दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानविदर्भ

परभणीतील संविधान विटंबनेचा इस्लामपूरात राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांकडून जाहीर निषेध…!

परभणी येथे १० डिसेंबर रोजी समाजकंटकाकडून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिमेची दगड घालून केलेल्या विटंबनेचा जाहीर निषेध करण्यात आला. याबाबतचे निवेदन तहसिलदार सचिन पाटील यांना वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणी सदस्या डॉ.क्रांती सावंत, तक्षशिला ज्ञान केंद्राचे उपाध्यक्ष आयु.अवधूत कांबळे,सी.आर. सांगलीकर फाऊंडेशनचे संचालक आयु.अमोल कांबळे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष आयु.सुधीर कांबळे,अंनिसचे राज्य सचिव आयु.संजय बनसोडे, काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष ज.शाकीर तांबोळी, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे आयु.दिग्विजय पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.

भारतीय संविधान देशाचा आत्मा असून लोकशाही, समता, बंधुता, व न्याय या मूलभूत तत्वांचा पाया आहे. संविधानाच्या माध्यमातूनच देशातील प्रत्येक नागरिकास स्वातंत्र्य, समानता व हक्कांची हमी दिली आहे. त्यामुळे भारतीय संविधानाचा आदर आणि त्याचे रक्षण करणे हे केवळ शासनाचेच नव्हे तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. दि.10 डिसेंबर रोजी परभणी येथे भारतीय संविधानाची विटंबना झाल्याने देशाच्या एकात्मतेलाही धक्का बसला आहे. ही घटना संविधानाच्या प्रति नागरिकांच्या निष्ठा व आदर भावना दुखावणारी आहे. संबंधित घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. दोषींवर कठोर शिक्षेची अंमलबजावणी करावी. संविधान आणि लोकशाही प्रक्रियेच्या रक्षणासाठी सार्वजनिक स्थळी व संवेदनशील भागांत योग्य सुरक्षाव्यवस्था लागू करावी. नागरिकांमध्ये संविधानाब‌द्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जनजागृती मोहिम राबवावी. अशा घटना रोखण्यासाठी कठोर कारवाई आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष पथक तयार करावे.याप्रसंगी बहुजन समाज पक्षाचे जेष्ठ नेते शरद कांबळे,तालुकाध्यक्ष मानसिंग विरभक्त, वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कांबळे, आरपीआयचे जिल्हा सचिव सचिन जाधव, शहराध्यक्ष अमर बनसोडे, सुशील सावंत,दलित महासंघाचे राज्य उपाध्यक्ष शंकर महापूरे,तालुका उपाध्यक्ष दिपक मिसाळ, पंचायत समितीचे माजी सभापती शैलेंद्र सूर्यवंशी,स्वाभिमानी संघर्ष सेनेचे अध्यक्ष पिराजी थोरवडे, मुस्लिम लीगचे अॅड.जमीर खानजादे, समता सैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पवार,तालुका सचिव किशोर जाधव,तक्षशीला ज्ञान केंद्राचे अरविंद कांबळे, यशवंत धुमाळे, कुणाल कामत, संजय कुरणे, वसंत भंडारे, प्रशांत इंगळे, सत्यजीत माने, प्रा.मिलिंद खंडेलोटे, प्रा.खडसे, प्रा.दांडगे उपस्थित होते.


संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!