परभणी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची भिमशक्तीची मागणी…
सोलापूर प्रतिनिधी
दि.१० डिसेंबर २०२४ रोजी परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासोबत असलेल्या संविधानाचे शिल्पाची नासधूस करुन त्याची विटंबना जातीय वादी शक्तीकडून करण्यात आली.. या भ्याड कृत्याचा भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला.
या विटंबनाच्या निषधार्थ जे आंदोलक रस्त्यावर उतरले होते त्यांच्यावर दाखल करण्यात गुन्हे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत. व तेथील अटक सत्र त्वरित थांबवावे अशा आशयाची निवेदन भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने खा. चंद्रकांत हांडोरे यांच्या आदेशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
या प्रकरणातील जो आरोपी सापडलेला आहे, तो बागायती शेतकरी व सुशिक्षित आहे तरीसुध्दा त्याच्या पाठीमागील शक्तीला लपविण्यासाठी पोलिस खात्याने त्या आरोपीला माथेफिरु, मनोरुग्ण संबोधून सर्व तपास गुंडाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. या विटंबना पाठीमागची खरी माहिती उघड करण्यासाठी या आरोपीवर रिमांड काढून त्याच्याकडून खरी माहिती काढून हस्तगत करुन संबंधितावर त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे…
यावेळी. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुबोध वाघमोडे, पं.म. सरचिटणीस राजाभाऊ कदम महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमिला तुपलोंढे, शहर कार्याध्यक्ष अड. कमरुनिसा बागवान, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नसरीन शेख, मेजर साबळे, नागेश गायकवाड, के.एम. कांबळे, भारत क्षीरसागर, सलीम भाई मुल्ला, इब्राहीम शेख, रफिक शेख, कल्लप्पा बनसोडे, मुमताज शेख, मुमताज तांबोळी, ज्योती गायकवाड, विजयालक्ष्मी झाकणे, राजश्री साबळे, सचिन साबळे, गणेश चंदनशिवे, पप्पु गायकवाड, विक्रम वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते
फोटो ओळी
परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
सोबत फोटो आहे
.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत