देशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

हा माझा देश जरा अद्भुतच आहे.

इथली अविवाहित असलेली आणि प्रापंचिक नसलेली लोक जनतेने किती लेकर जन्माला घालावीत त्याचे सल्ले देतात.

इथला उद्योगपती लोकांना सत्तर तास कामाचे सल्ले देतो आणि याच कामगारांची पिळवणूक करायला कागदपत्रात हेराफेरी केली म्हणून अमेरिकेत गुन्हेगार ठरतो आणि त्याला दंड ठोठावला जातो.

इथले न्यायाधीश ‘ दृष्टांत झाला निर्णय दिला ‘ म्हणून सांगतात आणि दुसऱ्या मिनिटाला लोकांना घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडायला सांगतात.

इथलं कोर्ट ” आम्ही काय विरोधी पक्षांची भूमिका बजवायची का ? ” अस विचारत आणि विरोधकांनी उपस्थित केलेले प्रश्न, याचिका दाबून ठेवून निकाल न देता बसून राहत.

इथला टीव्ही वाहिनीचा कर्मचारी जो सरकारची पीआर एजन्सी म्हणून काम करतो तो अमेरिकन माध्यमांनी पक्षपाती होऊ नये असले सल्ले देतो.

इथला राष्ट्रप्रमुख देशातल्या अल्पसंख्याक समुदायावर विनोद करतो, खिल्ली उडवतो, त्यांची भीती घालतो, त्यांच्यावर हल्ले करणारांना अभय देतो आणि परदेशातील अल्पसंख्यांचे रक्षण करा म्हणून दुसऱ्या देशाच्या सरकारला उपदेश करतो.

इथला खासदार स्वतः चार मुलांचा बाप होतो आणि नंतर संसदेत लोकसंख्या नियंत्रण कायदा आणायची मागणी करतो.

इथला निवडणूक आयोग आम्ही सांगतो तेच सत्य मानून चला अन्यथा तुमच्यावर खटले टाकण्याची भीती घालतो आणि लोकशाही टिकवायला निवडणुका घेतल्याची ग्वाही देतो.

इथली जनता एकविसाव्या शतकातले स्मार्टफोन तंत्रज्ञान वापरून मध्ययुगीन काळातल्या गोष्टी पसरवण्यात धन्यता मानते.

इथला तरुणवर्ग शिक्षण-रोजगार कि धर्म यामध्ये धर्मांची निवड करतो आणि नंतर बेरोजगारी साठी अरण्यरुदन करतो.

इथले पुरुष देवीची भक्ती करतात, आईला देवी समजतात आणि स्त्रियांवर अत्याचार करण्यातही सहभागी होतात.

इथल्या स्त्रिया आपल्याच पायातल्या असमानता आणि कर्मकांड यांच्या बेड्या मजबूत करायला हातभार लावतात आणि स्त्रिया असुरक्षित, अशिक्षित , परावलंबी आहेत म्हणून गळे काढतात.

आनंद शितोळे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!