कॉंग्रेस पक्ष संपला तरच तिसरा बहूजनवादी पर्याय ऊभा राहतोय.

कॉंग्रेस हा पक्ष सेक्युलर विचारांचा आहे, असे समजणा-या लोकांनी लवकर भ्रमातून बाहेर पडावे. भ्रमातून या अर्थाने म्हटले की ५५-६० वर्षे दिर्घकाळ सत्ताधारी राहिलेल्या कॉंग्रेस पक्षाने आपल्या हातातील संपूर्ण मिडिया चा बेमालूमपणे वापर करीत कॉंग्रेस पक्ष सेक्युलर विचारांचा आहे अशी सातत्याने मांडणी केली. आणि नियोजन बद्ध रितीने अल्पसंख्याक मुस्लिम आणि दलित समाज आपल्या दावणीला बांधला.भोळ्या दलित आणि मुस्लिम जनतेने त्यावर विश्वास ठेवला परंतु प्रत्यक्षात कॉंग्रेस हा राजकीय पक्ष सवर्ण मानसिकतेचा आहे. हा त्यांच्या ५५-६० वर्षाच्या कार्यकाळातील अनुभव ओरडून ओरडून सांगतोय.
मुस्लिम आणि दलित मते घेऊन सत्ताधारी व्हायचे मात्र प्रत्यक्षात सत्ता सवर्णांसाठी राबवायची असा गेल्या ५५-६० वर्षाच्या दिर्घ काळ सत्तेचा अनुभव जनतेला येतं गेला. प्रत्येक राज्यात घराणेशाही निर्माण झाली ती कॉंग्रेस पक्षाच्याच धोरणाचा भाग आहे. प्रत्येक राज्यात जातदांडगे सत्तेत ठाणं मांडून बसले तेही कॉंग्रेस पक्षाचेच पाप आहे. न्याय पालिकेत सवर्णांचाच भरणा करणारी कॉलेजियम सिस्टम राबविणारा कॉंग्रेस पक्षचं आहे….!!
ईव्हीएम नावाचं भुत बोकांडी बसवणारा राजकीय पक्ष कॉंग्रेसच आहे. प्रशासनातील मोक्याच्या जागेवर सवर्ण माणसे पेरण्याचं पाप कॉंग्रेस पक्षाचेच आहे. भाजपा आणि कॉंग्रेस हे दोन्ही राजकीय पक्ष सवर्णांचेच आहेत. हे दोन्ही राजकीय पक्ष सेक्युलर नाहीत. बहूजनवादी विचारांचे सुद्धा नाहीत. अल्पसंख्याक, मुस्लिम, दलित आदिवासी विरोधी सुद्धा आहेत….!!
भाजपा आणि कॉंग्रेस हे राजकीय पक्ष वेगवेगळे जरी असले तरी ते एकाच विचाराने प्रेरित होऊन काम करतात हा अनुभव आहे. या दोन राजकीय पक्षांसोबत लढतांना छोट्या छोट्या, प्रादेशिक राजकीय पक्षांची संसाधना अभावी लढतांना दमछाक होतं आहे हे खरे असले तरीही ज्या ज्या राज्यात कॉंग्रेस पक्षाचं ढोंग ऊघडं करणारे नेतृत्व ऊभे राहिले तिथं तिथं कॉंग्रेस हा राजकीय पक्ष संपला. जिथं कॉंग्रेस पक्ष संपला तिथं बहूजनवादी विचारांचा राजकीय पक्ष ऊभा राहिल्याचा अनुभव आहे. उत्तर प्रदेश राज्यात कॉंग्रेस पक्ष संपला म्हणून बसपा किंवा समाजवादी या राजकीय पक्षांना सत्तेची संधी मिळाली. आंध्र प्रदेश मध्ये कॉंग्रेस पक्ष संपला म्हणून चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष ऊभा राहिला. बिहारमध्ये कॉंग्रेस पक्ष संपला तेव्हाच लालूप्रसाद यादव यांना सत्तेत बसता आले….!!
पं बंगाल मध्ये कॉंग्रेस पक्ष संपला तेव्हाच ममता बनर्जी यांना सत्तेत बसता आले. तामिळनाडू मध्ये कॉंग्रेस पक्ष संपला तेव्हाच अण्णा द्रमुक नावाचा पक्ष सत्तेत बसू शकला. ओरीसा राज्यात कॉंग्रेस पक्ष संपला तेव्हाच बिजू पटनाईक यांना सत्तेत बसता आले. तेलंगणा मध्ये कॉंग्रेस पक्ष संपला तरच नागेश्वर राव यांचा पक्ष सत्तेत बसू शकतो.
देशाच्या उत्तर, दक्षिण तथा सर्वच विभागात असे लक्षात येते की, जिथं जिथं सवर्ण मानसिकतेचा कॉंग्रेस पक्ष संपला तिथं तिथं बहूजनवादी विचारांच्या राजकीय पक्षांना सत्तेत बसता आले. त्याच न्यायाने आणि तेच सुत्र अंगिकारुन महाराष्ट्र राज्यात राजकीय प्रयोग झाला. दलित, मुस्लिम, ओबीसी, आदिवासी समुह एकत्र येऊन लढला आणि कॉंग्रेस पक्षाला मूठमाती दिली तर बहूजनवादी विचारांच्या राजकीय पक्षाला सत्तेत बसता येऊ शकते. महाराष्ट्र राज्यात कॉंग्रेस पक्ष अखेरच्या घटका मोजतोय. इथं बहूजनवादी समुह एकत्र आला तर सत्तेत बसायची संधी घेता येईल….!!
एकाच वेळी भाजपा आणि कॉंग्रेस या दोन्ही राजकीय पक्षांसोबत लढणे म्हणजेच आपसुक सवर्णांच्या हातात सत्ता देण्याचा प्रयत्न होय. तुम्ही कॉंग्रेस पक्षाला मदत केली तरीही राज्य सवर्णांचेच असते हे सुद्धा समजून घेणे तेवढेचं महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र राज्यात कॉंग्रेस संपल्याशिवाय तिसरा पर्याय ऊभा राहतं नाही हे वास्तव लक्षात घ्यावे….!!
: भास्कर भोजने.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत