मराठी माणसा आता तुझे काही खरे नाही!

महेंद्र कुंभारे,
संपादक तथा कामगार नेते, भिवंडी.
सोमवार दि. 23 डिसेंबर 2024.
मो.नं. 8888182324.
नुकतेच कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबावर परप्रांतीय व्यक्तीने लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची घटना घडली. धूप-अगरबत्ती लावण्याच्या किरकोळ वादावरुन परप्रांतीय व्यक्तीने बाहेरुन गुंड आणून स्थानिक मराठी कुटुंबावर हल्ला चढवला. हे सर्व महाराष्ट्रात, ठाणे जिल्ह्यात घडले आहे. हि घटना आत्ता जरी घडली असली तरी अशा अनेक घटना यापुर्वीही घडल्या आहेत. तसेच कित्येक घटना तर समोरही येत नाहीत. *मराठी माणसाने एखाद्या ठिकाणी घर घेताना त्याला मज्जाव करणे. तसेच त्याने काय खावे आणि काय खावू नये हे आता परप्रांतीय ठरवणार आहेत. खेकड्यासारखे एकमेकांचे पाय खेचण्याच्या चढओढीत मराठी माणूस आपल्या महाराष्ट्रातच पोरका झाला आहे.* याला जबाबदार आणि कारणीभूत कोण? हे असेच सुरु राहीले तर एक दिवस महाराष्ट्रात मराठी माणूस नावालाही शिल्लक राहणार नाही?
*महाराष्ट्रात सुरु असलेल्या गलिच्छ राजकारणाने मराठी माणसाचा घात केला आहे. मराठी माणूसच मराठी लोकांचा शत्रू बनला आहे. स्वराज्याप्रमाणेच फितुरीची किड महाराष्ट्राला लागली आहे.* रेल्वेमधून रोजच्या रोज परप्रांतियांचे लोंढेच्या लोंढे महाराष्ट्रात येत आहेत. महाराष्ट्रातील लोकसंख्येनुसार रस्ते, वीज, पाणी मुबलक आहे. मात्र उत्तरेकडून येणाऱ्या या नोंदणी नसलेल्या लोंढ्यांमुळे या सर्व नागरी सुविधांवर अतिरिक्त भार पडत आहे. म्हणूनच प्रत्येक शहरात नागरी सुविधा कोलमडून पडली आहे. *याच लोंढ्यांमुळे प्रत्येक खेडोपाडी, गाव, शहर येथे परप्रांतीयांचे मतदारसंघ तयार झाले आहेत. आपल्याच स्थानिक मराठी लोकांनी भाडा खाण्यासाठी (भाडखाऊ) त्यांना खोल्या भाड्यांनी देऊन आसरा दिला आहे. बाजारपेठेत फेरीवाले, ठेलेवाले, भाजीवाले सर्व परप्रांतीय असून त्यांनी रग्गड पैसा कमविला आहे. यांचे रेशनकार्ड, रहिवाशी दाखले आणि मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी आपलेच गाववाले, नगरसेवक, नेते, पुढारी आणि शासकीय अधिकारी चिरीमिरी घेऊन आपला महाराष्ट्र या परप्रांतीयांच्या स्वाधीन करत आहेत.* आज जरी याचा फायदा स्थानिक मराठी राजकारण्यांना होत असेल तरी पुढील काळात यांची लोकसंख्या वाढल्यामुळे त्या मतदारसंघात त्यांचे वर्चस्व निर्माण होऊन याच मराठी नेत्यांच्या ढुंगणावर ते *”लाथ”* मारणार आहेत. या परप्रांतीयांची संख्या बघायची असेल तर छटपुजेच्या दिवशी नदी, तलाव, खाडी, समुद्र येथे जाऊन हा प्रचंड जनसमुदाय पहावा. *आपल्याच गावात आपण अल्पसंख्याक झालो आहोत हे डोळे उघडे ठेवल्यास दिसून येईल. याच प्रचंड लोकसंख्येच्या (मतांच्या) बळावर राजकारण्यांचा धाक दाखवून हे परप्रांतीय, मराठी लोकांना मारत आहेत. आणि आपलेच नेते, पुढारी मतांच्या लाचारी साठी या परप्रांतीयांना साथ देत आहेत. म्हणूनच आता मराठी माणसाला कोणी वाली राहीला नसून आपल्याच राज्यात मराठी माणूस परका झाला आहे.*
महाराष्ट्रात मराठी माणसाची जी वाताहात झाली आहे ति वाचवायची असेल तर राजकारण्यांच्या हिंदुत्वाला बळी न पडता प्रथम आपली मराठी अस्मिता जपली पाहिजे. *मराठी माणसाचा खरा शत्रू मुसलमान नसून उत्तरप्रदेश, बिहार आणि गुजराती लोकं ज्यांनी मराठी तरुणांचे उद्योग, व्यवसाय, नोकरी बळकावल्या ते आहेत. पैसा आणि लोकसंख्येच्या बळावर यांनी कधीच मराठी माणसाला मागे टाकले आहे. नोकरी आणि व्यवसायात भैये आणि गुजरातीच दिसून येत आहेत. मराठी माणूस राजकारण्यांच्या सतरंजी उचलायला आणि दहीहंडी, गणेशोत्सव साजरी करण्यात मग्न आहेत.* शिक्षणातही मराठी तरुण मागे असून रेल्व आणि केंद्र सरकारच्या नोकरीत महाराष्ट्रातील मराठी माणूस सोडून सर्व राज्यातील लोकं मोठ्या प्रमाणात पहायला मिळतील. *खरेतर महाराष्ट्र मराठी माणसाच्या हातून कधीच निसटला असून सध्याची राजकीय स्तिथी पाहता लवकरच मुंबई गुजरातला आणि महाराष्ट्र अदानी,अंबानीच्या दावणीला बांधून सर्व नोकऱ्यांवर उत्तरप्रदेश, बिहार येथील लोकांचे वर्चस्व पहायला मिळेल.* त्यामुळे आता उरल्यासुरल्या मराठी लोकांनी डोळ्यावरील हिंदुत्वाची पट्टी काढून डोळे उघडून मराठी लोकांना एकत्र करुन पुन्हा एकदा महाराष्ट्र मुक्ततेसाठी लढा देणे काळाची गरज बनली आहे. अन्यथा आपल्याच महाराष्ट्रात मराठी माणूस नावालाही शिल्लक राहणार नाही याची सर्व मराठ्यांनी गांभिर्याने नोंद घ्यावी. कृपया वाचा आणि गप्प बसा असे करु नका. भविष्यातील खतरनाक धोका ओळखा आणि आत्तापासूनच मराठी माणसांना वाचवा. तुर्तास इतकेच…..! ✍️
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत