भीमा कोरेगाव विजयाची चाहूल आणि हिंदू जागरण समीती मोर्चाचे षडयंत्राचे पडसाद परभणीतून….!
समाज माध्यमातून साभार
महाराष्ट्रातील सर्व 85% मूलनिवासी बहुजन समाजाला सुचित करीत आहोत की महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये मूलनिवासी बहुजन समाजाने आंदोलनात्मक भूमिका घेऊन मोठ-मोठे आंदोलने सुरू केलेली आहेत. त्यांचा आवाज दाबून टाकण्यासाठी मूलनिवासी बहुजन समाजाचे ईव्हीएम वरील लक्ष विचलित करण्यासाठी, ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये आंदोलने होऊ नये अशा प्रकारचे फार मोठे प्रयत्न महायुतीकडून सुरू असून त्यांच्या अंतर्गत तेवढेच मोठे कृत्य करण्याची आवश्यकता असल्याने आणि यासाठी मराठवाड्यातील चळवळीचे केंद्र असणाऱ्या परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर हिंदू जागरणाच्या मोर्चात सामिल झालेल्या पवार यास, “आपल्या मराठ्यांना याच संविधानाने आरक्षण मिळू दिले जात नाही” अशी चिथावणी देवून,त्याला संविधान प्रतिकृती फोडण्यास प्रवृत्त करून आपल्या सबंध देशाच्या दुश्मनाने अर्थात कपटी विषमतावादी मनुवादी ब्राह्मण लोक आणि त्यांचा हिंदू जागरण समीतीच्या नावाचे मोर्चेच समाजात अशांतता निर्माण करत आहेत,आगामी “भीमाकोरेगाव” विजयस्तंभाला मानवंदना देण्याचा आणि सबंध बहुजनाला आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षे गुलामी लादलेल्या पेशवाईला परास्त केले.
ही ऐतिहासिक घटना बहुजनाला आपल्या लढावू पूर्वजांच्या विजयाची शौर्याची आणि कपटी षडयंत्रकारी बामणी पेशवाईच्या पराजयाची,आयतेखावू भटांच्या अपमानाची आणि समस्त बहुजनाला सन्मानाची प्रेरणा देणारी आहे….
जातीभेद,विषमता,भेदभाव,गैरबराबरी,ब्राह्मणी पेशवाईचा खात्मा ही खदखद ब्राम्हणाला झोपीतही भीती वाटणारी आहे.आपल्या देशात न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधूत्वाऐवजी विषमतेचे मुळ मनुस्मृतीची मनुवादी पिल्लावळ याच बामणांच्या पूर्वजांनी परकिय मोगलांच्या मदतीने कपटाने कुळवाडीभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांनी न्याय व समता आणि बंधुत्वाने अठरापगड बहुजनांच्या हिताचे रयतेचे राज्य स्थापन केले होते.यामुळे बामणांच्या पोटशूळात सतत दुखत आणि खूपत त्यांनी चार चार ग्रंथ जसे “बुध्दभूषण” हा संस्कृतात लिहीला संस्कृताचा बुरखा पांघरलेल्या भटांना हजारवेळा लाजवणारा आहे.नायिकाभेद,
सातशक,दंडनीती लिहीलेल्या न्यायी,
विद्वान,कुशल संघटक,एकही लढाई न हरलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचा मोगलांशी संगणमत करून बळी घेतला,याचा बदला अठरापगड बहुजन 500 मावळ्यांचे सेनापती,नेतृत्व शुर नरवीर सिध्दनाग यांनी करून पेशवाईचा खात्मा करून घेतला.ही बाब बामणाला सतत बोचणारी आहे,म्हणून मनोहर भीडे,
मीलींद एकबोटे,आनंद दवे यांनी “हिंदू जागरण समीती” नावाने बहुजन बांधवांना चूकीचा खोटा इतिहास माथी मारणे चालू आहे.बांग्लादेशात,
पाकिस्थानात हिंदू लोकसंख्या कमी होत आहे,अत्याचार वाढत आहे,परकिय देशातील लोकांचा पुळका दाखवून भडकावू वातावरण जाणीवपूर्वक करत आहेत,आपल्या देशात,मणिपूर,आसाम राज्यात महीलांची क्रुरपणे हत्या केली जात आहे,शोषण केले जात आहे, याविषयी हिंदू जागरण कुठे बीळात लपून बसत आहेत,याउलट आपल्या राज्यात जातीय दंगलीला खतपाणी घालून उचकवण्यासाठीच या समाज कंटकांनी भारतीय संविधानप्रतिकृती तोडफोड करायला लावून समाज अशांत करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे,या बदमाशी कुटील नीतीचा पडदाफाश करण्यासाठी सबंध बहुजनांनी हिंदूजागरण समीती या बामणांच्या सामाजिक अशांततेला वळण देणार्या मोर्चाचे कृत्यावर आळा घालून प्रशासनाने,
“हिंदू जागरण समीतीवर देशद्राहाचा गुन्हा दाखल करून कार्यवाही करावी” पण असे होणार नाही,यांच्या बदमाश कृतीमुळे आंबेडकरी समाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर येऊन आंदोलने करेल जाळपोळ करेल, शासकीय मालमत्तेचा नुकसान करेल! अशा अफवा खोट्या जाळपोळीत सामान्यांना वेठिस धरून गरीबांच्याच लेकरांवर गुन्हे दाखल केले जाणार ही अपेक्षा ईव्हीएम च्या माध्यमातून पाशवी बहुमताच्याद्वारे सत्तेवर बसलेल्या राजकर्त्यांचे षडयंत्र आहे. त्याचबरोबर 1 जानेवारीला “भीमा कोरेगाव ” येथे बामणी पिल्लावळीचा पेशवाईचा अंत आणि “बहुजनांच्या विजयी दिनाचा कार्यक्रम” असल्याने त्या कार्यक्रमावरही आपल्याला बंदीचा आदेश काढता येईल या भावनेतून सरकारने षडयंत्रपूर्वक केलेले नियोजन आहे. म्हणून
या देशातील 85% मूलनिवासी बहुजन समाजाला त्याचबरोबर आंबेडकरी जनसमुदायाला नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे.
या “हिंदू जागरण समीतीच्या मोर्चाच्या” षडयंत्रकारी आंदोलनामध्ये आपण बळी पडून आपले आयुष्य उध्वस्त करून घेऊ नका कायदेशीर मार्गाने हे आंदोलन हाताळण्यासाठी आंबेडकरी समाजामध्ये असलेल्या सर्व वकील बांधवांनी नियोजन करून संविधानाने दिलेल्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या कायद्याच्या द्वारे हिंदू जागरण समीतीच्या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला फाशी देण्यात यावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर देशभरामध्ये उपोषण अमरनऊपोषण धरणे आंदोलन अशा प्रकारची वेगवेगळी आंदोलने करून सरकारला सळो की पळो करून आपल्या मागण्या प्रशासना समोर मांडून यशस्वीरित्या ही लढाई आपण जिंकू शकतो
कृपया हिंसक आंदोलनात्मक भूमिका घेऊन तोड फोड करू नका,टायरांची जाळपोळीने प्रदूषण करू नका याचा गैरफायदा आर एस एसचे भ्याडगुंड प्रवृत्तीचे लोक आपल्यामध्ये घुसुन जाळपोळ करू शकतात या शांततेच्या आंदोलनाला चूकीचे वेगळे वळण देऊ शकतात, त्यामुळे त्यांच्यावरही आपण सावध व जागृत राहून लक्ष ठेवलं पाहिजे आणि हे आंदोलन शांततेच्या मार्गाने हाताळले पाहिजे या देशातील बीजेपी आणि आरएसएसला अपेक्षित असणारी हिंदू मुस्लिम दंगल आता होत नाही,मुस्लीम प्रतिक्रिया देत नाहीत म्हणून त्यांनी प्रतिक्रिया देणाऱ्या सक्रिय आंबेडकरी समूहाला टार्गेट करून जाणीवपूर्वक संविधान जाळणे याची तोडफोड करणे आंबेडकरी पुतळ्याची तोडफोड करणे असे गुन्हे करून आंबेडकरी समूहाला आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम बीजेपी आरएसएस करत आहे.आपल्या विरोधामध्ये एससी,एसटी,ओबीसी समाजातील समूह जाणार नाहीत याची काळजी आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे म्हणून आमची नम्रतेची व कळकळीची विनंती आहे की आपण संयमाची भूमिका घेऊन शांततेच्या मार्गाने घटनेच्या चाकोरीत राहून आंदोलने करून त्यांना उत्तर दिले पाहिजे व त्या छुप्या गुन्हेगारांना शिक्षा मिळाली पाहिजे असे आपण कराल अशा प्रकारची अपेक्षा आहे.
🌹🌷🙏✍एक जबाबदार नागरीक,सामाजिक कार्यकर्ता✍️
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत