डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल गरळ ओखनाऱ्या जादीवादी अमित शहानी पदाचा राजीनामा द्यावा
परभणी प्रकरणातील सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळावा म्हणून नळदुर्ग येथे निदर्शने आंदोलन करण्यात आले .
नळदुर्ग शहर कडकडीत बंद
व्यापारी मंडळानी केले सहकार्य
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल देशाचे गृहमंत्री अमीत शहा यांनी आपल्या मुखातुन केलेल्या आक्षेपार्ह विधान हे अमित शहा यांना शोभत नाही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल जातीवादी अमित शहा गरळ ओखली आहे आशा मंत्र्यांनी खुर्चीवर न बसता त्यांनी राजीनामा द्यावा यांच्या निषेधार्थ आणि परभणी येथील भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या संबंधित पोलिस प्रशासनाच्या विरूद्ध नळदुर्ग ता.तुळजापूर येथे नळदुर्ग आणि परिसरातील भिमसैनिकांच्या वतीने कडकडीत नळदुर्ग बंद करून निदर्शने मोर्चा काढून जाहीर निषेध करून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आंबेडकर ,आंबेडकर असे म्हणण्याची फॅशन झाली आहे.असे म्हणून त्यांचा अवमान केला.अमित शहा यांच्या या आक्षेपार्ह विधानचा जाहीर निषेध व परभणी येथील शहीद भिमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू कारणीभूत असलेल्या पोलीस प्रशासनाच्या विरोधात नळदुर्ग येथे भिमसैनिकांच्या वतीने कडकडीत नळदुर्ग बंद करून निदर्शने मोर्चा काढण्यात आला होता यावेळी व्यापारी मंडळाच्या पदाधिकारी यांनी खुप मोठ सहकार्य केले .भिमनगर नळदुर्ग येथील बौद्ध विहार पासून मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून मोर्चास सुरूवात करण्यात आली.भिमनगर बौद्ध विहार ते कुरेशी गल्ली, किल्ला गेट, चावडी चौक मार्गे भव्य निदर्शने करित अमित शहा यांच्या निषेधार्थ प्रचंड घोषणाबाजी करीत हा मोर्चा येथील बसस्थानका समोर डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात येऊन थांबला.या ठिकाणी या मोर्चाचे जाहीर निषेध सभेत रूपांतर झाले.या प्रसंगी अमित शहा यांनी देशाची माफी मागून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा,शाहिद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाचे पन्नास लाख रुपये देऊन पुनर्वसन करावे, सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना कायमस्वरूपी निलंबित करुन त्यांच्याशर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आदी सह विविध मागण्यांचे निवेदन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांना देण्यात आले.यावेळी सुनील बनसोडे, बाबासाहेब बनसोडे, दुर्वास बनसोडे अजयकुमार बागडे , योगेश सुरवसे , तानाजी कदम , एस.के.गायकवाड, कैलास गवळी गुरुजी, अरूण लोखंडे,, सचिन बनसोडे, सिध्दांत बनसोडे,,रूषीकेश कांबळे,अश्वजीत कांबळे ,मारुती बनसोडे,शामकांत नागीले, दत्ता बनसोडे, महादेव कांबळे, राजेंद्र शिंदे, किशोर बनसोडे सरेश लोंढे, विश्वास रणे, रवी वाघमारे, अनिल वाघमारे महिला कार्यकर्त्यां कल्पनाताई गायकवाड , उषा शिंदे, पिंकी भोसले,स्नेहा झेंडार,सह नळदुर्ग व परिसरातील शेकडो भिमसैनिक उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत