत्रू पुढे येऊ शकला नाही. प्रत्येक सैनिकांनी अखेर पर्यंत सर्वोच्च पराक्रम गाजवला. अखेर शत्रू सैन्य खुप जास्त प्रमाणात आल्या नंतर महार सैनिक शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी शहिद झाले, पण त्यांनी आपली चौकी सोडली नाही. या लढाईत दुसऱ्या चौकीवर असलेले हवालदार रावु कांबळे हे सुद्धा शहिद झाले. त्यांनी शेकडो पाकिस्तानी हल्लेखोरांना ठार केले. त्यामुळे चिडलेल्या पाकिस्तानी हल्लेखोरांनी त्यांचं शिर कापून नेले. या लढाईत खालील सैनिक शहीद झाले. त्या वीर पराक्रमी सैनिकाचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन.
१) नाईक बारकु कांबळे
२) हवालदार राऊ कांबळे
३) यशवंत कांबळे
४) मारुती सर्जे
५) गुरबल साबळे
६) तुकाराम कांबळे
७) सोन्या पोवार
८) मारुती तांबे
९) सूर्याजी हाटे
१०) जानू तांबे
११) गंगाराम मोहिते
१२) कोंडीबा आखाळे
१३) बाबू लक्ष्मण
अस्पृश्यांचा लष्करी पेशा
लेखक : चांगदेव भवानराव खैरमोडे
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
संदर्भ : फेसबुक
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत